- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र, पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आरखडा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये, राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजक्रांतीचे प्रणेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनिता पाटील, कल्पना चौधरी आणि चेतना देशमुख या शिक्षकांनी टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रबोधनपर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका देशमुख यांनी केले.
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्ट बिटस् फौंडेशन पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक तरुण चित्रकारांच्या विविध चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे येत्या ३, ४, ५ ऑगस्ट रोजी बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कला रसिकांना विनामूल्य पाहता येईल, अशी माहिती आर्ट बिटस् फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता प्रसिद्ध चित्रकार दीपक सोनार यांच्या हस्ते होईल. या निमित्त ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील अभिनव चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक व चित्रकार सतीश काळे यांचे ‘दृश्य आणि विचार’ या विषयावर कलाविषयक व्याख्यानाचे करण्यात आले आहे. जेष्ठ चित्रकार व लेखक डॉ. सुहास बहुलकर, डॉ. अमृता…
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — आज सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एक दुर्दैवी व भीषण अपघात झाला. चिचवड येथील एका इसमाने एक्टिवा दुचाकीवरून कोकणे चौकाच्या दिशेने जात असताना, एका RMC (रेडी मिक्स काँक्रीट) गाडीखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत, सांगवी पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि ॲम्बुलन्स यांना घटनेबाबत माहिती दिली. अल्पावधीतच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. काटे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन मदतीचे काम समन्वयाने पार पाडले. अपघातानंतर, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून, रस्त्यावरील बेशिस्त…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या २० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदिरानगर, चिंचवड येथील शिवलिंग मंदिरात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या महिला भजनी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कै. सोपानराव भोईर (आप्पा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ४७ संघांनी सहभाग घेतला होता, ज्यामुळे कार्यक्रमाला एक विशेष उत्साह लाभला. भक्तीमय वातावरणात झालेल्या या स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेते आणि विशेष सन्मान स्पर्धेत आकुर्डी येथील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. तर, शिवशक्ती महिला भजनी मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज दिनांक १ ऑगस्ट रोजी महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ताशा पथक वाजवत आणि घोषणांनी परिसर दणाणून टाकत, लोकशाहीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे शोषित, वंचित व मेहनतकऱ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य आणि देशहितासाठी केलेल्या कार्यावर सखोल भाषण केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. या अभिवादन कार्यक्रमाला विशाल वाघमारे, धर्मराज बनसोडे, समद शेख, अतिश दुधावडे, रोहित चंदणे, विकास वाघमारे, आशा वायडंडे, निगम राय, जयंश्री वडले, दत्तात्रय व्हनकडे,…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केशवनगर, विवेक वसाहत चौक, उद्यम विकास बँकेसमोर गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा चेंबर बदलण्यात आले, तरीही आजही ते खराब अवस्थेत आहेत. पाच महिन्यांपूर्वी मोठ्या खर्चाने काम पूर्ण झाल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा चेंबर खोलले जात आहेत. मुख्य रस्त्यावरील हे चेंबर्स हलक्या दर्जाचे असल्याने, मोठ्या वर्दळीच्या भागात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, चार दिवसांपासून तीनही चेंबर्स खराब अवस्थेत आहेत आणि दररोज 10 ते 15 दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत आहेत. या चेंबर्समुळे लवकरच एखादी चारचाकी गाडी देखील त्यात अडकू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मधुकर बच्चे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यामध्ये फिरते खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीबाबत सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांनी प्राधान्याने निर्णय घ्यावा. यासह महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेने याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी पुणे बार असोसिएशन सह जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी केली. या मागणीला पाठिंबा भाजपा आमदार महेश लांडगे पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. पुणे शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी आता ‘पुणे बार असोसिएशन’ने पुढाकार घेतला आहे. अधिवक्ता एस्. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली ‘खंडपीठ कृती समिती’ची स्थापना केली आहे. या समितीत पुण्यातील ५ बार कौन्सिलचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपने त्यांना विनम्र अभिवादन केले. आज, १ ऑगस्ट रोजी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही महान विभूतींच्या कार्याला आदराने स्मरण करण्यात आले. शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना काटे म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी गर्जना करून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणा देते.” पुढे ते म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने आणि शाहिरीने…
सांगवी वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा बळी पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपळे सौदागर येथील पीके चौकात आज दुपारी सव्वा बारा वाजता आरएमसी डंपरने एका दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यात चिंचवड येथील 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. हा अपघात केवळ डंपर चालकाच्या बेदरकारपणामुळे नाही, तर सांगवी वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे, असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी केला आहे. ते म्हणाले, ”पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एकही वाहतूक पोलीस कर्तव्यावर नसतो. त्यातच येथील सिग्नलचा टाईमींग देखील मोठा आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये सिग्नल तोडण्याची सवयच लागली आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतूक…
