- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचार मिळणार आहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील तीन रुग्णालयांमध्ये या ओपीडी (OPD) तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वायसीएम रुग्णालयातील आयुर्वेदिक ओपीडी बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार गोरखे यांनी विधानपरिषदेमध्ये लक्ष वेधले होते. आयुक्तांनी देखील या संदर्भात प्रामुख्याने लक्ष घातले होते. या मागणीनंतर झालेल्या आयुक्तांच्या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांना आता स्वस्त आणि सोप्या पद्धतीने उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर निगडी-दापोडी अर्बन स्ट्रीट प्रकल्पातील निकृष्ट कामाची चौकशी करून…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत वेळ जातो. त्यासाठी न्हावा शेवा बंदरात रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो) सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची खासदार बारणे यांनी दिल्लीत भेट घेतली. खासदार बारणे म्हणाले, पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या औद्योगिक पट्ट्यात ११ हून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आता समाजातील गरजू घटकांना कर्ज मिळवणे अधिक सोपे होणार असून, महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या हजारो कर्जांना तातडीने मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अमित गोरखे यांनी या प्रश्नावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली होती. तसेच, विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेअंतर्गत देशभक्तीची भावना जागृती करणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज ‘भारत गौरव गाथा – देशप्रेमाच्या स्वरलहरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमालाही रसिक श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. अशा प्रकारचे देशभक्तीपर उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांमधील एकता आणि देशाभिमान वाढवणारे ठरत आहेत, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवान्वये केंद्र सरकारकडून सन २०२२ पासून ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदाही ही मोहीम २ ते १५ ऑगस्ट २०२५ या काळात आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेने या काळात लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ड आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पवना नदी पुलापासून मुळा नदी पुलापर्यंत अंदाजे ७ किलोमीटर लांबीच्या मुख्य महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या २४ मीटरपर्यंतच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. यासाठी ११० बांधकामांना नोटीस देऊन कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ड क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, ब क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात…
राज्यभरातील ५२ हजार दुकानदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शिधावस्तूंचे वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयांतर्गत दुकानदारांना अपेक्षित कमीशन वाढ झाली नसली तरीही, राज्यभरातील दुकानदारांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. दुकानदारांच्या कमीशन वाढीसाठी आम्ही पुन्हा सरकारला साकडे घालणारच आहोत. सध्यातरी आम्ही सर्व दुकानदार महायुती सरकारचे आभार मानतो. आता भरीव कमीशन वाढीसह आमच्या उर्वरित मागण्यादेखील लवकरच मंजुर होतील, असा आशावाद ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्न घेऊन आज आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा धडकला. पोलीस प्रशासनाने शिष्टमंडळाची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी भेट घडवून दिली मंत्र्यांनी मागण्यावर सविस्तर चर्चा केली असता त्यानी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आणि त्यासाठी लवकरच बैठकीच्या आयोजन करू असे आश्वासन दिले. बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समितीचे सागर तायडे, कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला . यावेळी वर्धा चे प्रशांत रामटेके,धाराशिव चे आनंद भालेराव, यवतमाळचे रत्नपाल डोफे,मुंबईच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागविणे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश देण्यासाठी आज (१२ ऑगस्ट) महात्मा फुले महाविद्यालय,पिंपरी येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात पार पडली. रॅलीचे नेतृत्व प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, गणेश भांगरे ( एनएसएस कार्यक्रम अधिकारी), लेफ्ट. प्रसाद बाठे ( एनसीसी ए.एन.ओ.), महाविद्यालयाचे तिन्ही विद्याशाखा उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. संगीता आहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे व कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक सौ. रुपाली जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसी व एनएसएस विभागातील अधिकारी,महाविद्यालयीन शिक्षकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी आणि…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्न घेऊन आज आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा धडकला. यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेत कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट करावे, कामगारांना नुकसानकारक असणारे तालुका सुविधा केंद्र बंद करा, मंडळास ई प्रशासन धोरण लागू करा, कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करा शासन आदेशानुसार कामगार संघटने कडून अर्ज स्वीकृती प्राधान्य देण्यात यावे व कामगार पडताळणी संख्या दररोज ३०० करावी या प्रमुख मागण्यावर मंत्र्यांनी सविस्तर चर्चा…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विरश्री शाखा राष्ट्रसेविका समिती पिंपळे सौदागर यांच्या वतीने चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ‘राखी’ या पवित्र धाग्याद्वारे प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे नाते दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात समितीच्या सेविकांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना राख्या बांधून समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य, बंधुभाव आणि सेवा भावना वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमात बोलताना शाळेचे संचालक श्री. संदीप काटे यांनी रक्षाबंधनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ उलगडून सांगितला. त्यांनी या सणातून मिळणाऱ्या ‘बंधुभाव, परस्पर सन्मान व जबाबदारी’ या मूल्यांचा जीवनात अंगीकार करण्याचा संदेश दिला. या प्रसंगी शाळेचे वातावरण…
