- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण २५६.१७ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नदी, नाले व तलावात निर्माल्य टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असून जलप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे तसेच उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ४९ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंदिरा कॉलेज युनिव्हर्सिटी अंतर्गत स्कुल ऑफ इन्फॉर्मीशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटल रक्तकेंद्राच्या सहकार्याने दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 207 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. सदर शिबिराचे आयोजन इंदिरा कॉलेजचे प्राध्यापक सुमित ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वाय सी एम हॉस्पिटल रक्तकेंद्राकडून डॉ. जयंत जाधव, डॉ. सानिया शाह, समुपदेशक श्रीमती आम्रपाली गायकवाड, अधीक्षक श्रीमती लता सुवर्णकार तसेच इतर सहकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण झाले असून, संस्थेच्या वतीने रक्तदात्यांचे आणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बुधवारी (ता. २७) रोजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करण्यासोबतच आपल्या मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांना व नाटकांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्याच पारंपारिक ‘शिवराय’ या ढोलपथकाच्या आकर्षक वादनाने विसर्जन मिरवणुकीला इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रांगणातून सुरुवात झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी सन १९७२ ते १९८३ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा जमिनीकरिता संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के जमीन परतावा देण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती अवगत व्हावी, यासाठी मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पीएमआरडीएच्या माध्यमातून ग.दी. माडगूळकर सभागृहात संवाद साधण्यात येणार आहे. प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा देण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही लाभार्थ्यांनी अर्ज केले असून त्यावर कार्यवाही होत आहे. मात्र अद्यापही काही पात्र लाभार्थ्यांनी पीएमआरडीएकडे…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदीकाठी ६ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव केंद्रे उभारण्यात आली होती. या उपक्रमात गणेश भक्तांनी उत्साहात सहभागी होत या केंद्रांमध्ये ७ हजार ५११ गणरायांचे विसर्जन करून नदी स्वच्छतेचा संकल्प जपत मूर्तीदान केले. या मूर्ती दान उपक्रमास परिसरातुन मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात आळंदी नगर परिषदेने अधिकारी व कर्मचारी असे ८० सेवक कार्यरत राहिले. आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक, गणेश मांडले यांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण मुक्त रहावी यासाठी सक्रिय सहभाग घेत प्रतिसाद दिल्याचे मुख्याधिकारी माधवराव खांडेकर यांनी सांगितले. गणेश विसर्जन कालावधीत आळंदी नगरपरिषदेच्या वतीने निर्माल्य संकलन केंद्रे विकसित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरात यंदा गणेश विसर्जनाचे पर्व उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. परिसरातील देवी आई माता मंदिर व दत्त मंदिर विसर्जन घाटांवर तब्बल ४००० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. या संकलनामुळे परिसरात पर्यावरणपूरक विसर्जनाचे नवे उदाहरण घालून दिले गेले आहे. नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या युथ फाऊंडेशनच्या पुढाकाराने घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. -मूर्ती संकलनासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था -विसर्जनानंतर उरलेल्या फुलांचा व पूजेच्या साहित्याचा वेगळा निपटारा -भाविकांना पर्यावरणपूरक मूर्ती बसविण्याचे आवाहन -घाटांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, प्रकाशयोजना व स्वयंसेवकांची उपस्थिती विसर्जन घाटावर दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “गणपती बाप्पा मोरया”च्या…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेश विसर्जनादिवशी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकाराने आणि आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी तापकीर नगर परिसरात हजारो गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. या उपक्रमाने स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण झाली असून, गणेश विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीला एक सामाजिक वळण मिळाले आहे. या संकलन उपक्रमाचे आयोजन रहाटणीतील छत्रपती चौकात करण्यात आले होते. सकाळपासूनच स्थानिक तरुण, महिला आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बाबासाहेब त्रिभुवन यांनी सांगितले, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो पर्यावरण संरक्षणाची संधीही आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत असल्याने आम्ही हे संकलन सुरू केले. आजपर्यंत १,००० हून…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिजिटल युगात तंत्रज्ञानाने कायद्यापेक्षा वेगाने प्रगती केली असून त्याचा मोठा परिणाम तपासयंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर झाला आहे. मागील दोन दशकांत सायबर गुन्ह्यांची हजारो प्रकरणे थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. अशा परिस्थितीत परदेशी सर्व्हरवरून वेळेत ई-पुरावे मिळवणे, क्रिप्टो व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, क्युआर कोड फसवणूक टाळणे आणि न्यायव्यवस्थेत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा योग्य वापर करणे या तातडीच्या गरजा आहेत. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळण्यासाठी वकिलांनी टेक्नो-सॅव्ही होणे आवश्यक असल्याचे मत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ लॉ’ तर्फे आयोजित “आधुनिक काळातील कायदेशीर आव्हाने :…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील आदिवासी शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना असुरक्षित आणि हलाखीच्या स्थितीत राहावे लागत असून, या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), पिंपरी चिंचवड महानगर तर्फे आज तीव्र आंदोलन करण्यात आले. दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री वसतीगृहातील स्लॅब प्लास्टर कोसळल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये देखील अशीच घटना घडली होती, ज्यात एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली होती. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने, आज पुन्हा अशी दुर्घटना घडली. अभाविपने यावर तीव्र आवाज उठवत वसतीगृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप करत आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करत खालीलप्रमाणे…
