Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रोट्रॅक्ट क्लब, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन यांच्या वतीने नुकतेच पीसीईटी शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगर व रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे समन्वयन दिंभा फाउंडेशनने केले. या शिबिरामध्ये पीसीईटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. शिबिराचे आयोजन यश नेहरकर, अजित मिटकरी, रुतुजा थिटे, राधिका मंत्री, मंथन जाधव व आदित्य जगदाळे या एस. बी. पाटील सीओएडी रोट्रॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले. प्राचार्या डॉ.…

Read More

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांची इंद्रायणी आरतीस मोठी गर्दी झाली होती. आळंदी मंदिरात भाविकांनी परिवर्तिनी एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आल्याचे आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक रुग्ण निवड (Advanced Triage Facility) आणि पुनर्जीवन सुविधा (Resuscitation Facility) उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आपत्कालीन सेवांना बळकटी मिळणार आहे. डाना टीएम फोर इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डाना टीएम फोर इंडिया लिमिटेडचे प्लांट हेड शिवाजी निळकंठ, एचआर व प्रशासन विभागाच्या प्रमुख योगिता सुषीर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नियोजित ट्रायेज सुविधेमुळे रुग्णांच्या प्रकृतीच्या गंभीरतेनुसार त्यांचे जलद मूल्यमापन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी, नाले व तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये १०३ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कुंडांमध्ये गणेशोत्सव सुरू झाल्यापासून सात दिवसांत आज दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास ५२ टन निर्माल्य संकलित करण्यात आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाने आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून निर्माल्य संकलनाची काटेकोर व्यवस्था केली आहे. या निर्माल्याचा कंपोस्ट व सेंद्रिय खत निर्मितीसाठी पुनर्वापर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवाचे स्वागत अनेक ठिकाणी विविध उपक्रमांनी केले जाते, पण काही ठिकाणी हा उत्सव वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. अशाच एका आगळ्या दिव्यांग मुलांच्या शाळेत, आभिराज फाउंडेशन मध्ये, गणेश स्थापना मोठ्या जल्लोषात पार पडली. या वेळी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष  मधुकर बच्चे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यांच्यासोबत सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, सलीम सय्यद, सल्लागार रवींद्र सांगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थी आणि शिक्षक वर्गानेही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. वुई टुगेदर फाउंडेशनचे सदस्य वेळोवेळी आभिराज फाउंडेशनमध्ये येऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करतात. यावेळी अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कला, आवडीनिवडी जाणून…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन अनेकांना प्रत्यक्ष घेता आले नसले, तरी आॅनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक घेत आहेत. महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, बंगळुरु, ठाणे, नाशिक, सूरत, नागपूर या शहरांतून गणेशभक्त वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर बाप्पाचे दर्शन घेत आहेत. तर, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, दुबई, जर्मनी, आॅस्टेÑलियासह थायलंडमधून देखील ट्रस्टच्या सोशल मीडियावर तब्बल ५० लाखांहून अधिक गणेशभक्तांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे.…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पुणे फेस्टिव्हलचा करंडक सलग दुसऱ्या वर्षी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला. व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील महाविद्यालयांत चुरशीचा सामना झाला. त्यामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाने विजेतेपद मिळवले. स्पर्धा २५ ते ६० आणि ६१ प्लस अशा दोन वयोगटांत झाली. मराठी, हिंदी तसेच गझल-सुफी गटांमध्ये एकूण २५ स्पर्धकांनी अंतिम फेरीत सहभाग घेतला होता. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या अतिरिक्त आयुक्त. (गुन्हे अन्वेषण) पंकज देशमुख, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते करंडक…

Read More

गणेश मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करुन बनविणार कुंंड्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा उत्सव असून, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी पिंपरीत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला जात आहे. ॲस्पिरिफाय एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने गेल्या सहा वर्षांपासून सामूहिक गणेश विसर्जनाची मोहिम हाती घेतली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पी.ओ.पी.) च्या मूर्तींवर केमिकल प्रक्रिया करून त्यापासून कुंड्या तयार केल्या जातात व त्या मोफत शाळा आणि सामाजिक संस्थांना वितरित केल्या जातात. यावर्षी आतापर्यंत तब्बल २७०० मूर्तींचे विसर्जन झाले असून, किमान ६० हजार मूर्ती विसर्जित होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षी (२०२४) ४४ हजार मूर्तींचे विसर्जन झाले होते.…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा ,बेसिक टिम ,ड प्रभाग आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे गुरव येथील गणेश विसर्जन घाटावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगारांबरोबर स्वयंस्फूर्तीने काम करून गणपतीचे संकलन करण्यात आले,महापालिकेने ठेवलेल्या गाड्यांमध्ये गणेश मूर्ती ठेवण्याचे काम केले. निर्माल्य गोळा करण्याचे काम,तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी देखील काम केले. यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मूर्तीदान करा! असा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले होते. कृतिशील काम म्हणून गणपतीच्या सातव्या दिवशी दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या समवेत उत्स्फूर्तपणे काम करून १८०० गणपती मूर्ती संकलनाचे काम केले. यावेळी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार,जेष्ठ नेते तथा आमचे मार्गदर्शक  चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान  चंद्रकांत पाटील यांनी आपुलकीचा संवाद साधत शहरातील राजकीय, सामाजिक तसेच विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, त्यांच्या या भेटीवेळी दादांनी भक्तिभावाने बाप्पांची आरती करून आशीर्वाद घेतले. याच प्रसंगी नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. पक्ष संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे आणि भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व दादांनी अधोरेखित केले.नवनिर्वाचित सदस्यांना त्यांनी आगामी काळात संघटनेची…

Read More