- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– संस्कृतीचा गंध जपणारा भाजपा युवा मोर्चाचा स्तुत्य उपक्रम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली व कुदळवाडी परिसरात वसुबारसच्या निमित्ताने पारंपरिक गाय-वासरांचे पूजन अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारातून अध्यक्ष दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून, केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर गोरक्षणाची सामाजिक आणि संस्कृतिक जाणीव ही अधोरेखित करण्यात आली. चंद्रभागा गोशाळा (रामदास नगर), पै. निलेश यादव फार्म (कुदळवाडी), गणेश किसन आप्पा यादव फार्म (इंद्रायणी वजन काट्या मागे) या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गाय व वासरांचे पूजन करण्यात आले. गोभक्त, महिला मंडळ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात गाय केवळ एक पवित्र प्राणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडेसह लगतचा चाकण औद्योगिकपट्टा परिसरातील परिसरातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता नवीन वीज उपकेंद्र (स्विचिंग स्टेशन) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) च्या कार्यक्षेत्रातील संबंधित जागा महावितरणकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. तळवडे भागात वाढती लोकसंख्या आणि वीजेची मागणी यामुळे देवी इंद्रायणी उपकेंद्रावर अतिरिक्त वीजभार पडला आहे. या उपकेंद्रावर भार वाढला आहे, त्यामुळे गेली 10 वर्षे वीज पुरवठा व्यवस्थेत अडचणी येत आहेत. 2018 मध्ये कॅनबे चौक येथे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले होते, पण जागेची समस्या असल्यामुळे कामाला प्रारंभ होऊ शकला नव्हता. याबाबत आमदार महेश लांडगे यांनी महावितरण, एमआयडीसी आणि उर्जा विभागाकडे सातत्त्याने…
“प्रकाश अंधाराला भेटला…” एक दीप प्रकाश देतो, पण अनेक दीप एकत्र आले की सण उत्सव होतो.” – इरफान सय्यद आनंद वाटला कीच सण पूर्ण होतो. दिवाळी आनंद सोहळा – अंध बांधवांसोबत! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवतेचा खरा उत्सव साजरा करत, साद सोशल फाऊंडेशन व इरफानभाई सय्यद सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी आनंद सोहळा” हा उपक्रम यंदा ११ व्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि आत्मीयतेने पार पडला. हा कार्यक्रम काळभोर लॉन्स, शालिमार बँक्वेट, दुर्गानगर चौक, निगडी, पुणे येथे सायंकाळी ६ वाजता पार पडला. या सोहळ्यात सुमारे ४०० अंध बांधव आणि भगिनींना दिवाळीच्या आनंदाची अनुभूती देत “दिवाळी फराळ किट” वाटप करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्व हिंदू परिषद, विधी प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आज पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरातील अधिवक्त्यांच्या उपस्थितीत वसुबारस, गोपाष्टमी आणि दिवाळीनिमित्त गोपूजन या विषयावर डॉ. सुभाषमहाराज गेठे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, विधी प्रकोष्ठ – प्रांत सहसंयोजक ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. ऋषीकेश शर्मा, ॲड. ऋतुराज आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते. वेदान्तचार्य डाॅ. सुभाषमहाराज गेठे यांनी आपल्या प्रवचनात, गाय ही आरोग्यदेवता असून दिवाळीची सुरुवात गोपूजनाने आपण करत असतो. तेहतीस कोटी देवतांचे स्वरूप गोमाता असून लक्ष्मीस्वरूप अशी ही गोमाता परिपूर्ण आहे. गोमातेपासून पंचद्रव्य…
महापालिका सार्वत्रिक निवडणूक; प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाच्या कामाला उद्यापासून होणार सुरुवात प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे- अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागनिहाय मतदार यादी विभाजित करण्याचे कामकाज आजपासून (१८ ऑक्टोबर २०२५) सुरू होणार आहे. या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक यांना मतदार यादी विभाजित करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळी काळात राज्यभरात किल्ल्यांची उभारणी केली जाते. या परंपरेतून बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये इतिहास, शौर्य आणि संस्कृतीची जाणीव निर्माण होते. यंदा या पारंपरिक उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ल्यांचा आणि तामिळनाडूतील १ किल्ल्याचा अशा एकूण १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. हा सन्मान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘दुर्गोत्सव २०२५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण व्हावा, तसेच पर्यावरणपूरक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघ (महाराष्ट्र राज्य) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ‘सेवा हीच ईश्वर पूजा’ या भावनेतून अत्यावश्यक मदतीचे मोठे कार्य हाती घेण्यात आले असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पुरग्रस्त कुटुंबांना धान्य किट आणि अत्यावश्यक साहित्याचे थेट गावा-गावांत जाऊन वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळी, बेसन, तेल, साखर, मीठ, मिरची पावडर यांसारख्या धान्यासोबतच ब्लँकेट, चटई, साडी, टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडी, ब्रम्हनाथ बोरगाव, गात शिरापूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील भूम व परंडा तालुक्यात तहसीलदार निलेश काकडे,…
नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात नारी शक्तीचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, साड्या आणि फराळवाटप संपन्न चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साठे पिंपळे गावचे शिल्पकार प्रथम नगरसेवक, माजी महापौर कै. प्रभाकर नारायणराव साठे मेमोरियल फाउंडेशन पिंपळे निलख च्या वतीने दिवाळीनिमित्त “भाऊबीज २०२५” या महिला स्नेह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बुधवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिंपळे निलख मनपा शाळेसमोरील मैदानात आयोजित केलेल्या या उपक्रमास हजारो नागरिक विशेषतः महिला भगिनी उपस्थित राहिल्या. या दिवाळी स्नेह उपक्रमांतर्गत, नारी शक्तीचा सन्मान, मनोरंजन पर आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि साड्या आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. परिसरात विविध क्षेत्रात ५ उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना फाउंडेशनचा नारीशक्ती पुरस्कार २०२५…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर ) पहाटे ६ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भव्य स्वरूपात पार पडणार असून, शहरातील नागरिकांसाठी संगीत, नृत्य आणि कला यांचा सुंदर संगम अनुभवण्याची ही एक खास संधी ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा…
वापरात नसलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रात जमा करून दिवाळी साजरी करण्याचे महापालिकेचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रकाशाचा, आनंदाचा आणि स्वच्छतेचा उत्सव म्हणजे दिवाळी. या सणाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे नागरिकांना पर्यावरणपूरक आणि जबाबदार दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी प्रत्येक घरात साफसफाई केली जाते. या काळात अनेकदा जुन्या झालेल्या खेळणी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी अनेक वस्तू फेकून दिल्या जातात. या वस्तू रस्त्यावर टाकल्याने शहराचे सौंदर्य बाधित होते आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते. परंतु, या वस्तू योग्य मार्गाने ‘आर.आर.आर. केंद्रा’त दिल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन गरजूंना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तू महापालिकेने सुरू केलेल्या…
