Author: maharashtrabreakingnews.com

 ५५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व करिअर मार्गदर्शन पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  –      “१०वी आणि १२वी हे विद्यार्थी दशेतले आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. हे केवळ परीक्षेचे निकाल नसून, आपल्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारे क्षण आहेत. या टप्प्यावर घेतलेला प्रत्येक निर्णय आपल्या भविष्याचा पाया रचतो,” असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सकाळी १० वाजता बासुरी बँक्वेट हॉल, हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर येथे भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सेमिनारचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री पांडुरंग आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची महापूजा हरिनाम गजरात झाली. धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत पूजेचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. महापूजा, अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर, तापकीर परिवाराने पारंपरिक विधी आणि भक्तिभाव जपत श्रींची महापूजा केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि माऊलींच्या मूर्तींना दूध, दही, मध, सुगंधी जलाने अभिषेक करण्यात आला. नामगजर, अभिषेक, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात मंदिर परिसर…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास आषाढी देवशयनी एकादशी दिनी सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे दर्शनास भल्या पहाटे हरीनाम गजर करीत गर्दी केली. राज्य परिसरातून आलेल्या सुमारे लाखावर भाविकांनी श्रीचे संजीवन समाधीचे दर्शन घेवून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. तत्पूर्वी माऊली मंदिरात पहाटे साडे चारचे सुमारास ११ ब्रम्हवृंदानी वेदमंत्र जयघोषात रुद्राभिषेक परंपरेने केला. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. इंद्रायणी आरती सेवा समितीचे वर्धापन दिना निमित्त इंद्रायणी आरती, इंद्रायणी पूजा, दीप पूजन, इंद्रायणी नदीत दीप सोडत उत्साहात इंद्रायणी आरतीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आळंदी मंदिरातील प्रथा परंपरेचे पालन…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   आषाढी एकादशीचे औचित्य साधून चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे भक्तीभावात व संस्कारमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या वंदनगीताने झाली. त्यानंतर पंढरपूरच्या वारीचा महिमा सांगणारे मार्गदर्शन शाळेचे संचालक संदीप काटे केले. शाळेच्या शिक्षिका अभिलाषा सोनार यांच्या मार्गदर्शना खाली  विद्यार्थ्यांनी  भक्त पुंडलिक हे नाटक साजरे केले. तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या, भारुड, अभंगगायन, तसेच विठ्ठल-रुखमाईच्या झाकी सादर करून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचे दर्शन घडवले. शाळेच्या प्रांगणात “वारी” चे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात वारी केली. तसेच शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे  यांनी देखील विदयार्थ्यांन सोबत वारीत सहभाग घेतला. त्याच…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानक येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  अजित फाटके पाटील (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी महाराष्ट्र) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमामध्ये रविराज काळे यांनी कै. नारायण शंकर घोडके यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलांकरिता महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ १०वी व १२वी उत्तीर्ण मुलींसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (७,०००/- रु.), आणि पिंपरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस ही उच्च क्षमतेची आणि चांगली वारंवारिता असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून समोर येत आहे. या अंतर्गत शहरातील पाच मुख्य कॉरिडॉरमध्ये दररोज ७ हजार ३८९ बसफेऱ्या सुरू असून सुमारे ३ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. जलद आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास डिझाइन करण्यात आलेल्या या वाहतूक व्यवस्थेमुळे सर्वात वेगवान बस सेवा मिळत असून गर्दीच्या वेळी काही मार्गांवर दर दीड ते दोन मिनिटांनी एक बस धावत आहे. बीआरटीएस वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून निगडी–दापोडी कॉरिडॉर ओळखला जातोय. या मार्गावर दररोज सुमारे १ लाख ५० हजारांहून अधिक प्रवासी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा अंतर्गत मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ता विकसित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावा लागणार आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या कामाला गती मिळेल, असे चित्र आहे. मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दतील रस्ते आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हस्तांतरित करावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी सातत्त्याने लावून धरली आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात बैठक झाली. त्यावेळी मंत्री महोदय यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आदेश दिले होते. वन विभागाकडून डुडुळगाव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये ग्यानबा-तुकारामचा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हरिनामाच्या गजराने सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनेक विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करीत, तर विद्यार्थी गळ्यात टाळ…

Read More

चंद्रभागेच्या तिरी.. पहा मंदिरी तो पहा विटेवरी… विठ्ठल विठ्ठल जयहरी…दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी.. विठ्ठल विठ्ठल जयहरी… असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज रविवार, आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून कैलास दामू उगले (वय ५२ वर्षे) आणि त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले (वय ४८ वर्षे) मु. पो. जातेगांव, ता. नांदगाव जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. दाम्पत्य गेल्या १० ते १२ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत. कैलास यांचे वडील…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने भक्तीमय वातावरणात शालेय पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगांच्या गजरात संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत नामदेव आधी संतांच्या वेषात सुंदर सादरीकरण केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतून भक्ती आणि श्रद्धेचे दर्शन घडले. विठ्ठल रखुमाईच्या रूपातील विद्यार्थ्यांची झलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालकी प्रस्थानाच्या वेळी टाळकरी, वारकरी, तुळशी पथक, पताका पथक या वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशातील विद्यार्थ्यांची दिंडी शाळा परिसरात फिरली, फुगडी, रिंगण या उत्साही वातावरणात परिसर चैतन्यमय झाला. आरोग्य दिंडी या…

Read More