Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळा, कासारवाडी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीतील एकूण ८९ विद्यार्थी सहभागी झाले, तर ३० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. शाळेच्या समुपदेशक ऋतिका बेलदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून तणावमुक्त राहण्याचे उपाय, आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.…

Read More

गोव्यात आयुर्वेद उपचार पद्धतींचा तेजोदीप प्रज्वलित! वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार… गोवा,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गोव्यात नुकतीच “तीजोविधान – विद्धकर्म व अग्निकर्म कार्यशाळा व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक” हा आयुर्वेद क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. या कार्यशाळेत वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन करत आयुर्वेदातील प्राचीन पण अत्यंत प्रभावी उपचारपद्धती – विद्धकर्म आणि अग्निकर्म – यांवर सखोल माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष उपचारांचे प्रात्यक्षिक दाखवून उपचारपद्धतींची प्रभावीता सर्व सहभागी वैद्यांसमोर मांडली. या कार्यक्रमात तब्बल १०० हून अधिक रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे ऑटिझम, नेत्रविकार, सांधेदुखी, पाठदुखी, संधिवात यांसारख्या आजारांवर उपचारांनंतर तात्काळ…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी येथील गांधीनगर, खराळवाडी परिसरातील दीडशे गरजू महिलांना दिवाळी सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा यासाठी साखर, तेल, मैदा , रवा डाळीचे पीठ असलेले १५० किटचे वाटप प्रतिभा नारी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रजिना फ्रान्सिस, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंगे ,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव , भूषण नांदूरकर, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार, माजी नगरसेविका उषा गजभार (चोरडिया ) योगशिक्षिका सरिता अग्रवाल, जनमन सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्वेता कापसे , बहुजन विकास आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष धनंजय घोलप, समाजसेविका राखी धर यांच्या हस्ते १५० गरजू व तळागाळातील महिलांना दिवाळी शिधा…

Read More

– पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आल्याने, शासनाने ही त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पात्र पदवीधर शिक्षकांना योग्य वेतनश्रेणी लागू होईल आणि त्यांना होणारा आर्थिक अन्याय दूर होणार आहे. यामुळे पदवीधर शिक्षकांची गेल्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान करीत असलेली माणूसधर्माची पेरणी हा धार्मिक सौहार्दाचा वस्तुपाठ आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे काढले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सहसचिव बंडू पवार, पद्मा दळवी आणि लोकशिक्षक बाबा भारती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपरी यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श पतसंस्था’ म्हणून गौरविण्यात आले आहे. सन २०२४-२०२५ या वर्षात पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत संस्थेला प्रतिष्ठेचा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील गोकर्ण–महाबळेश्वर येथे झालेल्या भव्य समारंभात कर्नाटक राज्याचे खासदार मा. श्री प्रभाकर कोरे, अण्णासाहेब जोले, आमदार मा. श्रीमती शशिकला जोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक  शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे (अध्यक्ष – पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्ष (भा.ज.पा.) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या (SC) मोर्च्याचे अध्यक्ष म्हणून  भाजपा संत तुकाराम नगर- कासारवाडी -खराळवाडी मंडलाच्या एस सी मोर्चा अध्यक्ष पदी निलेश राजू आढाव यांची निवड झाली. निलेश आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे. निलेश आढाव यांचे हे पद्धतशीर राजकीय करिअर आहे आणि त्यांचा पक्षासाठी महत्वाचा दबाव आणि समर्थन निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यांच्या या नियुक्तीच्या माध्यमातून भा.ज.पा. अनुसूचित जातींना आकर्षित करणार आहे, जो एक प्रमुख मतदान वर्ग असतो. या नियुक्तीचा अजून अधिक विश्लेषण करत असताना, त्यांनी आधीच्या राजकीय कार्यात काय…

Read More

पिंपरी,  ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी देवयानी आशिष कवळे हिची पिस्तूल शूटिंग स्पर्धेसाठी (सतरा वर्षाखालील) निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय पिस्तूल शुटींग स्पर्धा २०२५- २६ चिखली येथील स्वामी विवेकानंद क्रिडा संकुल येथे झाल्या. या स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ची विद्यार्थीनी देवयानी कवळे हिने ४०० पैकी ३५२ गुण (१७ वर्षा खालील गटात) मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले. या कामगिरीमुळे देवयानी कवळे विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराने राजकारण कसे ‘ हँडल’ करायचे हे शिकवले. या भागात खूप वेगळ्या प्रकारची मते आहेत. मतभेद आहेत. परंतु, मनभेद नाहीत. शहर विकासासाठी सर्व मतप्रवाह एक होताना पाहिले आहेत. म्हणूनच “पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवून काम केले. यासाठी कोणताही भेदभाव दाखविला नाही. स्वतंत्ररित्या प्रशासकीय अधिकारी म्हणून माझे काम चोख बजावले, अशा भावना पिंपरी-चिंचवडचे मावळते आयुक्त आणि नवनर्वाचित नाशिक कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केल्या. सोसायटी फेडरेशन आणि विविध स्वयंसेवी संस्था- संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिंचवड येथील ऑटो कलस्टर मध्ये रविवारी (दि .12)…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जर सुयोग्य, चारित्र्यसंपन्न, आणि गुणवत्तापूर्ण उमेदवार दिले नाहीत, तर आमचे स्वतःचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू, असा ठराव चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित विचारमंथन बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला. बोऱ्हाडेवाडी येथील ऐश्वर्यम बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत सुमारे 2000 प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. महानगरपालिकेच्या कारभारात सोसायटीधारकांचा सक्रिय सहभाग असावा, ही भावना यावेळी ठळकपणे व्यक्त झाली. संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन यांनी स्पष्ट केले, “आमची संस्था अराजकीय असूनही, शहराच्या विकासात आमच्या 90% सोसायटीधारकांचा सहभाग असावा अशी जनभावना आहे. म्हणूनच संवाद दौरे घेऊन आम्ही सर्वसामान्यांची मते…

Read More