- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुणे महापालिकेत समावेश केल्याप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. त्यावर याबाबत राज्य शासनाने प्रस्ताव पाठवावा. हा प्रस्ताव आल्यास देहूरोडचा महापालिकेत समावेश करण्याची ग्वाही संरक्षण मंत्री सिंह यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले. खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे. त्यामुळे देहूरोडचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची विनंती केली. खासदार नरेश म्हस्के यावेळी सोबत होते. खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, मावळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित आणि रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ञ संचालक पदावर ॲड. संजय गणपत माने आणि शिलचंद्र हसगुडे यांची पुढील एक वर्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष बाबुराव शितोळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ॲड. माने व हजगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ॲड. संजय माने हे अनुभवी पत्रकार असून सातारा येथील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कासपठारच्या कार्यकारी समितीचे आणि शहरातील अनेक सहकारी सोसायट्यांचे व गृहनिर्माण सोसायट्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. शिलचंद्र हजगुडे हे नामांकित सनदी लेखापाल आहेत अशी माहिती व्यवस्थापक कालिदास सुतार यांनी प्रसिद्धीस दिली…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब च्या वतीने “सहा दिवस सहा वाटा” हे अभियान दुर्गा टेकडी येथें राबवण्यात आले. युवकनव नवीन सदस्य यांच्यामध्ये गिरीभ्रमणाची आवड निर्माण व्हावी आणि मोबाईल सारख्या मध्यमा पासून त्यांचे लक्ष दूर व्हावे या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सलग सहा दिवस वेगवेगळ्या वाटांनी चढाई करत हे आगळेवेगके अभियान संपन्न झाले. फ्रेंड्स क्लब चे अध्यक्ष वसंत ठोंबरे आणि जेष्ठ गिर्यारोहक विश्वास सोहोनी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपन्न झाली. यामध्ये तीनशे पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले होते. अभियानाचे उद्घाटन क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांच्या हस्ते झाले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण औद्योगिक क्षेत्रातीलल वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी भाजपा महायुती सरकार ‘ ऑन ॲक्शन मोड’वर आले आहे. दि. 30 जुलै रोजी मुंबई येथे सांर्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक नियोजित केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन ‘‘ॲक्शन प्लॅन’’…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटप, तसेच पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या व नेमप्लेट वाटपाचा भव्य सोहळा आज (सोमवारी), वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटात पार पडला. ही योजना म्हणजे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून, गरजू कुटुंबांच्या घरस्वप्नांची पूर्ती करणारा आश्वासक उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. आपल्या स्वतःच्या घराची चावी हाती घेताच अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य व डोळ्यांतून अश्रू ओघळताना दिसून आले. काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत होतो, मात्र आज शासनाच्या या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात सिंधी समाजातील काही व्यक्तींच्या जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील भाजप आमदार उमा खापरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी याप्रकरणी सखोल तपासाची मागणी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे केली आहे. आमदार खापरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायद्यावर चर्चा झाली असून या कायद्याअंतर्गत कारवाईस गती देणे गरजेचे आहे. “जर आज दोन व्यक्तींचा धर्मांतराचा प्रकार समोर येतो आहे, तर अशा कितीतरी प्रवृत्ती शहरात सक्रिय असू शकतात. याचा गांभीर्याने आढावा घेणे आवश्यक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रसाद कोलते स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यमुना नगर निगडी या परिसरामध्ये जीवनज्योती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशन व दिव्यदृष्टी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि डॉक्टर चाकणे यांच्यामार्फत या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी व त्यासोबत इतर रक्तदाब,मधुमेह ,इसीजी गरजेनुसार या तपासण्यांसोबत हृदयाच्या अनेक तपासण्या देखील यावेळी करण्यात आल्या. अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी हृदय झडपांची शस्त्रक्रिया,कर्करोग शस्त्रक्रिया,रेडिएशन,मुतखडा,मोफत डायलिसिस सुविधा. अशा प्रकारच्या अनेक आरोग्यादायी सुविधा व तपासणीसाठी रविवार दिनांक 27 जुलै 2025 ला सकाळी दहा वाजेपासून परिसरातील नागरिकांनी या भव्य आरोग्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून संपूर्ण शहरात चार सदस्यीय ३२ प्रभाग तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्याची मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांचे पथक प्रभाग रचनेचे काम करीत आहे. १७ जूनपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये प्रगणक गटांची मांडणी, जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगलमॅपवर नकाशे तयार करणे, जागेवर पाहणी करून प्रभाग रचना तयार करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहराची सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे (दिनांक २६ जुलै) ‘विजय दिन’ साजरा करण्यात आला. ॲड. मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व आयटीआय मध्ये २६ जुलै हा दिन विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. २६ जुलै रोजी कारगिल मधील शिखरांवर पुन्हा तिरंगा फडकला. २६ जुलै हा केवळ एक दिवस नाही, तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. सदर दिवशी माझी सैनिकांना निमंत्रित करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व भाषणाद्वारे कारगिल विजय दिनाचे महत्त्व नमूद केले. सदर कार्यक्रमास प्रशांत गुलाबराव देवरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील १,७२२ विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १,५९३ नोकऱ्या मिळाल्या आहेत. पुढील सहा महिन्यात आणखी नोकरी मेळावे होणार आहेत अशी माहिती पीसीईटी, नूतन सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी पीसीईटीच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे. विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी कंपन्यात झाली आहे. यामध्ये कॅपजेमिनी (३५६), ॲक्सेंचर (२४३), टेक महिंद्रा (१२८), एलटीआय माईंड ट्री (७७), केपीआयटी (६५), कॉग्निझंट (५२) या कंपन्यांचा समावेश आहे.तसेच आयटी प्रॉडक्ट कंपन्यानी खूपच आकर्षक वार्षिक पगार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये लिंक्डइन (६० लाख रुपये), अॅमेझॉन (४७.८८ लाख…
