Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील काही वर्षांत भारताने विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकास केला आहे. नवकल्पना, निर्मिती, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन मायक्रो इलेक्ट्रॉनिक पॅकिंग इनोव्हेशन्सचे पुरस्कर्ते प्रा. राव तुमाला यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे नवव्या ‘आयसीसीयुबीईए-२५’ आणि चौथ्या ‘आयमेस-२५’ या दोन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. ही परिषद दोन दिवसांची असून ‘संगणन, संप्रेषण, नियंत्रण आणि ऑटोमेशन’ तसेच ‘यांत्रिक अभियांत्रिकी मधील नवकल्पना’ या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सादरीकरण आणि चर्चासत्र होणार…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्टफिशिअल तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सकारात्मकरित्या केल्यास आपण कामे प्रचंड वेगाने करू शकतो. एआय विधायक रित्या वापरल्यास मानवासमोरील अनेक दुर्दम्य संकटे सोडवू शकते. एआय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी, त्याला कायमच मानवी स्पर्शाची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे, भविष्यात एआयला संकट न समजता, संधी समजावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचे अधिष्ठाता डाॅ.नचिकेत ठाकूर यांनी केले. ते येथे आयोजित डिजाईन सिंक या एकदिवसीय परिषदेत बोलत होते. या परिषदेसाठी, गुगलच्या युएक्स संशोधक केतकी आगाशे, ट्युरिंग लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोठारी, लँडोर या कंपनीचे डिजाईनर आर्यन शर्मा, सिमरन चोप्रा आदी उपस्थित होते. डाॅ.ठाकूर पुढे म्हणाले, एमआयटी एडीटी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचणे व ओलसरपणाचे प्रमाण वाढले असून डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलन मोहिमेला गती दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. पावसामुळे घरांच्या अंगणात, छपरांवर, बांधकाम स्थळांवर, भंगाराच्या ठिकाणी तसेच विविध कंटेनरमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. हे थांबवण्यासाठी औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर विशेष भर देण्यात आला आहे.…

Read More

स्त्रीरोग, बालरोग व मेडिकल विभागासह डायलिसिस सेंटर, आयसीयू, एनआयसीयू पूर्ण क्षमतेने कार्यरत पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने २५० बेड क्षमतेसह तालेरा रुग्णालय आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाले आहे. येथे स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, मेडिकल विभाग, डायलिसिस सेंटर, अतिदक्षता विभाग (आयसीयू) तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सर्व सुविधा संपूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामुळे महिलांना वेळेवर आवश्यक तपासण्या व उपचार सहज मिळू शकतील. बालरोग विभाग सुरू झाल्यामुळे लहान मुलांच्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य व दर्जेदार उपचार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बहुप्रतीक्षित भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज करण्यात आली आहे. गणेशोत्सवाचे शुभमुहूर्त साधून पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष , ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी 126 पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्व घटकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे. ही कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी शहराध्यक्ष काटे यांनी पक्षाच्या कार्यालयात 300 हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, शहरातील प्रमुख स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून ही कार्यकारिणी तयार करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडी प्राधिकरण येथील घरी गणपती बाप्पांचा आगमन झालंय पर्यावरण पूरक असलेली ही मूर्ती सोनाली स्वतः बनवते. यावर्षी निसर्गाचा रूप आणि समतोल साकारण्याचा प्रयत्न सोनालीनं केलाय. संपूर्ण महाराष्ट्र खड्डे मुक्त व्हावा यासाठी बापाकडे तिनं साकडं घातलंय. आज माध्यमांशी बोलताना सोनाली कुलकर्णीनं सांगितलं की, यंदा हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पाचे मुख प्रकट होतंय अशा पद्धतीनं मूर्तीची रचना केलेली आहे. त्याचं कारण असे की,अशाच पद्धतीच एक चित्र आम्ही पाहिलं होतं, जर हे चित्र सुंदर दिसत असेल तर याचे मूर्ती देखील खूप सुंदर होईल हा विचार करून भाऊ अतुल कुलकर्णी यांच्यासह मूर्तीची…

Read More

पुण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात फुलांनी सजविलेल्या रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या जय गणेश प्रांगण येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे पिंपरी-चिंचवड येथील दापोली-मडनगड सेवा भावी संस्थेच्या वतीने कोकणवासीयांसाठी एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजेश दळवी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त प्रयत्नातून वल्लभ नगर (पिंपरी) ते मडनगड, दापोली या मार्गावर दि. २५ ऑगस्ट रोजी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित, विनामूल्य आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. या बससेवेचा अनेक कोकणवासीयांनी लाभ घेतला आणि संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन, प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा, आणि वेळेचे पालन यामुळे या उपक्रमास…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या अकरावीमधील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. त्याचे उद्घाटन पुणे विभागीय शिक्षण संचालक गणपत मोरे ,व्याख्याते व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख, संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावरती खजिनदार डॉ . भूपाली शहा ,संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल कुमार शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी डॉ. पौर्णिमा कदम,कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व ज्युनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . वनिता कुऱ्हाडे ,कला, वाणिज्य, विज्ञान विभाग प्रमुख प्रा .वैशाली देशपांडे ,प्रा. जस्मिन फरास…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी, ता. हवेली (जि. पुणे) येथील चंद्रभागा लॉन्समध्ये हिंदू मिलन समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. समाजातील एकता, बांधिलकी आणि परस्पर सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून हिंदू युवा वाहिनी प्रदेश प्रभारी व उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी आमदार श्री. राघवेंद्र प्रताप सिंह यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचे महत्व अधोरेखित केले. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकत एकत्रितपणे सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…

Read More