- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मानवजातीच्या उन्नतीसाठी श्री महादेवाला घातले साकडे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपास्यतेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याचा पहिला सोमवार, विशेषतः श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे, भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. यंदाही, प्रतिवर्षीप्रमाणे, श्री क्षेत्र भीमाशंकर महादेवच्या चरणी 10 हजारांहून अधिक भक्तगणांसाठी मोफत उपवास फराळ वाटप सेवा अर्पण करण्यात आली. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतूक केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भीमाशंकर मंदिर परिसरात ही सेवा निस्वार्थ भावनेतून अर्पण केली जाते. यामध्ये मंदिर परिसरातील सर्व भक्तांना पौष्टिक फराळ दिला जातो, जेणेकरून ते उपवास ठेवून साधकांना…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक नागरिकांमध्ये वेगवेगळी प्रतिभा दडलेली असते. त्याच प्रमाणे दिव्यांग बांधावांमधील प्रतिभा ओळखा, व त्यानुसार त्यांना कामांचे वाटप करा. महापालिकेमधील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांशी विभाग प्रमुखांनी चर्चा करावी, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी व माहिती” याविषयी सर्वसमावेशक जनजागृती निमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुसळधार पावसामुळे पवना, इंद्रायणी, मुळा आणि मुठा नद्यांची धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पवना व मुळशी धरणातूनही नियंत्रित विसर्ग सुरू आहे. यामुळे संगमवाडीसह नदीकाठच्या परिसरांमध्ये (बॅकवॉटर चे) पाणी साचण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने ‘Know Your Fire Station’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पूरस्थितीत किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी प्रथम आपल्या झोननिहाय अग्निशामक केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशामक विभागाने केले आहे. महानगरपालिकेने संभाव्य धोकादायक भागांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पूर नियंत्रण पथके सज्ज ठेवली असून…
आळंदी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त कुरुळी येथील महादेव मंदीरात शिवलिंगावर व आस पास डोळे दिपुन जातील असा नवनाथांच्या वतीने पुजा करत असताना देखाव्याची मांडणी करण्यात आली. नाथ पथांची स्थापना ही शिव शंकरांनी केली असल्याने नव नाराणाचे अवतार असणारे नवनाथ यांच्या कडून शिव लिंगाची पुजा करत असताना हा देखावा जिवंत असल्याचे जाणवत होते हा आकर्षक देखावा सादर करण्यात आला. शिव तांडव ग्रुपचे सर्व सदस्यांनी नवनाथाचा पुजा या देखाव्यासाठी खुप मेहनत घेतली. या ग्रुपने श्रावण चालु झाल्यापासुन विविध देखावे सादर करणार आहेत. आज निमित्त पहाटे शिव पिंडीवर अभिषेक, देखाव्याची मांडणी तदनंतर आरती होऊन शिवस्रोत्र पठण केले. तसेच…
कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धार्मिक श्रद्धा आणि जैवविविधतेचा संगम असलेल्या नागपंचमीच्या पवित्र दिवशी समाजहिताचे भान ठेवत, स्वी सदस्य श्री. दिनेश यादव यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. त्यांनी सर्पमित्रासाठी तब्बल १५ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून पर्यावरणाच्या खऱ्या रक्षकांची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. सर्पमित्र हे पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावतात. ते सर्पमुक्ती करताना सापांचे प्राण वाचवतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडतात. मात्र, हे करताना त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. भारतात आढळणाऱ्या सुमारे २५० सर्प प्रजातींपैकी ५० विषारी असून, कोब्रा, रसेल वायपर, क्रेट, सॉ-स्केल्ड वायपर यांसारखे जीवघेणे साप त्यांना रोजच सामोरे जावे लागते. “सर्पमित्र समाजासाठी एक अमूल्य सेवा बजावतात.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागपंचमी या पारंपरिक सणानिमित्त, प्रभागातील महिलांसाठी विशेष पूजाविधीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका निर्मला सदगुरू कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत, खराळवाडी येथील श्री खराळाई मंदिर येथे सकाळी ८:०० वाजल्यापासून नागदेवतेच्या पूजेस सुरुवात झाली. महिलांसाठी हा सण सश्रद्धतेने साजरा करता यावा, तसेच पारंपरिक संस्कृती जपली जावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून भक्तिभावाने पूजा केली. स्थानिक नागरिकांनी सौ. कदम यांचे अभिनंदन करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. निर्मला कदम यांनी उपस्थित सर्व महिला भाविकांचे आभार मानले व सांगितले की, “आपल्या संस्कृतीतील सण-उत्सव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि प्रशासनाला अधिक लोकाभिमुख व गतिमान बनविण्यासाठी उद्या बुधवार दि.३० जुलै रोजी रहाटणी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांद्वारे शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी केले आहे. रहाटणी येथील विमल गार्डन मंगल कार्यालय येथे बुधवार दि.३० रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचा शुभारंभ होणार आहे. पिंपरी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या अनेक वर्षांपासून वकील आणि नागरिकांच्या मागणीला अखेर यश आले असून शहरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना व पदांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरात आता या दोन वरिष्ठ न्यायालयांची स्थापना होणार असून पिंपरी-चिंचवडकरांना पुण्याला माराव्या लागणाऱ्या चकरा कमी होणार आहेत. शहरात ही न्यायालये स्थापन व्हावीत, या करिता पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असाेसिएशन व वकिलांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरी मिळताच वकिलांनी आनंद व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रस्तावित दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ७२ तक्रार वजा सूचना प्राप्त पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने प्रथम, भोसरीतील कै.दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाने द्वितीय, वाल्हेकरवाडीतील चिंतामणी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. ट्रस्टच्या वतीने निगडी येथील पत्रकार परिषदेत या स्पर्धेचा निकाल आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या गुरुवारी ३१ जुलै प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासणे,…
