- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतात ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर केला जात आहे. समाजोन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास केल्यामुळे लोक कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत मिळते. गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित होत असून यामुळे देश प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. नव तंत्रज्ञान विकसित भारतासाठी उपयुक्त ठरते आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि आयईईई यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या पाचव्या ‘एशियाकॉन -२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयटी अभियांत्रिकीचा विकास झपाट्याने होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट बॉट, चॅट जीपीटी हे शब्द परवलीचे झाले असून तीन चार वर्षांत तंत्रज्ञान बदलत आहे. याचा विचार करून आपली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. तरच भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे सामोरे जाऊन यश संपादन करता येईल, असे मार्गदर्शन सोगिती कॅपजेमिनीच्या वरिष्ठ संचालक कांचन भोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पीसीईटी संचालित पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते मावळ येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‘दीक्षारंभ’ समारंभाचे आयोजन सोमवारी (२५ ऑगस्ट) करण्यात आले होते. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. महात्मा गांधींचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे काळे यांनी सांगितले. त्यांनी आयुक्त, उपायुक्त (जनसंपर्क विभाग) तसेच जनता संपर्क अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधावा, असे आवाहन केले आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाचे स्वरूप, स्थळ, वेळापत्रक, मान्यवर अतिथी निमंत्रण, प्रसारमाध्यमे आणि जनजागृती या सर्व बाबींसाठी नियोजन बैठक घेण्याची मागणी करण्यात आली…
पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे निलख येथील बालगिर्यारोहक साई सुधिर कवडे वय वर्ष १६ याची लेह लदाख येथील कांगयात्से १ व कांगयात्से २ याशिखरांवर चढाई करण्याची मोहिम होती. कांगयात्से शिखरं लदाख मधिल मर्खा खोऱ्यात येतात ११ दिवसांच्या या मोहिमेत एकूण १५ सभासद होते .. वातावरणाशी जुळवण्यासाठी प्रथम लेह मधे एक दिवस विश्रांती घेत शांती स्तुप ला भेट देऊन मोहिमेला लेह मधुन सुरवात झाली. लेह पासुन गाडीने तीन तासांचा प्रवास करत स्कियु ला पोहचण्यात आल,सुंदर अश्या मर्खा व्हॅली मधे छोट मोठ्या हिमनद्या पार करत चार दिवसानंतर सर्व टिम कांगयात्से शिखराच्या बेस कॅंप ५१०० मिटर ला दाखल झाली…. कांग यात्से…
गणपती काळात मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणे आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडल्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ७७ तक्रार वजा सूचना प्राप्त पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७७ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ,…
गणेशोत्सव तयारीसंदर्भातील महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत विसर्जन घाट नियोजन, वाहतूक, स्वच्छता व सुरक्षेसह विविध उपाययोजनांबाबत देण्यात आले निर्देश पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा उत्सव साजरा होत असून, या अनुषंगाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट तसेच इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यांसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून उत्सव मूर्तींचे विसर्जन करण्यात येणाऱ्या…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेली विकासकामे आणि पक्षाची ध्येय धोरणे घराघरापर्यंत पोचवा असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृहाचे आवारात झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे, काळूराम मालपोटे, लक्ष्मणराव बालगुडे, भरत येवले, नारायण पाळेकर, दीपक हुलावळे, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रवीण झेंडे, रवी पोटफोडे, प्रवीण ढोरे, युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आजवर अनेक मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले; परंतु निवासस्थानी येऊन शब्दधन काव्यमंचाने केलेल्या सन्मानाने मनात कृतार्थतेचे भाव दाटून आले आहेत!’ असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी मित्रमंडळ कॉलनी, पर्वती, पुणे येथे काढले. पिंपरी – चिंचवड परिसरातील रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शब्दधन काव्यमंच या संस्थेमार्फत ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमांतर्गत बबन पोतदार यांना ह. भ. प. दत्तात्रयमहाराज दीक्षित यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, अशोकमहाराज गोरे, मुख्याध्यापक अंबादास रोडे, विजया पोतदार आणि शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी नदीवरील विसर्जन घाटांची पाहणी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली. या पाहणीस आरोग्य विभाग, स्थापत्य विभागाचे तसेच विद्युत विभाग अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. शत्रुघ्न काटे यांनी गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी सर्वंकष उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यामध्ये घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसविणे, प्रत्येक विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी गणपती आरती करण्याची व्यवस्था करणे,घाटावर आवश्यक अशी विद्युत दिवे लावणे,गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाची रंगरंगोटी करून स्वच्छ व नीटनेटके करणे,अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास एक रुग्णवाहिकेची व्यवस्था, सुरक्षारक्षक नेमणे तसेच विसर्जन घाटावर नियमितपणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघातील साने चौक, मोरे वस्ती येथे मशाल मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काँग्रेसच्या विविध मागण्यांसाठी व जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मशाल मोर्चात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके, ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबा बनसोडे, आदरणीय शहर जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास कदम, महिला नेत्या आशा भोसले, युवा नेते सतीश भोसले, श्री. लोहार समृद्धी आणि आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या हातात मशाली आणि घोषणा देत त्यांनी सरकारविरोधात आपला निषेध नोंदवला. स्थानिक…
