Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी नाशिक महानगरपालिका आणि त्र्यंबक नगरपरिषदेद्वारे आयोजित “आपली गोदावरी रिव्हरफ्रंट अँड प्रिसिंक्ट डेव्हलपमेंट” या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ऐश्वर्या नायर यांच्या हस्ते विजयी संघातील विद्यार्थ्यांना दोन लाखांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नाशिकच्या तपोवन क्षेत्रासाठीचा प्रकल्प प्रस्ताव, नदीच्या पर्यावरणाचे जतन करणे, शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे, नैसर्गिक संसाधनाचा पुनर्वापर सक्षम करणे आणि सामाजिक उन्नतीला चालना देणे यावर एस. बी. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केला होता. या संघात इशिका नारखेडे, कृतिका कदम, निपुण कोसरे, तन्वी खोचरे, मृणाल…

Read More

(धनुर्विद्येत महाराष्ट्रातून झालेली सोनल बुंदेले यांची पहिलीच निवड) चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिल्ली येथे दि. १८ ते २० जुलैला वर्ल्ड आर्चरी एशिया (WAA) मार्फत झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन चिंचवडच्या सोनल बुंदेले या महाराष्ट्राच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पंच ठरल्या आहेत त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धनुर्विद्या क्षेत्रातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी सोनल बुंदेले यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून यश संपादन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. बुंदेले यांनी धनुर्विद्या या क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देत ऑलिम्पिक संघाच्या निवड चाचणी प्रमुख, खेलो इंडिया स्पर्धा तसेच नॅशनल गेम्स व विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच व…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- फिगरेटीव्ह आर्ट, बंजारा चित्रशैली सिरीज, निसर्गचित्र, अमूर्त शैलीतील कलाकृती आणि शिल्पे रसिकांना भुरळ घालत आहेत. चित्र प्रदर्शनाला पहिल्या दोन्ही दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकाच ठिकाणी रसिक विविध कलाकृतींचा अनुभव घेत आहेत. हे प्रदर्शन येत्या ५ ऑगस्ट पर्यंत सकाळी १० ते ०६ या वेळेत सुरू राहणार आहे. पुण्यातील आर्ट बिटस् फाउंडेशनच्या वतीने व आर सी स्टुडिओच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालन येथे महाराष्ट्रातील निवडक तरुण चित्रकारांच्या विविध चित्र व शिल्पकारांनी कलाकृतिचा समावेश आहे. या प्रदर्शनात चित्रकार अमित तरडे, अर्चना चव्हाण, मुंजा नरवडे, मनोज पवार, प्रियांका सावंत, रोहित यादव, रुपल फाटेरपेकर, राहुल पवार, विजय गव्हाणकर, विनोद विरणक व शिल्पकार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशी बांधवांनी आपली संस्कृती जपून शहराला ‘मिनी खान्देश’चे स्वरूप दिले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. हा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून, आपल्या संस्कृती आणि परंपरेचा जागर असल्याचेही त्यांनी सांगितले. आज दुपारपासूनच उत्सवाची सुरुवात श्री कानबाई मातेच्या भव्य मिरवणुकीने झाली. श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून सुरू झालेली ही मिरवणूक आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे पोहोचली. मिरवणुकीमध्ये शिरपूर येथील गोल्डन बँड आणि अमळनेर येथील राधे कृष्ण बँडच्या संगीताने एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण धुळे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथे इंडिया स्टेम फाउंडेशन च्या वतीने ३ ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या रोबोटिक मॉडेल स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 25 ते 30 रोबोटिक लॅबच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपल्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय चिंचवड पुणे विद्यालयातील 1) पूर्व तामस्कर 2) श्रवण आल्हाट 3) हर्षवर्धन पुजारीया तीन विद्यार्थ्यांनी मिथेन गॅस चे लिकेज शोधण्यासाठी रोबो कसा मदत करू शकतो या विषयावर सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाची कामगिरी केली. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव संस्थेचे सचिव संजयभाऊ जाधव, संचालक विजय जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनेनुसार मार्ग मोकळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील दोन याचिका फेटाळून लावल्या असून, वॉर्ड/प्रभाग रचना हा राज्य सरकारचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने 2022 मध्ये केलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत. मे 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्याचे मुख्य कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासंबंधी न्यायालयात दाखल झालेली याचिका. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत राज्य सरकारला 1994 ते 2022 दरम्यानच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेलं… काहींना मानसिक-शारीरिक आजारांनी ग्रासलेलं, तर काहींना दोन घास मिळवण्यासाठी रस्तोरस्ती भटकावं लागलेलं… अशा प्रत्येक निराधारासाठी “सावली” हे केवळ निवाऱ्याचं ठिकाण नाही, तर मायेचा एक जिवंत स्पर्श ठरत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवारा केंद्राने अशा निराधारांना समाजाच्या प्रवाहात परत आणण्याचं काम हळुवारपणे आणि निःस्वार्थपणे हाती घेतले आहे. रिअल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येत असलेल्या या “सावली निवारा केंद्राला” अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. लाभार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या अवस्था समजून घेत त्यांना नव्या उमेदीनं जगण्याची ऊर्जा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजचे वृक्षारोपण आणि संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय असे मत कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी व्यक्त केले. यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे,डॉ.भारती चव्हाण ,वृक्षमित्र अरुण पवार, शिवाजी बुचडे यांनी वृक्ष पुजनाने वृक्षरोपणाची सुरुवात केली. सनफ्लावर पब्लिक स्कूलच्या शाळेतील मुलांनी “वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे” असे म्हणत वृक्षदिंडी काढली,  झाडे शाळेच्या प्रांगणात आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेतही 100 विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाचे कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश लिहीलेला शर्ट घालुन पर्यावरणाचा संदेश दिला. वृक्षरोपणाच्या वेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त म्हणाले कि, आपल्या कुटुंबा प्रमाणे निसर्गावर प्रेम करा,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याची मागणी गेल्या ४५ वर्षापासून सुरू आहे, विधानसभेत याबाबत ठरावही मंजूर झाला आहे. पुण्यामध्ये अनेक सरकारी कार्यालय आणि प्राधिकरणांचे अपिलेट बेंच म्हणजेच अपील न्यायपीठ कार्यरत आहेत, तसेच मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील औद्योगिक विकासाची संबंधित अनेक कायदेशीर बाबी आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपैकी बहुसंख्य खटले पुणे जिल्ह्यातून येतात त्यामुळे पुण्यात खंडपीठ झाल्यास पक्षकारांना मोठा फायदा होईल आणि मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा ताणही कमी होईल. ही केवळ वकिलांचीच नव्हे तर पुण्यातील लाखो सामान्य नागरिकांची अनेक वर्षापासून ची मागणी आहे. परंतु, यावर अद्याप…

Read More

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, तुटलेले पेविंग ब्लॉक यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आज स्थापत्य विभागाचे अधिकारी बालाजी पांचाळ यांच्या सोबत स्थानीक प्रतिनिधी दिनेश यादव यांनी विविध ठिकाणी पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविल्या. रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविणे, आणि पेविंग ब्लॉकच्या दुरुस्तीबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दिनेश यादव यांनी गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.दिनेश यादव म्हणाले की, “नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रथम…

Read More