- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरात दर शनिवारी रविवारी तसेच इतर दिवशी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा आणि कलावंतांचा भरभरून प्रतिसाद असतो. ही परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, अचानक शासकीय कामकाज किंवा राजकीय कार्यक्रम जाहीर झाल्यास, अनेक वेळा याच दिवशी आयोजित नाट्यशो वा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात. यामुळे संबंधित कलाकारांचे आर्थिक नुकसान होते, तसेच प्रेक्षकवर्गही नाराज होतो. कलावंत या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच आपला उदरनिर्वाह करतात, त्यामुळे कार्यक्रम रद्द होणे ही बाब गंभीर आहे. यासंदर्भात आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणी करत शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली. या मुद्द्यावर राज्यभरातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महापालिका निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. त्यासाठी प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. निवडणुकीत महिला, युवकांनाही संधी दिली जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असल्याचे शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (शुक्रवारी) शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पक्ष संघटनांच्या मजबुतीसह सदस्य नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला. संघटनात्मक रणनीती आणि स्थानिक पातळीवरील निवडणूक तयारी या दोन्ही विषयांवर सखोल चर्चा झाली. महिला उपनेत्या सुलभा उबाळे ,पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव विश्वजीत बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या पर्यावरणा संदर्भातील कार्याची दखल घेत दलित पॅंथरच्या वतीने केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अरुण पवार यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पँथर संघटनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी यशवंत नडगम उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी अरुण पवार यांच्या कामाचे कौतुक करीत वृक्षमित्र मित्र आहात याचा अभिमान वाटला असे सांगितले. तसेच आपल्या हातून अशीच जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन देशाची सेवा घडावी. आपले समाजकार्य असेच वाढत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक व कृत्रीम आपत्तीचा सामना करण्यासाठी अग्निशामक दलाने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. अचानक उद्भवणारी आपत्ती, अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी पूरस्थिती, जुन्या धोकादायक इमारतींचे कोसळणे, रस्त्यावरील अपघात आदींबाबत अद्ययावत तांत्रिक माहिती, ज्ञान आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळणे करिता प्रात्यक्षिक याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत विभागातील जुने आणि नवीन मिळून एकूण २२० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपत्तीच्या प्रकारानुसार बचाव संबंधित प्रशिक्षण उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत अग्निशमन विभागातील पूर्वीपासून कार्यरत असे ७० अनुभवी आणि १५० नव्याने नियुक्त अधिकारी-कर्मचारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- यंदाच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धेत ९३ खेळांचा असून कोणताही गुणवत्ता असलेला विद्यार्थी खेळापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. स्पर्धेचे बदलते नियम व मार्गदर्शक तत्वांबाबत शिक्षकांनी सजग राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या यंदाच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची नियोजन बैठक नुकतीच पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे शुक्रवारी(११जुलै) रोजी पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायटींच्या आवारात, मंदिराच्या शेजारी असलेली दारु विक्री दुकाने सील करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने सदर दुकाने सुरू झाली. ज्या अधिकाऱ्यांनी अशी परवागनी दिली, त्यांच्या घराशेजारी दारुविक्री दुकान सुरू करण्याची परवागनी द्यावी. त्यादृष्टीने कायद्यात बदल केला पाहिजे. कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्याशिवाय निकोप समाज निर्माण होणार नाही, असा घणाघात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतला. महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेनशन मुंबईत सुरू आहे. राज्यातील दारुबंदी विधेयकाच्या मुद्यावर विधानसभा सभागृहामध्ये जोरदार चर्चा झाली. या चर्चेत आमदार सुधीर मुगनगंटीवार, अतुल भातखळकर यांनी भूमिका मांडली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या विधवेशनामध्ये झालेल्या लक्षवेधीदरम्यान दिलेले आश्वासन सरकारने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांची नियमित बदली अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयातील बार रूम येथे पार पडला. पिंपरी न्यायालयात तीन वर्षे ११ महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून पिंपरी न्यायालयात काम करीत असताना सर्व वकिलांनी सहकार्य केले याबद्दल ॲड. सीमा शेख यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. गिरीष बारगाजे, ॲड. क्रांती कुरळे, ॲड. पूजा इंगळे, ॲड. सुरज मोहिते, ॲड. रूपाली साखरकर, ॲड. प्राजक्ता पिसाळ यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वेद, पुराणे आणि रामायण , महाभारतासारखे ग्रंथ यांच्यातून धर्म, समाज, विज्ञान, अध्यात्म यांचा समन्वय अधोरेखित होतो. नैतिकता, पर्यावरण संवर्धन, स्त्री दाक्षिण्य, सामाजिक बांधिलकी आदींचे संस्करण होते. अठरा पुरणांमधील जीवनमूल्ये आणि तात्विक संकल्पना आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही दिशादर्शक ठरू शकतात. भारतीय परंपरा आणि संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार घडतात.” असे प्रतिपादन राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता डॉ. जितेंद्र आत्माराम होले यांनी केले. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महोत्सवात “महर्षी वेदव्यास रचित अठरा पुराण शास्र – संक्षिप्त परिचय” या विषयावरील व्याख्यान देताना डॉ. होले बोलत होते. अरुणाचल प्रदेश येथील एन आय टी चे संचालक…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘औपचारिक शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षण महत्त्वाचे असते!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. कलारंजन प्रतिष्ठान आयोजित गुरुगौरव पुरस्कार समारंभात गिरीश प्रभुणे बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक बाबुराव हंद्राळे अध्यक्षस्थानी होते; तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्या सुरेखा कटारिया, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेनिमित्त कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने पांडुरंग भुजबळ (सुमारे पन्नास हजार वृक्षांचे रोपण), दिलीप ससाणे (सुमारे तीस वर्षांपासून वैदू वस्तीत संस्कार वर्गाच्या माध्यमातून अध्यापन) आणि संपत पोटघन (कुदळवाडी येथील पी सी एम सी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी भक्कम रस्ते, सार्वजनिक वाहतूक व नियोजन महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आगामी काळात या भागामध्ये अंडरपास, पर्यायी रस्ते, मेट्रोची डेडलाईन काटेकोरपणाने पाळली जाईल. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सिंगल पॉईंट ॲथॉरिटीद्वारे सर्व समन्वय करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्यामुळे हिंजवडीतील समस्या सुटण्यासाठी आशादायी चित्र निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भेट घेतली. ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केली…
