Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकासकामे करत असताना ज्येष्ठ नागरिक आम्हाला वारंवार विविध सुचना करत असतात. त्यांच्या सुचना आम्हाला विकासकामासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले. पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ज्येष्ठांनी त्यांनी संवाद साधला. नानांच्या हस्ते यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवार दि. ३१ जुलै रोजी गोविंद गार्डन हॉटेलच्या बांसुरी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नाना काटे यांच्यासह पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष शत्रृघ्न बापू काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संचालक संजय भिसे, डॉ.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१ व १५ डिसेंबर २०२२ च्या शासननिर्णयानुसार ५७ सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या सेवा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र नियंत्रित खासगी स्वरुपात देण्यात आलेल्या ९४ नागरी सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पुरविल्या जातात. आता मा. मुख्यमंत्र्यांच्या १५०-दिवसीय महत्त्वाकांक्षी कृती आराखड्याचा अनुषंगाने या सेवांचा लाभ नागरिकांनी थेट ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. यासाठी नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी करा नोंदणी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन नागरिकांनी सर्वप्रथम स्वतःचे खाते तयार करायचे आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच करावी लागेल, यामध्ये ओटीपी द्वारे नागरिकाचा मोबाईल नंबर हा तपासून…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज सकाळी अचानक महापालिकेच्या चऱ्होळी बु. येथील पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी बाकावर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची तपासणी केली. यंदाच्या वर्षी मिळालेले साहित्य कसे वाटते, याबाबात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाही त्यांनी जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी डीबीटी उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेच्या १४६ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट लाभ मिळावा, या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट मिळाले आहे का, याची तपासणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे अंध मुलांना अन्नदान व गोमातेला चारा वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संयोजक माजी उपसभापती शिक्षण मंडळ विष्णूपंत नेवाळे, सोमनाथ शेळके पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग शहराध्यक्ष अमोल कदम, आयुब, काशिनाथ जगताप, संदीप नेवाळे, युवराज संकेत प्रभाग क्रमांक ११ मधील भीमशक्ती नगर घरकुल पूर्णा नगर या भागातील प्रभाग क्रमांक ११ मधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नामवंत व्याख्यात्यांची व्याखाने, शाहिरी,विचारवंतांचे परिसंवाद,गीत गायन,गझल,कवीसंमेलन तसेच सांस्कृतिक गीते तसेच इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शुक्रवार) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत नगरसेवक जावेद रमजान शेख यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून अनाथ मुलांना शिक्षण साहित्य व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अन्नदान पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे पार पडला. या प्रसंगी जावेद शेख यांची पत्नी फाहमिद जावेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात गोविंदराव शिंदे, सोमनाथ काळभोर, ताहीर जावेद शेख, कृष्णा माने आणि यज्ञेश वाघमारे यांच्या हस्ते अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान व साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे जावेद शेख यांचे समाजसेवा कार्य आजही जिवंत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.…

Read More

पीसीसीओइआर येथे राष्ट्रीय स्तरावरील इन्सेप्टिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न इन्सेप्टिया हॅकेथॉन मध्ये सायलेंट ब्रिज टीम प्रथम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘इन्सेप्टिया हॅकेथॉन २०२५’ ही राष्ट्रीय स्पर्धा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना, नव उपक्रम, तांत्रिक कौशल्य सादरीकरण यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देते. ही स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नसून राष्ट्राच्या तांत्रिक विकासात योगदान देण्यासाठी सहभाग घेण्याची एक संधी आहे असे पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) येथे राष्ट्रीय स्तरावरील इन्सेप्टिया हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सायलेंट ब्रिज टीमने प्रथम…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या अनेक वर्षांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्यांवर ठोस उपायोजना झाल्या नाहीत. परिणामी, चाकरमानी, वाहनचालक आणि औद्योगिक कंपन्या त्रस्त झाल्या होत्या. मात्र, आता औद्योगिक क्षेत्र समस्यामुक्तीच्या दिशेने वाटचाल करील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांबाबत औद्योगिक संस्था संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी #UNCLOG_Chakan_MIDC मोहीम हाती घेतली. तसेच, काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये व बैठ्या घरांमध्ये महावितरणच्या वतीने नव्याने डिजिटल वीज मीटर बसवण्यात आले आहेत. या उपक्रमाचे स्वागत करत असतानाच, नागरिकांच्या तक्रारींचा स्वर वाढू लागला आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या डिजिटल मीटरमुळे वीजबिलात अनावश्यक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.याबाबत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नवीन मीटर बंद असतानाही कोणतेही वाचन न घेता अंदाजे रीडिंगवर अवाजवी बिल आकारले जात आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालयात तक्रार केली तरी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली…

Read More

तळेगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव–चाकण–शिक्रापूर (NH-548D) या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेवर आता ठोस पावले उचलली जात असून, वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. उद्योगधंदे, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याच्या उन्नतीसाठी सखोल चर्चा झाली. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार बाळा भेगडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, एनएचएआय, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मार्गाची स्थिती आणि महत्त्व: या मार्गाची एकूण…

Read More