Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शनिवारी (दि 7). आई सविता, वडील मनोहर आणि भाऊ  व पती यांच्यासह सोनाली कुलकर्णी यांनी गणरायाला निरोप दिला. दरवर्षी सोनाली कुलकर्णी या आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी शनिवारी कुटुंबियांसमवेत गणरायाला निरोप दिला.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ”पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ढोल-ताशा आणि लेजर-शोसह डीजेचा दणदणाट… ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात आणि उत्साह व भावपूर्ण वातावरणात चिंचवड परिसरातील मंडळांच्या गणरायांच्या मूर्तीचे शनिवारी(दि.6) विसर्जन करण्यात आले. चिंचवड येथील चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने परिसरातील विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा आणि झांज पथकाच्या दणदणाटासह बहुतांशी मंडळांनी ‘डीजे’चाही वापर केला. अनेक मंडळांच्या मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर कार्यकर्ते नृत्याचा आनंद घेत होते. रात्री उशिरापर्यंत परिसरातील गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होती. पहिलं मंडळ 5.10 मि. वाजता अजिंक्य मित्र मंडळ. गांधीपेठ मित्र…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा ,बेसिक टिम ,ड प्रभाग आरोग्य विभागाच्या वतीने पिंपळे गुरव येथील गणेश विसर्जन घाटावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी बरोबरच स्वयंस्फूर्तीने काम करून गणेश मुर्तीचे संकलन करण्यात आले. महापालिकेने ठेवलेल्या गाड्यांमध्ये गणेश मूर्ती ठेवण्याचे काम केले. निर्माल्य गोळा करण्याचे काम,तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी देखील काम केले. यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले, गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मूर्तीदान करा! असा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले होते. कृतिशील काम म्हणून गणपतीच्या पाचव्या,सातव्या,नवव्या,दहाव्या, आकराव्या दिवशी दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या समवेत उत्स्फूर्तपणे काम करून 3,600 गणपती मूर्ती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ या जयघोषात शनिवारी (दि.6 सप्टेंबर) 10  दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शनिवारी  संध्याकाळनंतर 10 दिवसांच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची पावले नदीपात्राकडे वळत होती. त्यामुळे पवना नदीपात्र तसेच घाट परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मोरया रे… बाप्पा मोरया रे… चा जयघोष रस्त्यारस्त्यांवर ऐकू येत होता.शहराच्या तुलनेत पिंपरीतील अनेक मंडळांनी डीजेचा दणदणाट सालाबादाप्रमाणे कायम ठेवला होता. काही मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशा आणि झांजपथकाला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षीच्या तुलनेत  यंदा अनेकांनी फुलांची मनसोक्त उधळण केली. डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांसह मिरवणूक रथांवरील आरास पाहण्यासाठी भाविकांनी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीतून आलेल्या मंडळांचे करण्यात आले स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पारंपरिक वाद्यांचा नाद, सजवलेल्या रथांची शोभा आणि गणेश मंडळांच्या विविध उपक्रमांना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद… अशा उत्साहमय वातावरणात भोसरी परिसरात शुक्रवारी (५ सप्टेंबर) गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात…

Read More

काळेवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काळेवाडी विभागाच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. काळेवाडी विसर्जन घाट आणि ज्योतिबा गार्डन येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक दल, विद्युत विभाग, सफाई कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती, ही सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेली स्तुत्य गोष्ट होती. सन्मानित करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी: डॉ. रीचा नवघणे (आरोग्य अधिकारी), संजय गायकवाड, विनोद जाधव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्न‘ती’ चा गणेशोत्सवाच्या औचित्याने ढोल-ताशा व लेझीम पथकांचा भव्य गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश महापूजा व महाप्रसादाने झाली. त्यानंतर पिंपळे सौदागर येथील शिवसंघर्ष ढोल ताशा पथकाने स्थिर वादन सादर करून भारतीय वाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवले. पथकातील सर्व वाद्यवृंदाचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पीस व्हॅली , पी. के. इंटरनॅशनल स्कूल, द्वारका साई वंडर फेज-2, रोज लँड (गेट नं. 4), वेरेंज सोसायटी, साई पर्ल सोसायटी, ट्रायोस सोसायटी आणि पाम ब्रिज सोसायटी या विविध रहिवासी सोसायटीतील ढोल-ताशा पथकांना सन्मानित करण्यात आले. छोटू मराठी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  यंदा ४७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चिंचवडगावातील गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या दशभुजालक्ष्मी गणेशोत्सवातील ‘राजे तुम्ही असता तर…’ या जिवंत देखाव्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ गेली शेहेचाळीस वर्षे सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करून समाजप्रबोधन करीत आहे. यावर्षी मंडळाने समाज प्रबोधनात्मक ‘राजे तुम्ही असता तर…’ या जिवंत देखाव्यातून समाजातील सद्य:स्थितीवर मार्मिक भाष्य केले आहे. सध्या राज्यात त्रिसूत्री भाषावाद आणि त्यावरून केले जाणारे राजकारण, सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सवंग प्रसिद्धीच्या नादात वाहवत जाऊन जीव गमावणारी युवा पिढी, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची दारुण अवस्था अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर छत्रपती शिवाजीमहाराज भाष्य करीत त्यावर…

Read More

चिखली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमुद्रा प्रतिष्ठान मंडळामध्ये, प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल, सोनवणे वस्ती, चिखली यांचे विशेष उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठण केले. या पठणामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. या वेळी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय जरे उपस्थित होते. शालेय उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि अध्यात्मिक जडणघडण व्हावी, यासाठी हे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  –    पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज-झुलेलाल टॉवर सोसायटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. या रस्त्यावरून जाणे नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखीचे झाले होते. वाहनांचे अपघात, दैनंदिन वाहतुकीतील अडथळे, पावसाळ्यातील चिखल व पाण्याचे डबके यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांच्या या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाची दखल घेत  माजी नगरसेवक तथा पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांनी स्मार्ट सिटी विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून या रस्त्याच्या काँक्रेटरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष  शत्रुघ्न (बापु) काटे स्वतः उपस्थित होते आणि या काँक्रिटीकरण कामाविषयी दोन्ही सोसायटीमधील…

Read More