Author: maharashtrabreakingnews.com

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेला फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना ते मुंबईत बोलत होते. मुंबईतील यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, एबीपी…

Read More

   पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी  नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. मागील ९   वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर,- रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन  नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण …

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून माधुरी ओक यांचे प्राधिकरणातील सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रांत मौलिक योगदान आहे!’ असे गौरवोद्गार पिंपरी – चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार यांनी  निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी माधुरी ओक यांचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभीष्टचिंतन आणि जाहीर सत्कार करताना पिंपरी – चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, आर. एस. कुमार, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर, अतुल इनामदार, शर्मिला महाजन, साहित्यिक राज अहेरराव, प्रा. तुकाराम पाटील, रमेश वाकनीस, नंदकुमार मुरडे, राजेंद्र घावटे यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती. नवचैतन्य भजनी मंडळातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या विज्ञान तंत्रज्ञान व भौतिक व्यवस्थेच्या जाळ्यामध्ये संस्कार पासून दुरावत चाललेल्या समाजाला संस्कारक्षम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकाची आहे असे प्रतिपादन डॉ .अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ अशोककुमार पगारिया पुढे म्हणाले की , समर्पण, श्रद्धा, सखोल ज्ञान, अनुशासन आणि चारित्र्य ही शिक्षकी पेशाची पंचसूत्री आहे. आजच्या प्रगत वैज्ञानिक काळात अनुभवाचे बोलच महत्त्वाचे ठरतात अनुभव आपल्याला शिक्षकच देतात .त्या अनुभवाच्या आधारे सक्षम पिढी तयार होते.हीच सक्षम पिढी समाजाचे भावी नेतृत्व करते हे नेतृत्व…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टाकवे- मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी हाती घेतलेल्या “जनसंवाद” अभियानाचा पुढचा टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी व मागण्या आमदारांसमोर स्पष्टपणे मांडल्या. पाणीपुरवठ्याची अडचण, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था, वीज समस्यांबाबत तक्रारी, रेशनकार्डच्या गैरसोयी, एस.टी. बसची अनियमितता, पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी यावर ग्रामस्थांनी भर दिला. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत प्रस्ताव सादर करणे या मुद्द्यावर ठोस निर्णय घेण्यात यावा,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  यंदाच्या गणेश उत्सवात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती व गणेश उत्सव एकत्र आल्यामुळे पिंपरी चिंचवड जुलूस समितीच्या व पोलीस विभागाच्या वतीने झालेल्या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरात हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आज साजरी करण्याची ठरले त्याप्रमाणे आज पिंपरी चिंचवड जुलूस समितीच्या वतीने तसेच इतर मशिदी , मदरसे च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मोहम्मद पैगंबर याच्या १५०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात ईद – ए – मिलाद उत्साह ,भक्तीभाव आणि ऐक्याच्या वातावरणात साजरी झाली. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत काढलेल्या भव्य मिरवणुकीत लहानग्या चिमुरडया निरागस मुले मुली ते वयोवृद्धांच्या श्रद्धेच्या नजरेपर्यंत सर्व रंग एकत्र मिसळलेले दिसून आले .…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सव व ईद मिरवणुका या दोन्ही महत्त्वाच्या सणांदरम्यान शहरात लाखो नागरिक रस्त्यावर उतरतात. अशा वेळी कोणतेही विघ्न न येता शांततेत व यशस्वीरीत्या सण पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. विशेषतः महिला पोलिसांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. अलीकडेच पार पडलेल्या अकरा दिवसांच्या गणेशोत्सवात, तसेच ईदच्या मिरवणुकांदरम्यान महिला पोलिसांनी आपले घराचे सण बाजूला ठेवून समाजासाठी कर्तव्य बजावले. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा – पहाटे दोन वाजेपर्यंत महिला पोलिस रस्त्यावर बंदोबस्त करत होत्या. या त्यांच्या समर्पित सेवेबद्दल “स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान” या संस्थेच्यावतीने महिला पोलिसांचा विशेष सत्कार करण्यात आला. निर्मला जगताप, नीरजा देशपांडे, अनिता धाक्रस व…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 5 वी च्या विद्यार्थिनीने 2 ऱ्या पिंपरी चिंचवड लुडो जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. कु श्रेया शाकीर गायकवाड इ 5 वी हिने पुणे येथे दि 26/7/2025 रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय निवड स्पर्धेत भाग घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव, सचिव संजय भाऊ जाधव, संचालक विजय जाधव सर, उपाध्यक्ष श्री अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  पुष्पा शिंदे , माध्यमिक उपमुख्याध्यापिका सौ…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते श्री विशाल वाकडकर यांच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाच्या आवाहनाला वाकड व पिंपरी-चिंचवड परिसरातील गणेश भक्तांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन घाटातून यंदा जवळपास ४२०० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. पर्यावरणाचे जतन आणि जलप्रदूषण रोखण्याच्या मुख्य उद्देशाने श्री विशाल वाकडकर यांनी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ पर्यावरण पूरक श्री गणेश विसर्जन घाटाची निर्मिती केली आहे. मागील सहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून गणेशोत्सव काळात नागरिक मोठ्या संख्येने येथे विसर्जनासाठी सहभागी होत आहेत. या वर्षी अकरा दिवसांत चार हजार दोनशे मूर्तींचे संकलन झाले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे नेहरूनगर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३०० हून अधिक नागरिकांनी वैद्यकीय सेवा व विविध तपासण्यांचा लाभ घेतला. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे, डॉ. गोविंद नरके, पीएचएन यशस्विता बाणखेले तसेच वायसीएम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, आशा सेविका, परिचारिका उपस्थित होते.…

Read More