Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त भारतरत्न, तत्त्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विध्यार्थ्यांना संभोदीत करतांना म्हटले की, “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यभर शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान, स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये शिक्षकांचे कार्य अधिक जबाबदारीचे झाले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर ठेवून त्यांच्याकडून घेतलेले शिक्षण प्रत्यक्ष आयुष्यात उतरवले पाहिजे.…

Read More

पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम “लिहिते व्हा…” मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग भाग क्रमांक :- ६ वार : बुधवार, दिनांक : १० सप्टेंबर २०२५ प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे संत जनाबाई पोरकी जनाई | दासी नामयाची | होई विठ्ठलाची | धर्म लेक || निष्काम भक्तीचा | अंतरी उमाळा | विठूचा जिव्हाळा | जीवनात || प्रेमे न्हाऊ घाली | करी वेणीफणी | माऊली होऊनी | पांडुरंग || जनाईच्या दारी | भरतो रांजण | दळण कांडण | करीतसे || सगुण भक्तीचे | लाभे पुण्यफळ | वाहे परिमळ | केशवाचा || नाम संकीर्तनी |…

Read More

शैक्षणिक उत्कृष्टता, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आरोग्यसेवेतील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल NIRF 2025 मध्ये वैद्यकीय संस्थांमध्ये भारत देशात १२वे स्थान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ मध्ये देशातील वैद्यकीय संस्थांमध्ये प्रतिष्ठेचे १२वे स्थान मिळवून एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे* . या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे संस्थेने आपले शैक्षणिक मानदंड उंचावणे, संशोधन क्षमता वाढवणे आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेतली गेली आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणारे शैक्षणिक वातावरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठ, (डीपीयु) पिंपरी येथे शिक्षक दिन सोहळात विविध पुरस्कारांचे वितरण याद्वारे आदर्श अध्यापनाचा हा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सौम्या स्वामीनाथन – अध्यक्षा, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन, प्रमुख सल्लागार, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, माजी मुख्य शास्त्रज्ञ, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), माजी महासंचालक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) उपस्थित होते. या समारंभामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणेचे प्र कुलगुरू मा. डॉ स्मिता जाधव, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार आणि डॉ.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान भवन येथे आज आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक पार पडली. अकोला जिल्हा भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. समितीने संबंधित विभागीय सचिवांची साक्ष नोंदवली. बैठकीस प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग), अप्पर मुख्य सचिव (महसूल विभाग), उपजिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांचा आढावा घेऊन ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश समितीने दिले. याशिवाय, या कामांचा पुनश्च आढावा पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच, समितीच्या आगामी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बैठकीच्या आयोजनासंबंधी आवश्यक सूचना देण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या युवा धोरणाच्या आराखड्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीवर पिंपरी-चिंचवडचे युवा आमदार अमित गोरखे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. “ही समिती  मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल. युवकांचे शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक सहभाग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर हे धोरण लक्ष केंद्रित करणार आहे. युवकांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देणारे दूरदृष्टीचे धोरण तयार करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वीही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्याचे गणित होतांना नवनवीन उत्तरे शोधू या    या संयमाने या सुखाचा आनंद परिघ वाढवू या            या ओळी आहेत वाघोली येथील शिक्षक हनुमंत देशमुख यांच्या. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिपंरी चिंचवड आयोजित शिक्षक सन्मान आणि कविसंमेलनाचे.  यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, संत साई विद्यालयाचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर, प्रतिभा महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ ,ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण मुळे उपस्थित होते.              पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सहभागी झालेल्या…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडी घेणाऱ्या श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवडची नवनिर्वाचित कार्यकारिणी (कार्यकाळ २०२५-२०२८) नुकतीच जाहीर झाली. निवड प्रक्रिया पंच सदस्य कृष्णकुमार गोयल, रामअवतार अग्रवाल, वेदप्रकाश गुप्ता आणि डॉ. रमेश शिवनारायण बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. असे आहेत नवीन पदाधिकारी अध्यक्ष – मोहन जे. गर्ग, कार्याध्यक्ष – विकास तरसेम गर्ग, उपाध्यक्ष – अशोक आर. अग्रवाल, सचिव – आशीष पी. गर्ग, सहसचिव पवन अग्रवाल, कोषाध्यक्ष – धर्मेंद्र जे. अग्रवाल, सहकोषाध्यक्ष – दिनेश अग्रवाल, भवन निर्माण समिती, अध्यक्ष – लाजपतराय मित्तल, उपाध्यक्ष नरेश एच. गुप्ता, भवन व्यवस्थापक – महावीर एम. बंसल, वैद्यकीय समिती – जगमोहन अग्रवाल,…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर दैनिक आज का आनंद चे शैलेश काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यवाह पदावर दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे यांची सोमवारी (दि.८ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी (दि.२२ ऑगस्ट) निवडणूक झाली. ॲड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विश्वस्तांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात) आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘एआय’चा उपयोग करून अवघड आणि अती क्लिष्ट विषयाचे सहज, सुलभ विश्लेषण करणे शक्य आहे. विविध प्रकारचे टूल वापरून अभियांत्रिकीशिवाय इतर अभ्यासक्रमातही शिक्षकांनी याचा वापर केला पाहिजे. पुढील काळात एआय मुळे अध्यापन अधिक परिणामकारक होईल असे मत ‘ए कन्सल्टन्सी’चे सहसंस्थापक डॉ. अमेय पांगारकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या कर्मचारी विकास समितीच्या वतीने “एआय फॉर टीचर्स” या विषयावर प्राध्यापकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. काजल महेश्वरी, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. हीना आदींसह एमबीए…

Read More