Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेषतः भाजी मंडई, सार्वजनिक स्वच्छतागृहे व त्याच्या आसपासच्या परिसरांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ३२ राजीव गांधी भाजी मंडई, जुनी सांगवी येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे राबविण्यात आली. या मोहिमेत पिंपरी चिंचवड महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक दीपक कोटीयान,आरोग्य निरीक्षक संदीप राठोड, आरोग्य मुकादम वैशाली रणपिसे व नारायण शितोळे यांच्यासह अन्य महापालिका कर्मचारी आदी सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांना डेंग्यू व मलेरिया या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ब्रँड डिझाइन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रज्ज्वल जयसिंग दिंडे यांनी, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोहित राजेंद्र घोडके यांनी, आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज यांनी मिळवले आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने परीक्षकांनी दोघांनाही पारितोषिकाची संपूर्ण बक्षीस रक्कम देण्याची शिफारस केली आहे. तसेच विशेष ज्यूरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले आहे. ‘हरित सेतू’ उपक्रमामार्फत महापालिका पादचारी केंद्रित रस्ते, सुसंगत पार्किंग व्यवस्था, मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यात पडणाऱ्या तसेच इतर खड्यांचे निराकरण करण्यासाठी व नागरी सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी महापालिकेच्या अभियंतांना “खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली” (Pothole Management App) वापर व खड्डे भरण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले. ऑटो क्लस्टर येथे झालेल्या या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराला महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण व शहर दळण वळण विभागातील कार्यकारी अभियंते, उप अभियंते, कनिष्ठ अभियंते, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असे एकूण १५७ अभियंते सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून या अंतर्गत इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडिया प्रा.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महर्षी वाल्मिकी महिला बचत गट, ऐश्वर्या महिला बचत गट, आवडी महिला बचत गट, भीमक्रांती महिला बचत गट, गायत्री महिला बचत गट, वैशालीताई काळभोर बचत गट, मत भिमाई महिला बचत गट या बचत बचत गटांना सार्वजनिक शौचालयांचे स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी येणा-या खर्चास मान्यता, ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वुई टुगेदर फाउंडेशन आणि जिवाजी महाले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात पिंपरी गाव येथे मुक्कामी असताना मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ३७५ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मसाज आणि औषधांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, सलीम सय्यद यांनी सहभाग घेतला. तसेच जिवाजी महाले स्मारक समितीच्या अनिता वाळुंजकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉ. मोहन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने आणि सेवा भावनेने आरोग्य…

Read More

                              चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय, पर्यावरणाचे संरक्षण करायचे असेल तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या आस्थापनांमधील कामगार एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच जंगली प्राण्यांनाही निवारा मिळत आहे, असे मत कामगार कल्याण आयुक्त श्री.रविराज इळवे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, राजगुरुनगर कामगार कृती समिती, साद फाउंडेशन आणि खान्देश युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,तिन्हेवाडी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्हेवाडी जिल्हा परिषद शाळा व…

Read More

कुदळवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यादवनगर, कुदळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “एक थेंब रक्ताचा, वाचवेल जीव मोलाचा!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सुरू झालेल्या या शिबिरात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत अनेक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे प्रमुख आयोजन मा. आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर मुख्य समन्वयक अँड योगेश सोनवणे श्री दिनेश लालचंद यादव यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट / ब्लूटूथ / टिफिन बॉक्स यापैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली, त्यामुळे युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. यावेळीआमदार श्री पै…

Read More

पिंपळे गुरव,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’च्या महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात आणि जनतेच्या साक्षीने पार पडले. हे कार्यालय आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू करण्यात आले असून, राज्यात या प्रकारचे हे पहिलेच कार्यालय आहे. उद्घाटन मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आले आहे, जे त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाला समर्पित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ३५ भूखंड यांचे ऑनलाईन ई-लिलाव पद्धतीने ८० वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे. यात हवेली, खेड, मावळ व मुळशी या तालुक्यातील विविध गावांतील ३२ सुविधा भूखंड, २ आरक्षित शैक्षणिक भूखंड आणि १ सार्वजनिक सुविधा (लायब्ररी / संगीत विद्यालय) भूखंड यांचे ऑनलाईन ई-लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी विहीत पात्रता धारणा करणाऱ्या इच्छुक व्यक्ती / संस्था यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भूखंडांचे वाटप ई-लिलावाद्वारे होणार असून नोंदणी व निविदा दस्ताऐवज डाऊनलोड हे २१/०७/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. पासून ते ११/०८/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर करावयाचे आहेत. तांत्रिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी-१७ येथे समाजप्रबोधन आणि विद्यार्थी विकासाच्या उद्देशाने व्यसनमुक्ती संदर्भात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नार्को कोऑर्डिनेशन सेंटर, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन करून करण्यात आली, त्यानंतर लेफ्ट. प्रसाद बाठे(एन.सी.सी. अधिकारी) यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. गणेश भागरे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) यांनी करून दिला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून सजग नागरिक होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक मा. डॉ. विष्णु शिवप्पा श्रीमंगले ,…

Read More