- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरूत्थान अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राबवलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) घरकुल योजनेतील 36.77 चौ. मी. (395.65 चौ. फूट) असलेल्या गरिबांच्या घरांसाठी महानगरपालिकेची कर आकारणी (घरपट्टी) रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘जेएनएनयुआरएम’ या योजनेंतर्गत चिखली येथे शहर परिसरात वास्तव्य करीत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी गृहयोजना प्रकल्प उभारण्यात आला आहे. सदर ठिकाणी 160 इमारती असून, एकूण 6 हजार 720 कुटुंबांना येथे निवारा मिळाला आहे. या घरकूलमध्ये राहत असलेली…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात विविध शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शाह उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे डॉ अनामिका घोष, डॉ. हर्षिता वाच्छानी , प्रा. हेमलता चव्हाण आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील संस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण समिती, क्रीडा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, विविध गुणदर्शन, प्रश्नमंजुषा, नृत्य,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राज्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर परिसरातील तरुण तरुणींना स्वयंसिद्ध होण्यासाठी शहरात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि आजी माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने बेरोजगांरासाठी रोजगार महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे योगेश बहल यांनी दिली. संत तुकारामनगर, पिंपरी येथील भारतीय जैन संघटना स्कूल, वाई.सी.एम. हॉस्पिटल…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमन्नृप शिवछत्रपती पालखीची परंपरा पूर्वापर चालत आलेली आहे. आषाढी वारीत पायी चालण्याची परंपरा कोरोना काळातही अखंडितपणे जपलेला जगातील एकमेव ऐतिहासिक सोहळा आहे. श्रीशिवजन्मभूमी श्रीशिवनेरी ते शक्तीपंढरी दुर्गदुर्गेश्वर श्रीरायगड ते भक्तीपंढरी भूवैकुंठ श्रीपंढरपूर ते श्रीपावनखिंड ते श्रीशिवाई मंदिर श्रीशिवनेरी धारकरी – वारकरी पायी पालखी सोहळा श्रीराजाभिषेक शक 352 चे आगमन श्री महिंद गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि 18/07/2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे – पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रोड येथे उत्साहात पालखीचे स्वागत झाले. या प्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, चिंचवड काळेवाडी मंडलाध्यक्ष हर्षल नढे, प्रदेश सचिव युवा…
गोरक्षकांना संरक्षण देण्यासाठी व अवैध कत्तल थांबवण्यासाठी समित्या स्थापण्याची मागणी मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गोमातेला “राजमाते”चा दर्जा देत महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कठोर शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभेत आज (शुक्रवारी) औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. शंकर जगताप यांनी स्पष्टपणे नमूद केले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व त्यातील १९९५ आणि २०१५ मधील सुधारणा कायद्यानुसार संपूर्ण राज्यात गोवंश हत्या, वाहतूक, विक्री आणि अवैध व्यापारावर बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन…
कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी सेक्टर १६ येथील बालघरे तालीम गेल्या वर्षभरात परिसरातील युवकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यवृद्धीसाठी एक आश्वासक केंद्र म्हणून उदयास आली आहे. पारंपरिक कुस्ती, मैदानी खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध प्रकारच्या व्यायामाचे प्रशिक्षण देणाऱ्या या तालीममुळे अनेक युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रमाला साधनांची कमतरता: तालीमसाठी आमदार श्री. पै महेशदादा लांडगे यांच्या आमदार निधीतून मूलभूत संरचना उभारण्यात आली आहे. मात्र, सध्या आवश्यक क्रीडा साहित्य, कुस्ती सरावासाठी माती, सुरक्षिततेसाठी मॅट्स, तसेच खेळाडूंसाठी पोषणद्रव्ये आणि इतर पूरक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उपक्रमाचा व्यापक लाभ खेळाडूंना मिळत नाही. नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार:…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील मिलिंद नगर येथे सन 2001 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत पात्र झोपडीधारकांना घरे देण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनाचे काम सुरू असतानाही, पूर्वीच घर मिळालेल्या काही नागरिकांना विकासकाकडून पुन्हा एकदा घरे देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात अनेक नागरिकांनी दुबार घर मिळवणाऱ्या नागरिकांविरोधात प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी अद्यापही घरापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य उमा गिरीष खापरे यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून ही बाब उपस्थित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या भागातील प्रमुख ६ रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी संबंधित शेतकऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या कामांमुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार असून विकासाला गती मिळणार आहे. बैठकीत रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेची रूपरेषा आणि कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत धोरणात्मक चर्चा झाली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी परतीच्या प्रवासाला निघाली असून या पालखीचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी (१९ जुलै ) रोजी दुपारी होत आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाजवळील चौकात पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागप्रमुखांसोबत बैठक घेऊन तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, अश्विनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रॉपर्टी ‘‘फ्री होल्ड’’ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सिडको आणि पीएमआरडीच्या हद्दीतील मिळकती ज्या प्रमाणे फ्री होल्ड करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. त्याच धर्तीवर पीसीएमसीच्या कार्यक्षेत्रातील प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. महसूल व वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिले. नवनगर प्राधिकरणाचे 2021 मध्ये PMRDA (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मध्ये विलिनीकरण झाल्यानंतर त्याच्या मालमत्तांचे विभाजन PCMC आणि PMRDA अशा दोन अस्थापनांमध्ये करण्यात आले. प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी 40 वर्षांपूर्वी विकसित केल्या आहेत. त्या 99 वर्षांच्या भाडेपट्टयाने…
