- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपने त्यांना विनम्र अभिवादन केले. आज, १ ऑगस्ट रोजी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही महान विभूतींच्या कार्याला आदराने स्मरण करण्यात आले. शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना काटे म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी गर्जना करून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणा देते.” पुढे ते म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने आणि शाहिरीने…
सांगवी वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा बळी पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर येथील पीके चौकात आज दुपारी सव्वा बारा वाजता आरएमसी डंपरने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यात चिंचवड येथील 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा अपघात केवळ डंपर चालकाच्या बेदरकारपणामुळे नाही, तर सांगवी वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे, असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी केला आहे. ते म्हणाले, ”पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एकही वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसतो. त्यातच येथील सिग्नलचा टाईमींग देखील मोठा आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सिग्नल तोडण्याची सवयच लागली आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक…
डॉ. शमसुद्दीन तांबोळी व डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे विश्वबंधुता साहित्य संमेलन आयोजित केले आहे. येत्या शुक्रवारी (ता. ८ ऑगस्ट) सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शमशुद्दीन तांबोळी आणि ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. जयकुमार ताम्हाणे यांना जाहीर झाला आहे. तिरंगा महावस्त्र, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देशाची माती, तिथले लोकसंगीत, आणि परंपरेची वीण घेऊन दूर शहरात आलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात आपल्या मूळ गावाचे एक हळवे स्थान असते. याच मातीचा सुगंध आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून खान्देशाची समृद्ध परंपरा जिवंत ठेवण्याचा एक हृदयस्पर्शी प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या उत्सवाचे दुसरे वर्ष आहे आणि या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, राज्यसभा खासदार मा. श्री. उज्जलजी निकम यांना खान्देश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गावातील प्रसिद्ध व्यावसायिक भावेश काकरणी यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार चोरट्याने चेन लुटण्याच्या उद्देशाने केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. काकरणी हे त्यांच्या दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडले होते, तेव्हा एका अज्ञात सराईत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रतिकार केल्यामुळे चोरट्याने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्यांच्या पायात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे, मात्र धोका टळलेला असल्याचेही सांगण्यात…
कराड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेस मधील संघटनात्मक पातळीवरील हे महत्वाचे फेरबदल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत. शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी सांभाळली असून युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य बाबू नायर यांची पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आल इंडिया काँग्रेस कमिटीने त्यांना नियुक्तीपत्र नुकतेच प्रदान केले असून, ही बाब शहर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. बाबू नायर हे काँग्रेस पक्षाशी १९८० पासून सक्रियपणे जोडले गेले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास एनएसयूआयपासून सुरू झाला असून, युवक काँग्रेसमध्ये शहर सरचिटणीस, सेवादल शहराध्यक्ष, शहर प्रवक्ते, प्रदेश प्रतिनिधी अशी विविध पदे त्यांनी भूषवली. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या नऊ शहराध्यक्षांबरोबर त्यांनी कार्य केले आहे. महापालिकेत दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. २०१० ते २०१२ या काळात…
पीसीयूचे विद्यार्थी मलेशियाला रवाना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मलेशिया मधील युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास (यूटीपी) येथे टर्म इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी पीसीयूच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे गौरवास्पद आहे असे पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकीच्या बीटेक मधील चार विद्यार्थ्यांची यूटीपी मध्ये निवड झाली. यामध्ये तन्वी काकडे आणि आर्य भोईटे (अंतिम वर्ष), श्रेया कोळी आणि माहि बेदरे (द्वितीय वर्ष) यांचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक फाटा ते खेड या भागातील रुस्ता रुंदीकरणाला (एलिव्हेटेड कॉरिडॉर) चालना देण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुशंगाने राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील नाशिक फाटा ते खेड या दरम्यान आठ पदरी उन्नत मार्ग (Elevated Corridor) चे मोठे काम हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन यांची वार्षिक सभा आज)गुरुवार दि. ३१ जुलै) बासुरी बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर याठिकाणी सुसंस्कृत आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ नागरिकांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला.आरोग्य,मनोरंजन, सामाजिक सहभाग व समाजहिताच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती सभेत मांडण्यात आली. शत्रुघ्न काटे यांनी म्हटले की,”वरिष्ठ नागरिक हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचा अनुभव, विचार आणि मार्गदर्शन युवकांना योग्य दिशा दाखवते. अशा सामाजिक संस्थांशी जुळून काम करताना मला नेहमी अभिमान वाटतो.” यावेळी शत्रुघ्न काटे, संजय भिसे, कुंदा भिसे, जगन्नाथ काटे,…
