- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कोरके, आशा माने तसेच क्रीडाधिकारी रंगराव कारंडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा समन्वयक कन्हेरे यांनी केले, तर क्रीडाशिक्षक मुकेश पवार, हनुमंत सुतार व शिवाजी मुटकुळे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. पंच म्हणून पिंपरी चिंचवड डॉजबॉल संघटना व पुणे जिल्हा डॉजबॉल संघटनेचे सचिव रामेश्वर हराळे व त्यांच्या टीमने काम पाहिले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील नवनियुक्त आरोग्य निरीक्षकांसाठी दहा दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट व वेस्ट मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात होत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन उपायुक्त सचिन पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक द. गा. मोरे, स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम प्रमुख डॉ. हरिश रसानकर यांच्यासह महापालिकेच्या सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. उपायुक्त सचिन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत मोरवाडी येथील नाना-नानी पार्क येथे आयोजित फेडरेशन लीडर्ससाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले. यावेळी समाज विकास विभागातील समाजसेवक विशाल शेडगे, सक्षमा प्रकल्प संचालक सचिन उपाध्ये यांच्यासह उडान (प्रभाग ब), आरंभ (प्रभाग ड) आणि झेप (प्रभाग ई) या तीन फेडरेशनमधील एकूण २६ महिला लीडर्स, तसेच झोनल सोशल वर्कर्स आणि फील्ड कोऑर्डिनेटर्स सहभागी झाले. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात गणपती नांगरे (क्षमता बांधणी प्रमुख) यांनी प्रशिक्षणाचा उद्देश समजावून सांगितला. फेडरेशन लीडर्स…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचनेला मंजुरी दिल्यानंतर त्यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचनांसाठी मुदत दिली होती. मुदतीमध्ये शहरातून ३१८ हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर बुधवारी (दि. १०) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर याठिकाणी सुनावणी होणार आहे. महापालिकेची फेब्रुवारी २०१७ नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. आयुक्त शेखर सिंहच्या अध्यक्षतेखाली निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध करण्यात आले. प्रभाग रचना तळवडे-चिखली या भागांपासून सुरू होऊन सांगवी, अशी उतरत्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड च्या विकास शिक्षण मंडळं संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या इ 5 वी च्या कु स्वरा नामदेव जाधव या विद्यार्थिनीने मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कु स्वरा नामदेव जाधव इ 5 वी हिने पुणे येथे झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान 2025 परीक्षेमध्ये राज्यात 42 वा तर जिल्ह्यात 37 वा तर केंद्रवर 4 था क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव , उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाच्या वतीने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 37 व्या पुणे फेस्टिवल डर्ट ट्रॅक स्पर्धेत आपापल्या गटात बाजी मारली, पुणे,बिबवेवाडी येथील गंगाधाम जवळील चोरडीया मैदानावर झालेल्या या चित्तथरारक स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून कोल्हापूर ,नाशिक ,सातारा अहिल्यानगर इथून एकूण 225 स्पर्धकांनी भाग घेतला होता, पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक श्री अभय छाजेड यांनी झेंडा फडकवून या स्पर्धेचा प्रारंभ केला. नितीन चोरडीया यांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला, रोडीज एडव्हेंचर चे सर्वेसर्वा श्री अमरेंद्र साठे यांनी यांचे आयोजन केले,मोटर्स क्लब ऑफ इंडीया यांनी या स्पर्धेस मान्यता दिली. यात सारंगी करंजावणे हिने आकाश सातपुते हे नॅशनल चॅम्पियन तसेच एक्स टि व्हि एस फॅक्टरी रायडर राहीलेत यांचे…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आकुर्डीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात मंगळवारी ६.२५% जमीन परताव्याबाबत संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद मेळावा घेण्यात आला. सन १९७२ ते १९८३ या कालावधीत तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना ६.२५% परतावा कसा, मिळणार याबाबत जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी मार्गदर्शन केले. संबंधित योजना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होण्याकडे एक महत्वाचे पाऊल आहे. यावेळी ६.२५% जमीन परताव्याची कार्यपद्धती व अर्ज प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ज्या मूळ जमीनमालक मयत आहेत, त्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्रासह अर्ज करणे बंधनकारक आहे. १४ मार्च २०२४ या शासन निर्णयानुसार…
– सन २०१७ च्या प्रभागरचनेप्रमाणे निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालय आदेशात नमूद पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली आणि चुकीच्या पध्दतीने निवडणूक यंत्रणेने २०२२ मध्ये राबविलेल्या प्रक्रियेविरुध्द आम्ही महानगरपालिका निवडणूक यंत्रणेपासून उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २० जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार १० मार्च २०२२ रोजी उपलब्ध असलेल्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे सन २०१७ च्या प्रभागरचनेप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेशात नमूद असून हरकती व सुनावणी घेऊन प्रभागरचनेत बदल केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल, असा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – टीका आणि प्रशंसाचा समतोल साधणारा माणुसच खऱ्या अर्थाने जगाच्या कौतुकास पात्र ठरतो, अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मुंबईत व्यक्त केले. मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मुंबई येथे फिनिक्स पुरस्कार देत विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण हॉल मध्ये हा सत्कार घेण्यात आला, यावेळी अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, महाराष्ट्र राज्याचे कौशलविकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक,सकाळ माध्यमाचे संपादक निलेश खरे, दैनिक लोकमतचे मुंबई…
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणारी उन्नती सोशल फाउंडेशन व उन्नती सखी मंच यांनी यंदाही गणेशोत्सव विसर्जनाचा उपक्रम पर्यावरणपूरक व अभिनव पद्धतीने पार पाडला. गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असला तरी विसर्जनाच्या वेळी होणारी वाहतूककोंडी, ध्वनीप्रदूषण व नागरिकांना होणारा त्रास ही गंभीर समस्या आहे. याची जाणीव ठेवून उन्नती सखी मंच यांनी गेल्या ०४ वर्षांपासून मिरवणुकीविना, कृत्रिम हौदामध्येच मंडपाजवळ गणेश विसर्जन करण्याची परंपरा सुरु केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होत नाही, वेळेची बचत होते तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता येते. हा अभिनव प्रयोग समाजात एक आदर्श ठरत असून त्याचे सर्वत्र कौतुक होत…
