- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्था मर्यादित, सन २०२३–२०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीनंतर दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये शिवाजी येळवंडे यांची चेअरमनपदी, ज्ञानेश्वर शिंदे यांची व्हा. चेअरमनपदी, विश्वनाथ लांडगे यांची सेक्रेटरीपदी व अभिषेक फुगे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत (जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर १) यांच्या अध्यक्षतेखाली व कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक, विनम्र आणि तत्पर सेवेच्या धर्तीवर चालवण्याचा संकल्प केला आहे. सभासदांना बचतीसाठी प्रोत्साहित…
आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानले आभार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाचा पवित्र सण पिंपरी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी विधानसभा क्षेत्रातील शाहू नगर,संभाजीनगर, दत्त नगर विद्यानगर,मोरवाडी परिसरातील महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राख्या बांधल्या. या खास कार्यक्रमात ५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी केवळ आमदार गोरखे यांनाच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बंद लिफाफ्यातून १००० हून अधिक राख्या पाठवून एक अनोखा उपक्रम राबवला. या राख्यांमध्ये महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांबद्दल आभार व्यक्त केले. महिलांनी मुख्यमंत्री…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड, पुणे येथे (शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी) महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या वतीने “५वी नोटरी परिषद २०२५”संपन्न झाली . परिषदेची सुरुवात संविधान दिंडीने झाली या दिंडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सामील झाले. या नोटरी परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती संदीप.व्ही. मारणे, न्यायमूर्ती आरिफ एस.डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे एस.के.महाजन, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे,ॲड.राजेंद्र उमाप ( मा चेअरमन ) आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी न्यायमूर्ती वराळे म्हणाले की.नोटरींचे कार्य हे नोबल असून नोटरींनी त्यांच्या कामामध्ये शिस्तबद्धता…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे थोर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे,सहाय्यक आरोग्याधिकारी सुधीर वाघमारे,अंकुश झिटे,सामाजिक कार्यकर्ते आसाराम कसबे तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. चिंचवड गावातील दामोदर हरी चापेकर यांनी बाळकृष्ण आणि वासुदेव…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत देशप्रेम, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरकता यांचा सुंदर संगम घडवणारा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेह लडाखमधील आपल्या वीर जवानांसाठी स्वतः हाताने राख्या तयार करून पाठवल्या आहेत. हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांच्या संकल्पनेतून व शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि माजी मुख्याध्यापिका शैला मातेरे यांचा विशेष सहभाग आहे. मातेरे या पर्यटक म्हणून लेह-लडाखला जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यावर त्यांनी सैनिकांसाठी राख्या तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विद्यार्थ्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा स्नेहमेळावा रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 सायंकाळी 4 ते रात्री 10 यावेळेत आचार्य आत्रे सभागृह, संत तुकारामनगर येथे होणार आहे. यावर्षी संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्ष असून या स्नेहमेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेत व डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका निर्मलाताई कदम, विजया सुतार, अश्विनी जाधव उपस्थित रहाणार आहेत. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु, लहान मुलांचे तसेच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दहावी, बारावी तसेच विविध परिक्षांमध्ये उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.तरी सर्व कोकण खेड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडेनगर येथील चिंतामणी चौकातील पीएमआरडीए ग्राउंड येथे समस्त खान्देश बांधव कानबाई माता उत्सव समिती आणि श्री कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आई कानबाई माता सार्वजनिक उत्सव २०२५’ उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. उत्सवात कोणताही राजकीय गट किंवा नेत्याचे वर्चस्व न राहता, सर्व पक्ष व सर्व विचारधारांचे लोक एकत्र आले होते. यामुळे कार्यक्रमात सामंजस्य, सहकार्य आणि सौहार्दाचे वातावरण होते. “कानबाई माता नाही कोणा एकाची आहे समस्त खान्देशाची” ही भावना कार्यक्रमभर दिसून आली. तीन दिवस चाललेल्या या उत्सवात पारंपरिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गहू दळणे, सप्तपूजन, कीर्तन, भजन, आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणासाठी अडथळा ठरणारी एक हजार झाडे तोडण्यात येणार असून, पालकमंत्री म्हणून ती रोखावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली असता उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार चिडले. ‘कोणीही उठतो, उपदेश करतो. सर्व मक्ता मीच घेतला आहे. हे सगळे ऐकल्यावर कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटते,’ अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. चिंचवड येथे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, वनांसाठी काम करणारे आसाम येथील जाधव पायांग या वेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सुसंस्कृत समाजाच्या योगदानातून राष्ट्राची उन्नती होत असते. त्यासाठी तरुण पिढीमध्ये बंधुभाव रुजायला हवा. बंधुता मूल्यातून एकोप्याची भावना, सुदृढ समाजाची निर्मिती होत असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व मूल्याचे महत्व रुजण्यासाठी प्रयत्नशील असावे,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. विश्वबंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाराव्या विश्वबंधुता विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. मेनकुदळे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अविनाश सांगोलेकर, स्वागताध्यक्ष डॉ पांडुरंग भोसले, कवी डॉ. अशोककुमार पगारिया, साहित्यिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरण, महापालिका आणि लघुउद्योग संघटनेची संयुक्त बैठक घेण्याची गरज आहे. विविध भागांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, अंडरग्राउंड केबल्स टाकणे, फिडर विभाजन करणे व गैरप्रकार रोखण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांची कार्यक्षम नेमणूक करून वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सचिव जयंत कड व संचालक प्रमोद राणे यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक परिसरात महावितरण विषयी येणाऱ्या अडचणीचे निवेदन दिले. या प्रसंगी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, संचालक पालीवार,…
