Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज इंदिरानगर, चिंचवड येथील शिवलिंग नंदी मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाचे संवर्धन या संदेशाला अनुसरून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिव मंदिराच्या प्रांगणात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली, ज्यात सोनचाफा, कडुनिंब आणि सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश होता. या उपक्रमामुळे परिसरातील पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी बोलताना आयोजकांनी सांगितले की, अजितदादा पवार यांचा वाढदिवस केवळ साजरा न करता, तो एका चांगल्या सामाजिक कार्यासाठी वापरला जावा, या उद्देशाने…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमधील बारावीचा विद्यार्थी ध्रुव सपलिगा याने SOF Olympiad-IMO (International Mathematics Olympiad) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे ध्रुवने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७२ वा क्रमांक तर महाराष्ट्र झोनमध्ये प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा आणि राज्याचा मान उंचावला आहे. ही परीक्षा संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयातील प्राविण्य व बुद्धीकौशल्य तपासण्यासाठी घेतली जाते. ध्रुवने आपले उत्तम गणितज्ञान, चिकाटी आणि अभ्यासू वृत्तीमुळे ही कामगिरी साध्य केली. या शैक्षणिक वर्षात ७२ देशांमधील ९६,४९९ शाळांमधून कोट्यवधी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्या स्पर्धेतून ध्रुवने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,पिंपरी-चिंचवड शहरात २५ ठिकाणी भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व भाजप शहर जिल्हाध्यक्ष  शत्रुघ्न काटे करत असून,त्यांनी शहरातील नागरिकांना आणि युवकांना या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग देण्याचे आवाहन केले आहे. आकुर्डी, निगडी,दिघी,इंद्रायणीनगर,नेहरू नगर,कासारवाडी,चिखली,मोशी, तळवडे,फुगेवाडी,चिंचवड,रावेत, सांगवी,पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर, रहाटणी,वाकड,थेरगाव, काळेवाडी आदी परिसरातील विविध ठिकाणी हे      २२ जुलै २०२५ रोजीरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.भोसरी, पिंपरी,चिंचवड या तिन्ही विधानसभा संघातील भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष,विविध पदाधिकारी तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे. “रक्तदान हीच खरी समाजसेवा असून,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या आस्थापनांमधील कामगार एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच जंगली प्राण्यांनाही निवारा मिळत आहे, असे मत कामगार कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, राजगुरुनगर कामगार कृती समिती, साद फाउंडेशन आणि खान्देश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, तिन्हेवाडी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्हेवाडी जिल्हा परिषद शाळा व त्रिमूर्ती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्ष…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सावळागा गं रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या ओविचे हे चार अखंड चरण…’ या ओविंप्रमाणे भारतातील सोशिक, सात्विक परंपरेतील स्त्रिया कशाचाही विचार न करता आपले घर, परिवार उचलून धरतात. स्व. उर्मिलाताई कराड त्यातीलच एक होत्या. पूर्वीच्या काळात आमच्या बायका निरक्षर असतील पण परंतू त्या बुद्धिमान, प्रतिभावान होत्या. त्यांनी परिवारासाठी असंख्य गोष्टींचा त्याग करत आपला संसार मोठा केला. त्यामुळे, पुरुष स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडत असताना स्त्रियांनी सक्षमपणे घर सांभाळल्यामुळे पुरुषांना वैभव प्रात्प झाले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.अरुणा ढेरे यांनी मांडले. त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ५ लाख ४३ हजार ७६६ घरे, २८ लाख ९३ हजार ९३४ कंटेनर, १ हजार २३८ भंगार दुकाने, १ हजार ६०९ बांधकाम स्थळे अशा विविध ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या ३ हजार ४३१ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून ६२४ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करीत २२ लाख २४ हजार इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यू आणि…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे शहरात रविवार, २० जुलै २०२५ रोजी एकूण ११ कोटी ३६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रम या सर्व क्षेत्रात संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिसून येतो. कार्यक्रमात पुढील महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता: * तळेगाव स्टेशन तळे येथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) च्या प्रकल्पाचे लोकार्पण * संताजी नगर येथील काँक्रिट…

Read More

थोरल्या पादुका मंदिरात पूजा व स्वागत ; आज आळंदीत आषाढी एकादशी आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात अलंकापुरीत आगमन झाले. परंपरेने सोमवारी ( दि. २१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. संत तुकाराम महाराज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे  २२ जुलै ते ३० जुलै दरम्यान वाढदिवस जनविश्वास सप्ताह साजरे करण्याचे ठरविले असुन त्या धोरणानुसार माजी विरोधी पक्षनेते  विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे म्हणून  नागरिकांना रक्तदान म्हणजे जीवन दान आहे.आपण रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.अशा प्रकारचे आयोजकांकडून आवाहन करून  रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी  विनंती करण्यात आली. चिचवड मतदार संघात विविध ठिकाणी फलक लावून सोशल मिडीया व विविध समाज माध्यम मार्फत रक्तदात्यांना या शिबिराची माहिती देण्यात आली होती. रक्तदान…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विविध लोकहिताचे विषय लावून धरत प्रभावी उपस्थिती नोंदवली. पंधरा बैठकींसाठी शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी ते एक होते. प्रश्न विचारण्यापासून विधेयकांवरील चर्चेपर्यंत आणि ठोस सूचनांपासून औचित्याच्या मुद्द्यांपर्यंत त्यांनी दमदार कामगिरी बजावली. *पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची आग्रही मागणी* लक्षवेधी सूचना क्रमांक २४७३ अंतर्गत त्यांनी राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत स्पष्ट शब्दांत मांडली. या मागणीत आरोग्य विमा, अपघात विमा, शिष्यवृत्ती, किमान वेतन, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला. *मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष लक्ष* जगताप यांनी…

Read More