- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनानिमित्त औंध जिल्हा रुग्णालय परिसरात शिवसेना युवासेना तर्फे विशेष स्वच्छता व सुशोभिकरण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व मेघराज लोखंडे उपजिल्हाप्रमुख युवासेना (मावळ लोकसभा) यांनी केले. मोहीमेत रुग्णालयाचा मुख्य प्रवेशद्वार, वॉर्ड परिसर, बाग, पथमार्ग, पार्किंग क्षेत्र यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील झाडांची छाटणी, कचरा व्यवस्थापन आणि फुलझाडांची लागवड करून वातावरण अधिक आकर्षक बनविण्यात आले. या उपक्रमात युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि हॉस्पिटल कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गौरव जगताप, जॉय चोपडे, हर्षद शिंदे, आर्यन मसुरे, अमन शेख, तन्मय सुतार, शंतनू नांगरे, धम्मदीप गायकवाड, संग्रामसिंग लोधा आणि चैतन्य जाधव यांनी…
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले – गोरक्षकांवरील खोट्या केसेस आम्ही खपवून घेणार नाही! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे आता गंभीर दृष्टीकोनातून पाहण्याची वेळ आली आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राजधानी नवी दिल्ली रिजनसाठी दिलेल्या निर्णयाच्या धर्तीवर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. तसेच, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनाही सूचना केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दि.11 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश पारित केला असून, त्यानुसार नवी दिल्ली व एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) क्षेत्रामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे निर्माण…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आज तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधूनआयोजन करण्यात आले होते.गेल्या 13 वर्षांपासून शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेतला जात असून शिवलीलामृत ग्रंथ पारायणमध्ये परिसरातील असंख्य महिला भगिनी सहभागी झालेल्या होत्या. या प्रसंगी ग्रंथांचे पुजन व दीपप्रज्वलन माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते करून या पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शिवलीलामृत ग्रंथ पारायणमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत करून मनाच्या शांततेसाठी अशा पारमार्थिक कार्यक्रमाचे आयोजन खूप महत्वाचे आहे असे सांगितले.…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगातील सुख, शांती, समाधानाचा संदेश सर्वश्रेष्ठ विश्व प्रार्थना माऊलींचे मागणे अर्थात पसायदान होय. विश्वातील सर्व सुखाच्या शिखरावर विराजमान व्हावे, सर्वानी सत्कर्मात रमावे, या साठी विश्वात्मक देवास माऊलींनी केलेली प्रार्थना म्हणजेच विश्व प्रार्थना पसायदान या पसायदान कोनशिलेचे इंद्रायणी नदी घाटावर अनावरण करीत लोकार्पण हरिनाम जयघोषात करण्यात आले. यातून संत साहित्याचा प्रचार प्रसार उपक्रम जनजागृती आणि सेवा कार्यातून राबविला जात आहे. अलंकापुरीतील इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी नगरसेविका उषाताई नरके, अनिता शिंदे, सरस्वती भागवत, ताई देवरे, रुख्मिणी कदम, नीलम कुरधोंडकर, शैला तापकीर,…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चेतन भोळे यांच्या नेतृत्वाखाली ह्दयविकाराच्या तरुणाला वारंवार चक्कर येण्याच्या तक्रारी होत्या या रुग्णावर अत्याधुनिक कंडक्शन सिस्टीम पेसमेकर बसविण्यात यश मिळवले. ही प्रक्रिया पारंपरिक पेसमेकरला एक सुरक्षित आणि अधिक नैसर्गिक पर्याय देणारी आणि लक्षणीय प्रगती साद्य करणारी ही नावीन्यपूर्ण थेरपी हृदयरोगावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. यापूर्वी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झालेल्या या तरुण रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय नलावडे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला, उपचार योजनेत पारंपरिक पेसमेकरचा समावेश होता. तथापि, रुग्णाचे तरुण वय आणि नियमित पेसमेकरशी संबंधित संभाव्य हृदयबंद पडण्यासारखे धोके लक्षात घेऊन डॉ. भोळे यांनी…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील प्रभाग क्रमांक २७ मध्ये गेली अनेक वर्षे रखडलेले महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईनचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. हे महत्त्वाचे काम आमदार शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व आप्पा तांबे यांच्या विशेष पुढाकाराने मार्गी लागले. रहाटणीतील के.के. अंजना सोसायटी येथे या गॅस पाईपलाईनचे उद्घाटन रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले, ज्यामध्ये महिलांना खास भेट दिली गेली. यावेळी सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, सभासद आणि आप्पा तांबे उपस्थित होते. स्थानिक महिलांनीही यावेळी समाधान व्यक्त केले. मात्र, काम सुरू असताना काही अल्पसंख्य लोकांनी अडथळा निर्माण करत काम थांबवण्याचा प्रयत्न केला. पायवाटीवर काम होत असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी विरोध दर्शवला.…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन आणि सांस्कृतीकदृष्ट्या समृद्ध आहे. तिला हजारो वर्षांचा वारसा असून, मराठी साहित्य, नाटकं, गाणी अत्यंत विलोभनीय आहेत. त्यामुळे परराज्यातून शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रीयन जेवण सर्वांनाच आवडते, त्यामुळे मराठी माणसाशी, मराठीत बोलल्यास तो दोन घास अधिक प्रेमाने वाढतो, अशी कोटी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी अस्खलित इंग्रजी भाषेत केली आणि येथील स्वामी विवेकानंद सभामंडपात हजारो विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा एकच कडकडात झाला. डाॅ.गोऱ्हे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या १०व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी, व्यासपीठावर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) वैज्ञानिक…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्नति सोशल फाऊंडेशनच्या आवारात (रविवार, दि. १० ऑगस्ट) सकाळी १० वाजता “समरसत रक्षाबंधन” कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकल पिंपळे सौदागर बंधू आणि भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बंधुता, स्नेह आणि ऐक्याचा संदेश दिला. कार्यक्रमात बहिणींनी बंधूंना राखी बांधून परस्परांतील आपुलकी व स्नेहाची परंपरा जपली. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, जयनाथ काटे, पि. के. स्कुलचे संस्थापक जग्गनाथ काटे, चॅलेंजर स्कुलचे संस्थापक संदीप काटे, न्यू सिटी प्राईड स्कूलचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं यामध्ये पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला यानंतर पहाटे चार ते सहा या वेळात प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला यांनी आपली गायन सेवा बाप्पा समोर सादर केली. यावेळी त्यांनी विविध भक्ती गीते सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली. यानंतर गणेशा सहस्त्रावर्तन आधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिर रागीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली अंगारकी चतुर्थी निमित्त परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली.
