- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिखली पोलीस स्टेशन मधील सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी चिखली,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –भारताच्या दंडविधानात क्रांतिकारी परिवर्तन घडवणाऱ्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (BSA) या तीन नव्या कायद्यांवर आधारित एक अभ्यासपूर्ण कायदेविषयक कार्यशाळा आज चिखली पोलीस ठाण्यात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. साळुंखे साहेब यांच्या विशेष पुढाकाराने सूचनेनुसार करण्यात आले होते. कायद्याचे सखोल आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी विधीज्ञ, अॅड. मंगेश खराबे यांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कायद्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन – अॅड. मंगेश खराबे यांचे मार्गदर्शन अॅड. मंगेश खराबे यांनी सत्रामध्ये BNS, BNSS आणि BSA या तीन कायद्यांमध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची (अभाब्राम) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवडमधील ९ मान्यवरांना यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या हितासाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवडमधील नऊ मान्यवरांची वर्णी लागली आहे. यामध्ये श्री. पुष्कराज गोवर्धन यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर श्री. दिलीप कुलकर्णी यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे. या प्रमुख पदांमुळे संघटनेच्या महाराष्ट्रस्तरीय धोरणात्मक निर्णयात पिंपरी-चिंचवड शहराचा सहभाग वाढणार आहे. श्री. संजय परळीकर यांना प्रदेश चिटणीस, श्री. अजित देशपांडे यांना प्रदेश प्रवक्ता, आणि श्री. अश्विन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना रोजच्या रोज पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पावना धरण परिसरात त्यांनी “पवना माई”चे जलपूजन करत आंदोलनाचा नारळ फोडला. सध्या पवना धरण हे 90% भरलेले असून, मावळ परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे तिथे पाणीटंचाईचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र, शहराच्या नशिबी अजूनही कोरडाच घसा येतोय. “धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला” अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या वेळी अनेक राजकीय नेत्यांनी पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर महिन्यांनंतरही पिंपरी-चिंचवडकरांना अजूनही नियमित पाणी मिळत नाही. दररोज सकाळीच पाणी द्यावे, संध्याकाळचा पाणीपुरवठा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बेसिक्स टीम व म.न.पा द्वारे हर घर तिरंगा,हर घर स्वच्छता मोहिमे अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी वार्ड 29 मधील मनपा शाळा क्रमांक 54 पिंपळे गुरव येथे जनजागृती करण्यात आली. यावेळी बेसिक टीमचे झोन इन्चार्ज सुखदेव लोखंडे यांनी सांगितले कि,काही वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव असावा,असे आवाहन विविध स्तरांतून करण्यात येत होते. गणपती उत्सवानंतर शहरातल्या नद्या,विहिरी आणि सगळे पाणवठे एकसारखे दिसायचे ते म्हणंजे पाण्यावर तेलमिश्रित रंगांचा तवंग, तरंगणारं निर्माल्य,अर्धवट विघटन झालेल्या मूर्ती, सजावटीचे साहीत्य,प्लास्टिक,थर्माकोल हे असं चित्र दिसायचे म्हणून आम्ही शाळेत जाऊन जनजागृती करण्याचे ठरवले असे लोखंडे यांनी सांगितले. आण्णा जोगदंड म्हणाले की, मूर्ती दान करण्यापासुन ते मुळात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास नियोजन विशेष घटक पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपसंचालक (नगररचना) व आयुक्त,प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याला दिशा देणारा प्रारूप सुधारित विकास आराखडा २०२५ हा केवळ कागदावरचा देखावा असून तो शहरातील जनतेच्या भावना, कायदेशीर बाबी आणि विकासाच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे. तब्बल ५०,००० नागरिकांनी हरकती घेतल्या ही त्याची पावती आहे. भूमिपुत्र, शेतकरी, छोटे कारखानदार, गोरगरिब सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यास हा आराखडा सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने गुरूवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिका…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील साई लक्झरिया सोसायटीने पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल करत 36 kW क्षमतेचा सोलर पॅनल युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सोसायटीत उपस्थित राहून या प्रकल्पाचे उद्घाटन केले. आजच्या काळात वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज आहे. साई लक्झरिया सोसायटीने उचललेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे जाण्याचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी सोसायटीचे माजी नगरसेविका सविता खुळे, चेअरमन सुनील शिंदे, सचिव संदीप क्षत्रिय, खजिनदार पंकज जयदा, देविदास तांबे, गणेश नखाते, स्वप्न…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत स्मार्ट कार्ड सेवा – आता तुमच्या साठी हा विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस विशेष म्हणून वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.मतदान कार्ड ,आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात येणार आहे.योजनेचा शुभारंभ आज योगशिक्षक ,एक्टरेस , चित्रपट, धुमस , दिल बेधुंद, फांजर,अनेक सिरीयल, माझी विठू माऊली , माझी रेणुका माऊली, क्राइम पेट्रोल,लय भारी कारभारी , शॉर्ट फिल्म धाडस अभिनेत्री साक्षी चौधरी, गुरुवर्य माऊली योगा टीचर खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या वेळी त्यांचा श्री…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू नागरिकांसाठी, कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करण्यात यावी. रावेत येथील पात्र लाभार्थी यांना निश्चित किमतीत म्हणजे ६ लाख ९५ हजार रु. किमतीत किवळे गृहप्रकल्पात घरे देण्यात यावीत, लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना २.० अन्वये लाभ देण्यात यावे या मागण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी लवकरच गृह प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर रावेत प्रकल्पातील लाभार्थींची स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासित केले. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळात कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, नरसिंग माने, अमृत…
कामगार मृत्यूस दोषीवर गुन्हा दाखल करून वारसांना १०लाख रु. अर्थसाह्य द्या – कामगार नेते काशिनाथ नखाते
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कामगार यांचे जीवन असुरक्षित असून नांदेड सिटी पुणे येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये महानगरपालिका ठेकेदार, अधिकारी यांच्या अक्षम्य चुकामुळे कामगार मृत्युमुखी पडलेला आहे संबंधित दोषींवरती गुन्हा दाखल करून मृतांच्या वारसाला १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे व जखमीना उपचारासह अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे. कष्टकरी संघर्ष महासंघ तर्फे आज भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम तसेच कामगार उप आयुक्त निखिल वाळके यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक सुनील भोसले, सलीम डांगे, महादेव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील पि.के. चौक परिसर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी, अव्यवस्थित सिग्नलिंग आणि सतत घडणाऱ्या अपघातांच्या घटना यामुळे नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या ठिकाणी थेट पाहणी दौरा केला. पिंपळे सौदागर येथील पि.के. चौक हा शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने व्यस्त ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी कामावर जाणाऱ्या व परत येणाऱ्या नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच हलक्या व जड वाहनांच्या संमिश्र प्रवाहामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक…
