Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहरात संघटन मजबूत करण्याच्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षविस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. नवनाथ दशरथ मस्के यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला असून, पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या हस्ते त्यांना शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे कामगार आघाडी उपाध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली आणि अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी मस्के यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात नवनाथ मस्के यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य निरीक्षक म्हणून काम केले असून, ते भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर…

Read More

छटपूजा निमित्त विश्व श्रीराम सेनेने केला मोशी इंद्रायणी घाट स्वच्छ पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सूर्य देवतेची उपासना करणारे छट पूजा व्रत उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये मोठ्या भक्ती भावाने साजरे केले जाते. मागील अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील छटपूजा श्री सूर्यषष्ठी महाव्रत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर छटपूजा सोमवारी, (दि.२७) सायंकाळी, ६:०४ वाजता, सूर्यास्त वेळी हजारो भाविकांच्या साक्षीने वाराणसी येथून आलेल्या प्रतिनिधींच्या हस्ते भव्य गंगा आरती करून साजरा करण्यात येणार आहे. समारोप मंगळवारी (दि.२८) सकाळी ६:३३ वाजता, सूर्योदय वेळी सूर्याला अर्ध्य देऊन…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी प्राप्त निधीतून आळंदी येथील आरक्षित भक्त निवासच्या जागेत भक्तनिवास सह आळंदीत विविध विकास कामांचे भूमिपूजन, घाटाचे नूतनीकरण, आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सवलत प्रतीचे प्रकाशन रविवारी ( दि. २६ ) सकाळी ११ वाजता आळंदीत होणार आहे. या निमित्त फ्रुटवाले धर्मशाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदींच्या उपस्थितीत सभेचे आयोजन आळंदी देवस्थानने केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त आळंदी नगरपरिषद आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी नागरिक, वारकरी, भाविक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या विविध विकास कामांच्या समारंभास पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती…

Read More

पुणे ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमा अंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी साठी ऑफलाईन सुविधे सोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रीं ना ११०० नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला अंतःकरणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच् प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. नारळांची आरास व धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून कार्यरत वुई टुगेदर फाउंडेशन ने यंदाच्या दिवाळीत एक हृदयस्पर्शी आणि निस्वार्थी उपक्रम राबवला. समाजातील वंचित आणि कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प फाउंडेशनने केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. या उपक्रमांतर्गत कष्टकरी महिलांना सन्मानपूर्वक दिवाळी फराळ, मिठाई, रोख मदत, पणत्या आणि दिवे यांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लकेर उमटली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंथन फाउंडेशनच्या आशा भट्ट–वेलणकर आणि कायदेतज्ञ मनीषा महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या निस्वार्थी समाजोपयोगी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. सहसचिव…

Read More

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – परमपूज्य प्रशांत ऋषी महाराज साब यांच्या मंगल वाणीने संपूर्ण भक्तामर स्तोत्र संपुट आराधना मंगलमय वातावरणात संपन्न झाली. दापोडी येथील जैन धर्म स्थानकात भक्तामर या स्तोत्राचे 48 श्र्लोक व त्यांचा अर्थ, विश्लेषण व प्रवचन वि त्याची संपुट आराधना 48 दिवस नियमीतपणे चालू होती . आज शेवटच्या गाथेची 48 व्या श्लोकाची संपूट साधना 48 दंपत्ति व इतर भाविक पण सम्पुट साधने साठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रावकांनी श्वेत वस्त्र आणि श्राविकांनी लाल साडी परिधान केली होते. संपुट साधनेच्या श्लोकांच्या उच्चाराने वातावरण अतिशय मंगलमय झाले होते. आनंदशिष्यरत्न परमपूज्य प्रशांत ऋषीजी महाराज साब यांनी भक्तामर स्तोत्रातील सर्व श्र्लोकांचे…

Read More

वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवा-सुविधांशी निगडीत कामे होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने एकप्रकारे हे चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट मिळाले असून हा शासन निधी पिंपरी-चिंचवड शहरासोबतच विशेषतः वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने वाढणाऱ्या भागाला अधिकचा निधी देऊन तेथील विकासाला हातभार लागला आहे. राज्यातील महायुती सरकार विकासाचे उदिष्ट साध्य करणारे व जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून सातत्याने शासनाच्या…

Read More

भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यंदाही पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात हनुमान मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक छठ पूजेचा भव्य सोहळा चिंचवडगावातील पवना नदी घाटावर (हॉटेल रिव्हर ह्यु, गणपती विसर्जन घाट) आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याकरिता आवश्यक परवानग्या आणि सुविधा वेळेत उपलब्ध कराव्यात यासाठी हनुमान मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विजय आर गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच विद्युत विभाग यांना नुकतेच निवेदन दिले आहे. नुकतीच गुप्ता यांनी शिष्टमंडळासोबत पवना नदी घाट परिसराची पाहणी केली. निवेदनात घाट परिसर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक दिवाबत्ती व फोकस…

Read More