Author: maharashtrabreakingnews.com

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी सहभागी होणार पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) तर्फे विद्यापीठाची प्रमुख राष्ट्रीय डिझाइन परिषद ‘क्वासार २०२५ – Designing What’s Next’ ही ३० व ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव म्हणून साकारलेली ही दोन दिवसीय परिषद डिझाइनच्या भविष्यदृष्टीचा शोध घेणार असून तिचा प्रभाव उद्योग, तंत्रज्ञान आणि समाज या सर्व क्षेत्रांवर अधोरेखित करण्याचा उद्देश आहे. देशभरातील नामवंत डिझाइन तज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी होणार असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर यांनी दिली. डॉ. ठाकूर…

Read More

उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने विजय गुप्तांची मागणी चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचवडगावातील पवना नदी किनारी मोठ्या उत्साहात हनुमान मित्र मंडळ आणि छठ पूजा समिती आयोजित उत्तर भारतीयांचा पारंपरिक छठ पूजेचा भव्यदिव्य सोहळा सोमवारी ( दि. 27) रोजी उत्साहात पार पडला घाटावर सुर्यषष्टी महाव्रत महापूजा, छोटकी छट, भव्य गंगा आरती सह विविध, धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी उत्तर भारतीय महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा असल्याचा अनुभव येथील भाविकांनी सांगितला. यावेळी भाविकांच्या ” जय छठमाता…

Read More

पिंपरी, पुणे (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) –  मातृ मंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार जाहीर झाले असून जगद्गुरु प्रकाशनाच्या डॉ. कल्पना काशीद आणि लेखक डॉ. विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ या ग्रंथास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. त्याचबरोबर संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉ.   के. वा. आपटे यांच्या ‘षष्ठ पंचशीका’  या ग्रंथास प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी माहिती संस्थेचे कार्यवाह मनोज देवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   पुण्यातील मातृ मंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने गेल्या २७ वर्षांपासून संत साहित्य विषयक लेखन, ग्रंथासाठी पुरस्कार दिले जात आहे. लेखक आणि प्रकाशक यांना विभागून पुरस्कार देण्यात येतो. समीक्षक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (एमएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील अत्याधुनिक स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आली. आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार असून, स्पीड क्लाइंबिंग, लीड क्लाइंबिंग आणि बोल्डरिंग या तीन थरारक प्रकारांमध्ये १३ आणि १५ वयोगटातील मुले-मुली आपले कौशल्य प्रदर्शित करतील.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली व शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रभाग क्र. ३ चऱ्होली अंतर्गत सैनिक कॉलनी, सेव्हन हिल्स कॉलनी परिसरात…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिस तपासात आरोपी पत्नी चैत्राली भोईर हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) प्रियकर सिद्धार्थ पवार याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी पत्नी चैत्राली आणि सिद्धार्थ या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी नकुल भोईर यांचा खून करण्यात आला. घटनेनंतर पत्नी चैत्राली हिने स्वतःच पोलिसांना फोन करून “आपण पतीचा खून केल्याची कबुली” दिली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड येथे घडला आहे. या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला भाजपची सक्रिय पदाधिकारी असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे खाते बदल आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली आहे.  महापालिकेमध्ये निवडणूक व जनगणना आणि कर आकारणी व संकलन विभाग अशा दोन विभागाचे कार्यभार सांभाळणारे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली नागपूर येथे बदली झाली. यामुळे रिक्त झालेल्या कर आकारणी व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे (क्रीडा विभागासह) सोपविण्यात आला आहे.  तर आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत अभियान विभागाचा कार्यभार पाहणारे उप आयुक्त सचिन पवार यांना निवडणूक व जनगणना विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.  दरम्यान, नागरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडकरासंह तमाम वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे  लवकरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ या अभियानामध्ये ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत राहिला. राज्य शासनाची पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक पुढाकार घेतला. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता घेण्यासाठी सहकार्य केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य स्तरीय…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी दि २७ व २८ नोव्हेंबर रोजी पिंपळे  सौदागर येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने महादेव मंदिरा शेजारील पवना नदी घाटावर छट पूजेचे  आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी छट पूजेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्या कडून  नदी घाटाची साफ सफाई करण्यात आली. उत्तर भारतीयांच्या दृष्टीने छट पूजा म्हणजे धरणी माता व सूर्य भगवानची पूजा आहे. विवाहित महिला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी तीन दिवस निरंकार उपवास ठेवून वृत ठेवतात.सूर्याला देव मानून संध्याकाळी दीपक व जास्तीत जास्त सर्व प्रकारचे फळे अर्पण करून सूर्य देवाची आराधना केली जाते.दुसरे दिवशी पहाटे ४ वाजता तोच दिवा व…

Read More