Author: maharashtrabreakingnews.com

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध २८ योजना राबविण्यात येत आहेत तर काही योजना थांबल्या आहेत त्याही मिळाव्यात. आणि महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज ठप्प झाले आहे त्यास निधी देऊन कार्यान्वित करावे आणि बांधकाम कामगार ,घरेलु कामगार यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष सागर तायडे,कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मंत्रालय मुंबई येथे कामगार मंत्री यांची भेट घेऊन निवेदन व चर्चेद्वारे केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनोज यादव, लाला राठोड उपस्थित होते. कामगार वर्ग वर्षभर राबत असतो. कारखाने स्थापनेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अक्षरश: ओला दुष्काळ पडला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना ‘‘एक हात मदतीचा’’ देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील 50 पूरग्रस्त गावांतील नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 2019 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि कोकणातील चक्रीवादळ आपत्तीच्या काळात भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘एक हात मदतीचा’’ मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. त्याचे महाराष्ट्रभरात कौतूक झाले होते. आता मराठवाडा आणि अन्य जिल्ह्यांमध्ये महापूर परिस्थिती आहे. पिंपरी-चिंचवडमधून पुन्हा एकदा मदतकार्य उभा करण्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे,…

Read More

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र देहू येथील सरस्वती मंगल कार्यालय, गाथा मंदिर रोड येथे आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि गरजा समजून घेऊन त्यांचे निराकरण शासनस्तरावर व्हावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत, असा निर्धार आमदार शेळके यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना लिखित स्वरूपात सादर केल्या तसेच आमदार शेळके यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत आपल्या भावना मांडल्या. सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि नागरिक सुविधा या क्षेत्रातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार शेळके यांनी सर्व तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि “जनतेच्या…

Read More

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा हिंदू शौर्य दिनानिमित्त विराट हिंदू मेळावा संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक योग दिवस आणि ध्यान दिवस जगाने मान्य केला, ही भारताची विश्वमित्र ते विश्वगुरू कडे सुरू झालेली वाटचाल आहे. भारताचा विचार व संस्कृती जगभर वाढत आहे. भारतातील बहु विविधता हीच येथील एकतेचे यश आहे. मेकॉले च्या शिक्षण पद्धती पासून आपली संस्कृती विकृत करून शिकवली जात आहे. भारताला जागतिक भूमिका बजवायची असेल तर, प्रथम स्वतः समर्थ आणि सक्षम व्हायला हवे. विश्वमित्र होण्यासाठी वस्तुस्थितीचे भान ठेवून मोठी वाटचाल करायची आहे. विश्वमित्र व विश्वगुरू ही फक्त राजनैतिक संज्ञा नाही, तर सर्वांना एकत्र घेऊन समर्थ राष्ट्र म्हणून पुढे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नियोजित सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अंतिम प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने आज (दि.०६) मान्यता दिलेली आहे. या प्रभाग रचनेत प्रभागातील हद्दी बाबत २ हरकती सूचना पूर्णतः मान्य करण्यात आल्या असून ३ हरकती सूचना अंशतः मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच इतर सर्व हरकती सूचना अमान्य करण्यात आल्या आहेत. या प्रभाग रचनेबाबतची प्रसिध्दी पिंपरी चिंचवड मुख्य कार्यालयात व क्षेत्रीय कार्यालयात करण्यात येणार आहे. या प्रभागात करण्यात आलेत ‘हे’बदल.. ०१) प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ०१ मध्ये समाविष्ट असलेली ताम्हाणे वस्ती आता अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १२ मद्ये समाविष्ट करणेत आली आहे. ०२) प्रारूप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पुरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावा-गावांत जाऊन वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात देवगाव ( खुर्द)…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘आपल्या अंतरंगातील सद्गुणांनी समाजातील विविध घटकांना आपल्याकडे खेचून जिव्हाळ्याचे स्नेहबंध प्रस्थापित करणारे राजेंद्र घावटे अद्भुत लोहचुंबक आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते प्रा. बाळकृष्ण माडगूळकर यांनी कुसुमावर्त, शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण येथे (रविवार, दिनांक ०५ ऑक्टोबर)  काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांचा त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री घावटे यांच्यासह विशेष सन्मान करताना प्रा. बाळकृष्ण माडगूळकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण बहिरवाडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. हरिभक्त परायण प्रकाश घोरपडे यांच्या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी नारायण बहिरवाडे, रमेश वाकनीस,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सॲप समूहावर वार्षिक सदरलेखन करणाऱ्या साहित्यिकांना महाराणा प्रताप गौशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, प्रकाशक नितीन हिरवे, दिलासा साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती देताना सुरेश कंक यांनी सांगितले की, ‘सध्याच्या काळात संपर्क, संदेशवहन आणि अभिव्यक्तीसाठी व्हॉट्सॲप हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, ही बाब पाच वर्षांपूर्वी करोना काळात लक्षात आली. या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिक समस्या, शैक्षणिक व आरोग्यविषयक आव्हानांचा आढावा घेण्यासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना पिंपरी चिंचवड शहरात येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. हे आमंत्रण आम आदमी पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अधिकृतरित्या दिले असून, लवकरच अरविंद केजरीवाल यांची भेट पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रसगी आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या ‘कार्य अहवाल’ या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक  अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पारंपरिक व अध्यात्मिक महत्त्व जपणाऱ्या विशेष सोहळ्यात सात नादमय आवर्तनांद्वारे शंख वादकांनी भक्तीचे सूर निर्माण केले. ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ अशी सात आवर्तने आणि तीन मंत्र एकत्र शंखाद्वारे सादर करीत तब्बल १ हजार १११ हून अधिक शंखवादकांनी विश्वविक्रम केला. प्रत्यक्षात तब्बल १ हजार ४०० शंखवादक सहभागी झाले होते. हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक केशव शंखनाद पथकाच्या वतीने शंखवादकांचा विश्व विक्रम सोहळा स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. विश्वविक्रम सोहळ्याला राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष महंत योगी रोहतास नाथ महाराज, जगदगुरुकृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,…

Read More