- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञान आणि संघर्ष सेवेचा सुगंध म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. त्यांनी सद्गुणांची पेरणी करत उपेक्षित, कष्टकरी, दुर्लक्षित, वंचित बहुजनांसाठी कार्य केले. ते क्रांतिकारक वृत्तीचे तसेच संवाद आणि संघर्षाचे प्रतिक होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श ठेवून डॉ. बाबासाहेब कांबळे संतांच्या समतेचा समर्पणातून विचार करत कार्य करत आहेत, अशा शब्दात डॉ. सबनीस यांनी त्यांचा गौरव केला. फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहूजी महाराज पुरस्काराने महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा आज (दि. 2) गौरव…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न ठामपणे मांडत सरकारला जाब विचारला. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इंद्रायणी तांदळाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्यांचा तुटवडा गंभीर होत चालल्याने त्यांनी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. मावळमध्ये सुमारे १२,८६५ हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणी तांदळाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी उच्च प्रतीच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप करत शेळके यांनी शासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली. “राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे थांबवायला हवं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सेक्टर नं१७ व १९ घरकुल येथे भाजी मंडई हॉकर झोन निर्माण करण्यात आले. येथे कोबा करण्यात आला मात्र सदरच्या ठिकाणी पत्र्याची शेड करावे,ओटे निर्माण करून द्यावेत ,लाईट ,पाणी द्यावे या मागण्यासाठी फ क्षेत्रीय कार्यालयावर नॅशनल हॉकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने मोठ्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनामध्ये मा. नगरसेवक मारुती भापकर, महिलाध्यक्षा वृषाली पाटणे,मनपा समिती सदस्य किसन भोसले,सलीम डांगे, नंदा तेलगोटे ,राजू बिराजदार, सुरज देशमाने, सचिन नागने, जुबेर शेख, बरगल्ली गावडे ,माधुरी जलमुलवार, विनायक लाटे, सुनील भोसले, शेखर पाटील,राजेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच ९० दिवसांच्या कालावधीत ५२२ कोटी रुपयांची ऐतिहासिक कर वसुली करून नवा विक्रम केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते कर वसुली मोहिमेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १० कर्मचारी आणि तीन विभागीय कार्यालयांच प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, नगर सचिव मुकेश कोळप, कर संकलन विभागाचे कार्यालय अधिक्षक चंद्रकांत विरणक यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी आयुक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर हे वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक असून, येथील नागरी समस्यांवर दीर्घकालीन आणि समतोल उपाययोजना राबवण्यावर महापालिकेचा भर आहे. शहरामध्ये केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढ्यावर रस्त्यांचा विकास मर्यादित न ठेवता, त्या जागा सर्वांसाठी सुयोग्य, सुरक्षित आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी एक व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाश्वत शहरी गतिशीलता या विषयावरील तीन दिवसीय परिषद व प्रशिक्षण सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे. या सत्राचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर पीएमपीएमएल बसवर मोठे झाड कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कार्यवाहीस सुरूवात झाली,सदर घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्पच झाली होती आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण येथून दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन जवानांनी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल होत त्वरित बचावकार्य सुरू केले. अत्यंत दक्षतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाड कापून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मकौशल्यांची योग्य ओळख करून, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणे आवश्यक बनले आहे.पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळखला जाणारा आयआयबी करिअर इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना NEET, JEE, आणि MHT-CET परीक्षांसाठी उच्च दर्जाचे, परीणामकारक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज आहे, असे मत ॲड.महेश लोहारे यांनी व्यक्त केले. आजच्या काळात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे ठरत नसून, योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रयत्नांची सततची तयारी महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळखला जाणारा आयआयबी करिअर इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना NEET, JEE, आणि MHT-CET परीक्षांसाठी उच्च दर्जाचे, परीणामकारक मार्गदर्शन देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्यरीत्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करता यावा. भारतीय संविधानाबाबत प्रचार-प्रसार आणि जागृती करता यावी. यासाठी महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महानगरपालिका स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये ‘‘भोसरी व्हीजन-2020’’ उपक्रम हाती घेतला. यामध्ये संविधान भवन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचा संकल्प केला होता. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संविधान भवनचे काम लांबणीवर पडले. 2022 मध्ये पुन्हा भाजपा महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन 2023 मध्ये करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मानवतेची भूमिका हाच बुद्धिवादी माणसांसमोर एकमेव पर्याय आहे; तसेच बुद्धाला स्वीकारण्यासाठी प्राचीन पाली भाषेकडे वळले पाहिजे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आष्टा, तालुका वाळवा येथे केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी – पुणे आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पाली – मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ, स्वागताध्यक्ष अण्णा डांगे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी मुक्या जीवाला जीवनदान दिले आहे. ही कामगिरी पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांच्या बचाव पथकाने पार पाडली. रावेत गावठाण बीआरटीजवळील शाळेसमोरील कन्स्ट्रक्शन साईटवरील खोल खड्ड्यात एक गाय पडली आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी, थेरगाव व प्राधिकरण अग्निशमन केंद्रांमधून बचाव पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, सदर खड्डा अंदाजे ५०x५० फूट लांबीचा आणि ३५ ते ४० फूट खोल होता. पावसामुळे संपूर्ण भाग चिखलमय झालेला होता. अशा कठीण परिस्थितीत खड्ड्याच्या निसरड्या व…
