- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगदान प्रतिष्ठान चिंचवड व माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या दोन दिवसीय प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक ११ अॅाकटोंबर २०२५ रोजी माजी नगरसेविका कांताताई मोंढे व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, महेश कुलकर्णी, रवींद्र देशपांडे, सेवा भारती महाराष्ट्र प्रांत लक्ष्मीकांत देशपांडे,सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा प्रदेश सदस्य अजित कुलथे, प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, प्रदिप सायकर, रवींद्र प्रभुणे, डॉक्टर अजित जगताप, गणेश गावडे, योगेश चिंचवडे, शिवम डांगे, सुभाष पंडित, नंदकुमार मुरडे, शोभा भराडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राऊतवाडी येथे राहणारे कातकरी, समाज व शहरातील पालामध्ये राहणाऱ्या गोरगरीब महीलांना एक पैठणी, व एक साधी नवीन साडी व दिवाळीचा फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि,अनेक अदृश्य दानशूर यांनी 600 नव्या साडया आम्हाला दिल्या आपण आपली दिवाळी आनंदात कुटुंबासोबत साजरी करत असतो परंतु इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून उदरनिर्वाह करणारे अशिक्षीत गोरगरिबाची दिवाळी झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आमचीच दिवाळी झाल्याचे आम्हाला वाटले,आपल्याला समाजाचे ‘काहीतरी देणे आहे आणि ते दिले पाहिजे” या उदात्त भावनेतून सामाजिक कर्तव्य समजून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात मदतीचा हात पुढे करत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडच्यावतीने “एक हात मदतीचा” या उपक्रमाअंतर्गत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचे प्रेरणास्थान आमदार महेश लांडगे असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक जबाबदारी पार पाडली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य, अन्नधान्य, कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन मदतीचा ट्रक शुक्रवारी दि. 10 ऑक्टोबर रोजी मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथून रवाना करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये खडकी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी मदतकार्य करण्यात आले. गावचे सरपंच उमाकांत बरडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) यांच्या “पश्चिम आफ्रिका सिटीवाइड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन” प्रकल्पांतर्गत आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन तसेच सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने ज्ञानविनिमय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल, बुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांतील शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र (वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प) तसेच कॉम्बीट्रीट सांडपाणी शुद्धीकरण केंद्राला भेट दिली. जीजीजीआय सध्या सेनेगल, बुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांमध्ये “हवामान सक्षमता द्वारे सर्वसमावेशक शहरी स्वच्छता प्रोत्साहन” हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत महापालिकेच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथील रहिवासी अवघ्या 12 वर्षांचा कु.आत्मज पराग जैन या बाल वैज्ञानिकाने विज्ञान क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड STEM अँड रोबोटिक्स ऑलिंपियाड (WSRO) मध्ये प्रादेशिक फेरीत यश मिळवून राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. तो ‘यंग सायंटिस्ट – ऑल STEM ओपन कॅटेगरी’ मध्ये राष्ट्रीय विजेता ठरला आहे. या यशामुळे आत्मजला येत्या नोव्हेंबर महिन्यात रोम (इटली) येथे होणाऱ्या फिबोनाची इंटरनॅशनल रोबोट ऑलिंपियाड (FIRO) या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.ही स्पर्धा जगभरातील तरुण नवोन्मेषकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि प्रेरणादायी मानली जाते. आत्मजने भारतीय पूल संरचनांच्या आयुष्यात वाढ करून…
लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी-काळभोर येथे “मानसिक आरोग्याची संवेदनशीलता” या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त तणाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरील उपाय तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका या विषयांवर या पथनाट्यातून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम व प्राणायाम आदींची माहितीही या सादरीकरणातून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित चिमुकल्यांमध्येही प्रचंड उत्सुकता…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलला पुणे येथे एल्ड्रॉक इंडिया या नामांकित संस्थेतर्फे “ अभिनव अध्यापन पध्दतीचा अवलंब करणे ” या श्रेणीत ‘ इंडिया के – १२ पुरस्कार २०२५ ’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार येथील शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी दिला गेला आहे. हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा जोशी यांनी पुणे शहरातील कल्याणी नगर येथे शाळेच्या वतीने स्वीकारला. समारंभात उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी देखील कमला एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचे कौतुक करत, इतर शाळांसाठी आदर्श ठरल्याचे सांगितले. या पुरस्कारामुळे शाळेची…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दीपावलीनिमित्त सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५:३० वाजता नियोजित महापौर निवास मैदान, निगडी प्राधिकरण येथे होणाऱ्या कार्यक्रम विनाशुल्क असलेल्या या सुश्राव्य मैफलीचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा पदाधिकारी सलीम शिकलगार, अरुण थोरात आणि अतुल इनामदार यांनी केले आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्ती मारुती जाधव युथ फाउंडेशन तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील मौजे लाखी गावात पूरग्रस्त नागरिकांना दिवाळी फराळ व किराणा किटचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गावातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून स्थानिकांना धीर दिला. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी आणली. या उपक्रमात कीर्ती जाधव यांनी सांगितले की, “आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आणखी मदतीचे कार्य लवकरच हाती घेतले जाईल,” असे आश्वासन देऊन लोकांना मानसिक बळ दिले. या उपक्रमात…
