Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांचा “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मान करण्यात आला. हाऊस ऑफ कॅामन्स, ब्रिटिश पार्लमेंट लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट च्या सीईओ डॅा. परिन सोमाणी, खासदार बॉब ब्लॅकमन व गाम्बिया चे राजकुमार महामहिम इब्राहिम सान्यांग यांच्या हस्ते बाणेर, पुणे व अहिल्यानगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय आहेत. भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध विश्वविक्रम केले…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, समन्वय, आणि आगामी राजकीय दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. भाजपाची कार्यसंस्कृती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटन अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भारतीय जनता पार्टी संघटनेचा विस्तार, संघटनेचे मजबुतीकरण आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनेची तयारी यावरही बैठकीत सविस्तर मंथन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झालेल्या गंभीर अनियमितता, मतदारयादीतील घोळ आणि मतदान टक्केवारीतील तफावत या मुद्यांवर न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीच्या समर्थनार्थ (दि. २६ जुलै २०२५) “मशाल मोर्चा” काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात लकी बेकरी, काळेवाडी पुलासमोरून झाली आणि समारोप पाचपीर चौक, काळेवाडी येथे झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकूमशाही वृत्ती, स्वायत्त संस्थांवरील दबाव, आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात जनजागृती करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद होती. अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख नव्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 14 येथे वृक्षारोपण व आकुर्डी मनपा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड मधील शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने सामाजिक वृक्षारोपण व रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून केला यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शिवसेना महिला संघटिका रूपाली आल्हाट, माजी नगरसेविका मीनल यादव युवासेना प्रमुख चेतन अण्णा पवार, उपशहर प्रमुख अमोल निकम, युवराज कोकाटे, उद्योजक सोमनाथ काळभोर,विभाग प्रमुख सतीश मरळ, गोविंदराव शिंदे, दीप्ती काळभोर, सुमित निकाळजे यांच्या हस्ते वृक्षारोपण व फळ वाटप करण्यात आले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरीनिमित्त प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, खासदार बारणे यांना यापूर्वी प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे पाच वेळा संसदरत्न, एकवेळा संसदमहासंसदरत्न, एकदा संसद विशिष्टरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. फौंडेशनतर्फे दरवर्षी लोकसभा, राज्यसभेतील विशेष कामगिरी केलेल्या खासदारांना सन्मानित करण्यात येते. यंदा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी यांच्या हस्ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना काळेवाडी विभागाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक आरोग्य सेविका तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातूर्डेकर, उप जिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संवाद व्यासपीठाचे हरीश आप्पा मोरे, सुरेश विटकर, वुमन राइस चे अध्यक्ष अनिता वर्मा, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, पिंपरी चिंचवड शहर संघटिका रूपाली आल्हाट,उपजिल्हाप्रमुख वैभवीत घोडके, पुष्पा सिंग आदी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकारी डॉ अलवी सय्यद डॉ पियुषा कडुस, डॉ अभिजीत शेखर, डॉ प्रकाश जाधव, मुख्याध्यापिका सविता जाधव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्य पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला. भाजप पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. हा उपक्रम भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात पार पडला. भाजप ओबीसी VJNT आघाडी अध्यक्ष गणेश ढाकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (भटके विमुक्त) कैलास सानप यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णांना फळांचे वाटप…

Read More

आकुर्डी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी येथे आज रविवारी दि. २७ जुलैला विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी दिली. आकुर्डी येथे सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथील मनपा रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक १४ मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी सांगितले.

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कारगिल विजय दिवस भारतीय सैन्याच्या असीम शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस. अगदी प्रतिकूल परिस्थितीत लढून भारत मातेच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या निमित्त आळंदी मंदिरासह परिसरात कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन अजिंक्य डी वाय पाटील समूह लोहगाव संचलित अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स विभाग, आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी नगरपरिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे वृक्ष लागवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या ठेकेदारांच्या मनमानी कामांवरून माजी नगरसेवक विजय शिंदे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. पावसाळ्यात खोदकामाला परवानगी नसतानाही सर्रासपणे सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालक आणि सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, याला महानगरपालिकेतील प्रशासकीय राजवट जबाबदार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक नसल्याचा फायदा घेत प्रशासन, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक एकत्र येऊन हा गैरकारभार करत असल्याचा आरोप विजय शिंदे यांनी केला आहे. यामुळे प्रामाणिक करदात्यांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय, असेही ते म्हणाले. अनाधिकृत कामांमुळे वाहतूक कोंडीचा बोजा वाढला विजय शिंदे यांनी निदर्शनास आणून…

Read More