- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाम जगताप व तृप्ती तानाजी जवळकर मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाट्न महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, उपाध्यक्ष तानाजी जवळकर, तृप्ती जवळकर यांनी रक्तदात्यांचे स्वागत केले. संस्कृती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा दरम्यान माजी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या धकाधकीच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे मात्र नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण लक्षवेधी झाले आहे. भाऊ-बहीण, वडील-मुलगा अशा विवध नात्यांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण होऊन न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे हे वाद टाळून आपले व आपल्या वारसदारांचे जीवन सुखकर करावयाचे असल्यास ‘संपत्ती इच्छापत्र’ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी या ठिकाणी प्राध्यापक प्रबोधिनी, आय.क्यू. ए. सी. व दर्द से हमदर्द तक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘संपत्ती इच्छापत्र’ या विषयावर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या पुढाकाराने पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत बैठकीत चर्चा झाली त्या अनुषंगाने सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीपासून ते सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांपर्यंत, तसेच सेवा उपदान (ग्रॅज्युईटी) रक्कम वाढवण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निर्णयांबाबत प्रशासनिक तोडगा काढण्यात यश आले. सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा पीएमपीएमएलमध्ये चेकर पदासाठी यापूर्वी १०वी नापास कर्मचाऱ्यांनाही सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली होती. मात्र अलीकडील पदोन्नतीमध्ये केवळ १०वी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांनाच संधी देण्यात आली. या निर्णयामुळे नाराजी निर्माण झाली होती. यावर आमदार शंकर जगताप यांनी स्पष्टपणे मागणी केली की, “पूर्व धोरणाप्रमाणे सर्व सेवाज्येष्ठ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात काल, २२ जुलै रोजी आयोजित ३० भव्य महा रक्तदान शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजप शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. श्री. काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरांमधून एकूण २३२१ रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे घेण्यात आली. यावेळी माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, दक्षिण आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ३५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवी सांगवीतील सुरुची हॉटेल येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल व युवक अध्यक्ष शेखर काटे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहाराध्यक्ष विजूअण्णा जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, आयोजक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सुषमा तनपुरे, स्मिता भोसले, शोभा पगारे, संदीप राठोड, ॲड. अभिषेक जगताप, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, सतीश चोरमले,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची ऊर्जा बंधुता देते. बंधुतेची कास धरल्याशिवाय समतेचे मूल्य रुजणार नाही. विषमतेचा अंधकार दूर व्हायचा असेल, तर बंधुता मनामनात रुजायला हवी. कारण दुभंगणाऱ्या समाजाला सांधायचे असेल, तर बंधुतेचा विचार प्रत्येकाने जपायला हवा,” असे प्रतिपादन बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले. विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पुढील महिन्यात आयोजिलेल्या बाराव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदी डॉ. अविनाश सांगोलेकर व स्वागताध्यक्षपदी डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड झाल्याबद्दल काषाय प्रकाशन व बंधुता प्रकाशन यांच्या वतीने दोघांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सावळागा गं रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या ओविचे हे चार अखंड चरण…’ या ओविंप्रमाणे भारतातील सोशिक, सात्विक परंपरेतील स्त्रिया कशाचाही विचार न करता आपले घर, परिवार उचलून धरतात. स्व. उर्मिलाताई कराड त्यातीलच एक होत्या. पूर्वीच्या काळात आमच्या बायका निरक्षर असतील पण परंतू त्या बुद्धिमान, प्रतिभावान होत्या. त्यांनी परिवारासाठी असंख्य गोष्टींचा त्याग करत आपला संसार मोठा केला. त्यामुळे, पुरुष स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडत असताना स्त्रियांनी सक्षमपणे घर सांभाळल्यामुळे पुरुषांना वैभव प्रात्प झाले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.अरुणा ढेरे यांनी मांडले. त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने विभागातील यंत्रसामग्री, उपकरणे आणि वाहनांची कार्यक्षमता तपासण्यासाठी तसेच नव्याने नियुक्त अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सक्षम करण्यासाठी विशेष उजळणी आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात अग्निशमन सेवेत नुकतेच सरळसेवेने नियुक्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच कार्यरत अनुभवी कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये अग्निशमन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, घटनास्थळी त्वरीत कृती, तांत्रिक कौशल्ये, आणि विविध उपकरणांच्या वापराबाबत सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सत्रात रनिंग, पी.टी., स्कॉट ड्रिल, बचाव उपकरणे, रोप रॅपलिंग, न्यूमॅटिक एअर लिफ्टिंग बॅग, हायड्रॉलिक उपकरणे, आस्का लाइट, बीए सेट आणि बीए व्हॅन, तसेच अंडर वॉटर…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा, मोशी क्रमांक १०७ मध्ये शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी ‘दप्तरविना शनिवार’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याच दिवशी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी एक अभिनव आणि यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया आयोजित करण्यात आली. शाळेच्या शिक्षिका अश्विनी सावळकर वाघमोडे यांनी विकसित केलेल्या विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने आणि शिक्षक संदीप भालेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. हे डिजिटल तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पेपरलेस मतदान राबवण्यात आले. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच राबवली. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि देशातील निवडणूक प्रक्रिया कशी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील वर्षापासून मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महसूल वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरला असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १५ कोटी ५३ लाख ११ हजार ७३० रुपयांची पाणीपट्टी महापालिकेने वसूल केली आहे. शहरातील निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा मिळून सुमारे १ लाख ८० हजार ९०६ नळजोडधारक असून, त्यांच्याकडून विविध माध्यमांतून पाणीपट्टी भरली जात आहे. कर संकलन विभागाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे ही वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली. दरम्यान, शहरात अजूनही सुमारे ३२ हजार ४६० नळधारकांकडून पाणीपट्टी थकलेली आहे. “थकबाकीदारांनी लवकरात लवकर पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात…
