- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदीत नाम जयघोषात आगमन झाले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या. जन्मोत्सवी वर्षा निमित्त तसेच श्री संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा या निमित्त आळंदीत संतांचे पालख्याचे आगमन हरिनाम गजरात झाले. श्री भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी वारी आषाढ यात्रेहून परतीचे प्रवासात अठरा वर्षानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे आगमन एकाच वेळी मागेपुढे रविवारी आगमन झाले. या सोहळ्याचे लांडीत फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांचे पायघड्या आणि पुष्पवृष्टी करून मोठ्या मंगलमय, भक्तिमय वातावरणात सोहळ्याचे आगमन झाले. हजारो भाविक, वारकरी, पंचक्रोशीतील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या ‘उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!’ या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. मानवीय मुख्य मंत्री यांनी आदेशित केल्या प्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी जाहिरातबाजी, फलक, पोस्टर अथवा वृत्तपत्र जाहिरातीऐवजी थेट मुख्य मंत्री सहायता निधी साठी मदतीचा हात पुढे केला. यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, मा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला हा आदर्श सामाजिक सेवा आणि कर्तव्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे अनेक प्रश्न आहेत बांधकाम कामगारांचे विमा संरक्षण वाढ, कालबद्ध अर्ज निकाली काढणे ,बांधकाम कामगारांना ईएसआयसी योजना लागू करणे, कामगारांची पिळवणूक थांबवणे या व इतर मुद्द्यावर राज्यव्यापी लढायचा निर्धार आज श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे आयोजित बांधकाम कामगार राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने एक दिवसियव बैठकीचे आयोजन करण्यात आले . यावेळी अध्यक्ष स्थानी सागर तायडे, स्वागताध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते,कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, धाराशिव चे आनंद भालेराव,यवतमाळ चे रत्नपाल डोफे वर्षाचे मनीष गोरखेडे,मुंबईच्या विनिता बाळेकुंद्री, पुणे येथून शैलजा आरळकर,नाशिकचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळी ५.२० वाजता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांस पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे,माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे,माजी नगरसदस्य संदीप वाघेरे,दत्तात्रय वाघेरे,माजी नगरसदस्या उषा वाघेरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग क्षेत्रीय कार्यालयातील…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे वतीने संत साहित्याचा प्रचार आणि प्रसारांतर्गत शालेय मुलांचे मूल्य संवर्धन, संस्कारक्षम तसेच सुशिक्षित आणि सुसंस्कृत नवसमाज घडविण्याचे उपक्रमाचा भाग असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल मुलींचे आणि मुलांचे या दोन्ही प्रशालेत हरिनाम जयघोषात ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय हरी माऊली, रामकृष्णहरी नामजयघोषात उपक्रमास सुरुवात करण्यात आली. ओळख श्री ज्ञानेश्वरिची परिवाराचे वतीने पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल मुलींचे आणि मुलांचे या दोन्ही प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांमुलींचे साठी होत असलेला संस्कारक्षम उपक्रम सुरु करण्यात आला. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन व आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने वकील बंधू आणि भगिनींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.यावेळी २७३ वकिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली. सदर कार्यक्रमात चे अध्यक्ष पद ॲड.कांता गोरडे यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.गोमती अजित मेहता व ॲड.पूनम स्वामी प्रधान या उपस्थित होत्या. सदर आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सुमित सूत्रवे व डॉ. शैलेंद्र मलखेडे उपस्थित होते. तर सदर कार्यक्रम हा ॲड.सविता तोडकर व ॲड.सुप्रिया ज्ञानेश्वर मलशेट्टी यांच्या सहकार्यामुळे पार पडला. यावेळी डॉ.सुमित सूत्रवे यांनी वकिलांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी “जनसंवाद अभियान” पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश चालक-मालकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढणे हा आहे, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड यांनी दिली. या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड,व रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष जाफरभाई शेख, युवक अध्यक्ष शुभम तांदळे , पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष विशाल ससाणे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विविध लोकहिताचे विषय लावून धरत प्रभावी उपस्थिती नोंदवली. पंधरा बैठकींसाठी शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी ते एक होते. प्रश्न विचारण्यापासून विधेयकांवरील चर्चेपर्यंत आणि ठोस सूचनांपासून औचित्याच्या मुद्द्यांपर्यंत त्यांनी दमदार कामगिरी बजावली. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची आग्रही मागणी लक्षवेधी सूचना क्रमांक २४७३ अंतर्गत त्यांनी राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत स्पष्ट शब्दांत मांडली. या मागणीत आरोग्य विमा, अपघात विमा, शिष्यवृत्ती, किमान वेतन, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला. मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष लक्ष जगताप यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील पवित्र इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात काही विकसक भराव टाकून जमीन तयार करून तेथे अनधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन प्रदूषण व पर्यावरण संतुलनाचा गंभीर प्रश्न होत आहे. येथे नदी सुधार प्रकल्प राबवून या नद्या पर्यावरण मुक्त करण्यासाठी शासन काय प्रयत्न करीत आहे. तसेच केडगाव, तालुका दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवर तसेच अशा इतर संस्थांमध्ये ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मुलींवर अत्याचार केले जातात त्यांची मान्यता रद्द करणार का असा प्रश्न देखील पुन्हा एकदा आमदार उमाताई खापरे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या पावसाळी…
कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी मनपा शाळेमध्ये दिनांक 18 जुलै रोजी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी चार महत्त्वाच्या समित्यांची संयुक्त बैठक मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. बैठकीत सहभागी झालेल्या समित्या पुढीलप्रमाणे होत्या: 1️⃣ शाळा व्यवस्थापन समिती 2️⃣ महिला तक्रार निवारण समिती 3️⃣ विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समिती 4️⃣ सखी सावित्री समिती या बैठकीत शाळेच्या प्रशासकीय कार्यपद्धती, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, शाळेतील पायाभूत सुविधा आणि मुलींसाठी सशक्तीकरण कार्यक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, महिला तक्रार निवारण प्रक्रियेतील सुधारणा, तसेच सखी…
