Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजता, पिंपळे निलख, डी. पी रोड, विशालनगर, हॉटेल रंगला पंजाब शेजारील मैदानावर महिला भगिनींसाठी “न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, पुणे मनपा च्या माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे व बालगायिका, टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास मानाच्या पैठणी सह…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात होणाऱ्या जनसंवाद सभांसाठी नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या विभागाचे प्रमुख म्हणून डॉ. प्रदीप ठेंगल हे जबाबदारी पाहत आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत वेळोवेळी जनसंवाद सभा आयोजित केल्या जातात. या सभांदरम्यान नागरिकांच्या अडचणी, मागण्या व सूचना प्रभावीपणे नोंदविणे, त्यांचे संकलन करणे आणि आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे या दृष्टीने समन्वय राखला जावा, तसेच नागरिकांच्या सोयीकरिता माहितीचे संकलन एका ठिकाणी व्हावे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  निगडी भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू असून, या कामासाठी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित (शिफ्ट) करावी लागणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हे काम ३० ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामासाठी, सदर जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी इत्यादी भागातील ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (३१ ऑक्टोबर २०२५) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर तात्काळ कारवाई करा. यासाठी गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्या. शहरात अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास ते तात्काळ हटवावेत, असे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. सर्व प्रभाग स्तरावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र पथक नेमावे आणि त्या माध्यमातून कारवाई करण्याची मोहीम सातत्याने राबवावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची विविध कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात आयुक्त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत ३२ प्रभागातून एकूण १२८ नगरसेवक चार सदस्यीय पद्धतीने निवडले जाणार आहेत. महापालिकेची अंतिम प्रभागरचना सहा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये सहा प्रभागांत बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आरक्षणातही फेरबदल होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ४ नोव्हेंबरपर्यंत आयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्ण करून ११ नोव्हेंबर…

Read More

तळवडे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “दिवे लावून घर उजळतं, पण माणसांच्या हास्याने समाज उजळतो,” या भावनेला साजेशा वातावरणात प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने सफाई कामगार, घंटागाडी कामगार, ड्रेनेज सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंध नागरिक तसेच बचत गटाच्या कॉर्डिनेटर व सहयोगिनींना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी निःशब्दपणे योगदान देणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य म्हणजेच ‘सोनेरी दिवाळी’, असे समाधान व्यक्त करत नगरसेवक भालेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत पतंगे, अध्यक्ष प्रभाकर चौधरी, रमेश…

Read More

हजारो भाविकांची आळंदीत गर्दी ; वरुणराजाचीही हजेरी ; फटाक्यांची आतिषबाजी आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील पवित्र इंद्रायणी नदी घाटावर महाराष्ट्रात स्थायिक तसेच उत्तर भारतीय नागरिकांनी महाछठ पर्व परंपरागत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा हजारो उत्तर भारतीय नागरिक, भाविकांनी मोठी गर्दी करून व्रत जोपासले. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी, पूजा पाठ, व्रत परंपरा जोपासत महाछठ पर्व साजरे केले. या वेळी वारुणराजानेही हजेरी लावली. यातही उत्तर भारतीय नागरिकांनी उत्साह कमी होऊ न देता छठ पूजा परंपरेने उत्साहात साजरी केली. यावेळी नारी रत्न डॉ. सुनीता पाटेसकर यांचे कार्याचा सन्मान करीत त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबाद प्रमाणे पिंपरी फुल बाजार तसेच शगुनचौक फुल विक्रेते संघ येथील व्यापऱ्यांनी केले घबाडसष्टी उत्साहात साजरे केले. यावेळी दुकानांना फुलांची आकर्षण फुलांच्या सजावट रंगबिरंगे तोरण रांगोळी फाटक्याची आतषबाजी शेतकरी यांची जुनी उधारी वा कर्मचारी यांना दिवाळी बोनस तसेच वजनकाटा हिशोबाची बिलबुक व्यवहार यांची पूजा व ग्रहकांना दिवाळी बोनस वाटप करत साजरा करण्यात आले घाबडसष्टी पूजा. यावेळी व्यापारी मातोश्री सप्तश्रुंगी पुष्प भांडार ची मालक मीना आहेर,  गणेश आहेर,राजकुमार मोरे, दत्तात्रय फुले,नितीन रासकर, संजय बोडके. ज्ञानेश्वर केमसे. बाबा रासकर,शिवाजी सस्ते, शहाजे मामा राक्षे,विश्वास तापकीर, दत्तात्रय ठाकर. संतोष जाधव. शाम मांडगे, प्रणित बडदे, बाळू मामा वाघुले, संतोष फुले,सचिन…

Read More

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आनंद शिष्य रत्न प्रवचन भास्कर प पू प्रशांतऋषिजी म सा यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महर्षि आनंद सेवा भक्ति प्रतिष्ठान चे ह्या वर्षिच्या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी नुकतीच दापोडी जैन स्थानकामध्ये धर्मसभेमध्ये केली. दुबई येथील नवयुवक जैनम जैन याला जैन युवा प्रेरणा – महर्षि आनंद सेवा पुरस्कार, जिविका जैन हिला जैन आगम अध्यात्मिक – महर्षि आनंद सेवा पुरस्कार आणि निर्मलाताई चंद्रकांत जी छाजेड़ यांना समाजसेवा क्षेत्रातील- महर्षि आनंद सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दिली. सदर पुरस्कार प पू प्रशांतऋषिजी म सा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिवाळी काळात कचरा संकलनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांच्या काळात तब्बल ५ हजार ६५८ टन कचरा संकलित केला आहे. दिवाळीच्या काळात घराघरात करण्यात येणारी साफसफाई, बाजारपेठांतील गर्दी, फटाक्यांचा कचरा आणि सजावटीसाठी वापरले जाणारे साहित्य यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली कचरा संकलनाचे विशेष नियोजन केले होते. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी…

Read More