Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनी ‘महा-मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, त्यांनी या निमित्ताने मेट्रोने महापालिकेत प्रवेश करत शहराच्या सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास दाखवून दिला. महापालिकेचे मावळते आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नुकतीच झाली आहे. सिंह यांच्या जागी हर्डीकर यांना महापालिका आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आज महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हर्डीकर यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येऊन हा पदभार स्वीकारला. आयुक्त हर्डीकर यांनी महापालिकेत आल्यानंतर सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी खासदार, नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – समाजातील अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही केवळ जबाबदारी नसून ती सेवाभावाची जाणीव आहे. हाच सेवाभाव लक्षात घेऊन लक्ष्मीनारायण नगर सेवाभावी संस्था यांनी पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मराठवाड्यातील बीड, बार्शी, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या माध्यमातून केंद्रीय प्राथमिक विद्यालय, आंबी (ता. भुम, जि. धाराशिव) येथील विद्यार्थ्यांना अंदाजे १५० ते १६० शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष  अंकुश निवळकर यांनी भूषविले. या प्रसंगी  नाना माखले,  संतोष गवते,  अमोल जाधव, नेताजी आडबळे,  राहुल मोटे,  गिलबीले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड तर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवरील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत, संविधान व न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी केली. या आंदोलनाद्वारे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या: १ या हल्ल्यामागील सूत्रधारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. २️ न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी. ३️ न्यायपालिकेवर धर्मांध किंवा जातीयवादी दबाव आणण्याचे प्रयत्न तत्काळ थांबवावेत. ४ आम आदमी पार्टीचा पंजाब…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकरी, कष्टकरी यांना ‘‘एक हात मदतीचा’’ या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमधून एकाच दिवशी तब्बल 50 गाड्या मदत रवाना झाली. आपत्तीग्रस्त भागातील 100 हून अधिक गावांमधील सुमारे 18 हजार 400 कुटुंबांना ही मदत वितरीत करण्यात येणार आहे. या विधायक उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. लोकसहभागातून तब्बल 50 ट्रक मदत उभारण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक वस्तु, अन्नधान्याचा समावेश आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अटी शर्तीनुसार बांधकाम व्यवसायिक (विकसक) सदनिकाधारकांना अपेक्षित नागरी सुविधा देत नसल्याचे पुढे येत आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित गृहप्रकल्पांच्या बांधकामांची स्थळ पाहणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आलेल्या विकासकांची बांधकामे थांबव‍िण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहे. वाघोलीतील काही खाजगी सदनिकाधारकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महानगर आयुक्त यांनी संबंधित विकासकांची कामे थांबव‍िली आहे. विकसक आपल्या गृहप्रकल्पांना मान्यता घेताना संबंधित शासकीय यंत्रणेकडे आम्ही नागरिकांना अपेक्षित असलेल्या नागरी सुविधा देणार असल्याचे नमूद करतात. मात्र काही विकसक सोयी-सुविधांकडे कानाडोळा करत असल्याने त्या गृहप्रकल्पातील नागरिकांना अनेक अडचणी येतात. त्या अनुषंगाने वाघोली पर‍िसरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांच्या न्याय्य हक्कांसाठी ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र विभाग), महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड, आणि ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुकारण्यात आलेला राज्यव्यापी रिक्षा-टॅक्सी बंद आज, ९ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के (१००%) यशस्वी झाला. दुपारी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील रिक्षा-टॅक्सी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांची तात्पुरती गैरसोय झाली. लाखो चालकांनी आपल्या ‘अस्तित्वाच्या लढ्याकडे’ शासनाचे लक्ष वेधण्याचा हा निर्णायक प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. कष्टकऱ्यांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात पिंपरी-चिंचवडमधील हजारो रिक्षा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगणवाडी रोड व चिंचेचा मळा ते वाघू साने चौक हा चिखली परिसरातील प्रमुख मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला असून नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक यांना रोज त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळा संपूनही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने अखेर येथील नागरिकांनी युवा नेते यश साने यांच्या नेतृत्वात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तसेच दिवाळीच्या आधी रस्ता नाही झाला तर जनआंदोलन करण्यात असाही इशाराही देण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित विभागाशी समन्वय साधून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यश साने यांना दिले आहे. महापालिका आहे ग्रामपंचायत…

Read More

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचा पिंपरीत भव्य सत्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाजाने चांगले काम केले आहे. ते जेथे जातील तेथे लोकांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या समाजातील बेरोजगार युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती केली आहे. या महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा लाभ घेऊन युवकांनी उद्योग व्यवसाय उभारून देश विकासात हातभार लावावा असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले.     विप्र फउंडेशन च्या वतीने प्राधिकरण आकुर्डी येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  टाटा मोटर्स उद्योग समूहातील सर्वसामान्य कामगारांचे दैवत, उद्योगमहर्षी, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त टाटा मोटर्सच्या कामगारांनी मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकत्र येत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. या आदरांजली कार्यक्रमात मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत जाधव, महेंद्र गायकवाड, धोंडीराम कुंभार, महादेव कांबळे, गोविंद वाल्हेकर, संजय भोसले, सुरेश मांडके, बालाजी पांचाळ, रमाकांत मुंढे, बापूसाहेब चव्हाण, दत्ता भोसले, विजय जामोदकर, शीदराम पांचाळ, प्रमोद शिंदे, अनुरथ शेरखाने आणि प्रताप गोळे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्रिभुवन म्हणाले की, रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर विकासाचे रोल मॉडेल आहे. या शहराने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून या शहरात विकासाभिमुख उपक्रम आणि प्रकल्प राबवताना शहरवासियांनी दिलेली साथ आणि केलेले सहकार्य माझ्या या शहरातील प्रशासकीय कारकिर्दीमधील विशेष भाग आहे. या शहरात काम करताना येथील संस्कृतीशी एकरूप झालो. शहरवासियांनी दिलेले अतोनात प्रेम माझ्या जीवनाचा अमूल्य ठेवा असून या शहराचा मी कायम ऋणी राहीन, अशा गहिवरलेल्या शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाशिकच्या कुंभमेळा आयुक्तपदी शासनाने शेखर सिंह यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा अभिजात मराठी भाषा…

Read More