- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून रहाटणीतील श्री गणेश भक्तांसाठी विसर्जनासाठी कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने रहाटणी लिंक रोडवरील छत्रपती चौक येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम हौद आणि श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, “गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. POP मूर्ती आणि प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय निवडावा. पर्यावरण संवर्धन आणि गणेश भक्तांचा उत्साह यांचा समतोल राखण्यासाठी हा…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन १५३ बॅगचे रक्त संकलन झाले. गणेशोत्सवा निमित्त आज पर्यंतच्या झालेल्या रक्तदानाच्या जास्तीच्या बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. संजीवनी रक्तपेढी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ११ वे वर्षे आहे, या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषता रक्तदान केले, तसेच काही कुटुंबांनी एकत्रित रित्या रक्तदान केले. यामध्ये सोसायटी चे अध्यक्ष- विशाल कुलकर्णी, सचिव – साकेत भलगट, खजिनदार- चंद्रशेखर शिरसागर…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या हस्ते आरती करण्याची परंपरा उन्नतीने कायम ठेवली आहे. यंदा या परंपरेला पुढे नेत, रविवारी (दि. ३१) सकाळच्या आरतीचा मान शहराचे नाव स्वच्छतेच्या बाबतीत उंचावणाऱ्या सफाई कामगार महिलांना देण्यात आला. याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद, आनंद हास्य क्लबचे सभासद, ऑल सिनियर सिटिझन्स असोसिएशनचे सदस्य, तरुण वर्ग तसेच पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात समानतेचा, ऐक्याचा आणि सन्मानाचा संदेश दृढ होत असून, गणेशोत्सव…
साई साहेब सोसायटीचा आदर्श उपक्रम, पिंपळे सौदागर पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल करीत सौरऊर्जेच्या वापराला दिले प्रोत्साहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरातील साई साहेब सोसायटी येथे उभारण्यात आलेल्या,35 KW क्षमतेचे नूतन सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. सोसायटीच्या रहिवाशांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वीज बचतीसाठी पुढाकार घेतला असून, या प्रकल्पामुळे केवळ वीज खर्चात बचत होणार नाही तर हरित ऊर्जा वापराच्या माध्यमातून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीस देखील मदत होणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “सौर ऊर्जा ही आजच्या काळाची गरज आहे.ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून नागरिकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या गर्दीत या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासन मात्र निष्क्रिय आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी केला आहे. या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे काल शुक्रवार, दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून महापालिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाचे मार्गक्रमण मुंजोबा चौक वाल्हेकर वाडी येथून सुरू होऊन चिंचवड, काळेवाडी, सांगवी, वाकड, डांगे चौक, रावेत, देहूरोड, प्राधिकरण, आकुर्डी, पिंपरी, भोसरी, मोशी, चिखली, निगडी आदी प्रमुख भागातून होत थरमॅक्स चौक येथे समारोप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील साई साहेब सोसायटीत माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. पिंपळे सौदागर मधील सोसायट्या पैकी साई साहेब सोसायटी एक आहे. येथे जवळपास १३२ सदनिका आहेत या सोलर इनर्जी नार्फ ६० kv वीज निर्मीत केली जाणार आसुन. त्यामुळे सोसायटीला येणाऱ्या महावितरणच्या बिलामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होऊन रहिवाश्यांची आर्थिक बचत होणार आहे. हे सोलर सिस्टीम बसविण्याचे काम सोलारटेक या कंपनीमार्फत करण्यात आले. यावेळी साई साहेब सोसायटीचे कमिटी मेम्बर श्रेयश बेल्लारी, शिवराम लटपटे, प्रितम पाटील, आतम मताई , स्मिता लाढे, चेतन विसल, अमित बुटले, आमोल पाटील,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते. २०१८ साली त्यांची प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. माजी शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीत २०२३ पासून ते शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. संघटन कौशल्य, युवा आक्रमक चेहरा आणि पक्षाप्रती निष्ठा यामुळे त्यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असल्याचे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कुणाल लांडगे यांना नियुक्ती पत्र देताना सांगितले. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या एकमुखी पाठिंब्याने…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अथर्वशीर्ष पठण हा केवळ धार्मिक विधी नसून त्यामध्ये स्वदेशी वर आधारित स्वयंपूर्णतेचा गाभा आहे. पंचमहाभूतांच्या संगोपनातून मानवकल्याणाची आराधना आहे. बुद्धी, शक्ति, एकता आणि कर्तव्य या चार सूत्रांचा आधार घेत आपण जर विकासमार्गावर वाटचाल केली, तर भारत ‘विश्वगुरू’ होणार आहे.” श्री गणेशोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, स्वा. सावरकर प्रतिष्ठान ,स्वा. सावरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “सामुहिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संभाजीनगर (चिंचवड) येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या छ. संभाजीराजे सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार…
हडपसर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयतच्या चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त गणेशमूर्ती तयार करण्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थिनींनी स्वयंकल्पकतेने सुबक व सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या. विद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील,उपमुख्याध्यापक आनंदराव करे,पर्यवेक्षिका तृप्ती पाटील,मंदाकिनी शिंदे,पौर्णिमा सावंत,आजीव सदस्य लालासाहेब खलाटे,आजीव सेवक तुकाराम डोंगरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.कलाशिक्षक धनेश पवार व राजेंद्र आडमुठे यांनी विद्यार्थिनींना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडली.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांच्या आरोग्यासाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड सचिव चंद्रशेखर अशोक जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जाधव यांनी नमूद केले की, मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात राज्यभरातून आलेले हजारो आंदोलक जमले असून, या आंदोलनादरम्यान आंदोलकांना उष्माघात, रक्तदाब, श्वसनाचे त्रास यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यासाठी तातडीने त्यांच्यासाठी वैद्यकीय उपाययोजना आवश्यक आहेत. यासंदर्भात जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये आझाद मैदानात तात्पुरता वैद्यकीय कॅम्प स्थापन करावा, २४ तास कार्यरत राहतील असे…
