- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजयुमोच्या महिला पदाधिकाऱ्याने मोरे यांच्यावर गंभीर आरोप करत चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाने चांगलेच वादाचे रूप घेतले होते. वाढत्या राजकीय दबावानंतर अखेर मोरे यांनी स्वतःहून पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिला पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत अनुप मोरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विनयभंगासह शिवीगाळ, मारहाण आणि जीविताला धोका अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड परिसरात घडलेल्या घटनेत संबंधित युवतीला मोरे यांचे समर्थक असल्याचे सांगणाऱ्या काही पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील “आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५” या पर्वतारोहण स्पर्धेचे आयोजन होत आहे. भारतीय पर्वतारोहण संस्थान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाईंबिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमध्ये ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील तब्बल १३ देशांतील २०० स्पर्धक सहभागी होणार असून, पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार आहे. या चॅम्पियनशिपचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 🌟 शहरातील पहिली क्लाईंबिंग वॉल –…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड पोलीस स्टेशन येथे भारतीय जनता पक्षाच्या युवती प्रदेश सचिव व महिला पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाचा, तसेच डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि नुकतीच घडलेली नकुल भोईर हत्या या तीन गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे गुरुवार, दि.३० नोव्हेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे ऱ्हास झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांवरील वाढते अत्याचार, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत हिंसाचार आणि सामाजिक असुरक्षिततेची वाढती भावना या सर्व बाबींवर महाविकास आघाडीने तीव्र निषेध नोंदविला. भाजप पक्षातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य निवडणूक आयोगाने आगामी नियोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्ग महापालिकेत असून, या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात महानगरपालिका सदस्य, नगरपरिषद / नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिका आणि ‘अ’ वर्गामध्ये येणाऱ्या पुणे व नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या सात महिन्यांतच तब्बल ६२४ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. चालू आर्थिक वर्षात नागरिकांचा वाढता प्रतिसाद, विभागाचे नियोजनबद्ध कामकाज आणि विविध सवलतींचा लाभ या सर्व घटकांमुळे कर संकलनात विक्रमी वाढ झाली आहे. शहरात सध्या एकूण ७ लाख ४० हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी ४ लाख ७८ हजार मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कर भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत यंदा ऑक्टोबर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील विवाहित महिलांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, कशिश प्रॉडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “शौर्यवती” या नावाने खास सांस्कृतिक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश मराठी भाषेचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शौर्यवंत मराठी स्त्रीची ओळख समाजासमोर प्रभावीपणे मांडणे असा आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊसाहेब भोईर यांच्या मते, “सांस्कृतिक फॅशन शोच्या माध्यमातून महिलांना आत्मविश्वास आणि मराठी संस्कृती सादर करण्याची संधी मिळेल.” हा शो फक्त विवाहित महिलांसाठी असून दोन वयोगटांत स्पर्धा होणार आहे –…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय मंत्रिमंडळाने ८ व्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी देऊन त्याच्या अटी शर्ती नुकत्याच निश्चित केल्या. निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोग आपला अहवाल सादर करीत करेल यात १४ ते ३४ % वेतन वाढ सुचवेल साधारण १५ ते ४७ हजारापर्यंत प्रति महिना वेतन वाढ मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना ८ व्या वेतन आयोग आणि दुसरीकडे असंघटित कामगारांना किमान – समान वेतन सुद्धा मिळत नाही, वेतन महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढवला जात नाही ही स्पष्टपणे दिसणारी विषमता म्हणजे सरकारी कर्मचारी मालामाल आणि असंघटित कष्टकरी कामगार हालाहाल अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. कष्टकरी संघर्ष महासंघ,…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कार्तिकी यात्रा २०२५ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आळंदीत साजरा होत आहे. सोहळ्याचे काळात नागरिक, भाविक यांचे साठी पुणे जिल्हा प्रशासनांचे माध्यमातून विविध नागरी सेवा सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या साठी सर्व शासकीय खात्यांचे माध्यमातून आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, दर्शन बारी व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आदी सेवा सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी अनिल दौन्डे यांनी दिले. आळंदी नगरपरिषद सभागृहात आळंदी कार्तिकी यात्रा नियोजन पूर्व आढावा बैठक उपविभागीय अधिकारी, खेड अनिल दौन्डे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध शासकीय अधिकारी ,…
पिंपरी चिंचवड साहित्य मंच*आयोजित श्रावण शु. प्रतिपदा (२५ जुलै २०२५ ) पासून उपक्रम……. *”लिहिते व्हा…”*…. मालिकेचे नाव : चरित्रात्मक अभंग भाग क्रमांक :- ११, बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५ प्रस्तुतकर्ता : सौ.माधुरी शिवाजी विधाटे *श्री संत तुकाराम* मुखी एक नाम | असे पांडुरंग | अभंगाचा रंग | तुकाराम || निसर्गाची कुशी | भंडारा डोंगर| हेच जणू घर | भक्तिभाव || वृक्षवल्ली हीच | भासती सोयरी | असूनी संसारी | निर्विकार || विठ्ल विठ्ल | नामसंकीर्तन | जाहले तल्लीन | तरुवर || उमटता ध्वनी | टाळ चिपळ्यांचा | थवा पाखरांचा | थांबलासे || विसरले भान | इंद्रायणी जळ | गाथेचे ते बळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वच्छता, पर्यावरण, जैवविविधता, भाषा, संस्कृती, स्वदेशी उद्योग आणि आत्मनिर्भर भारत या विषयांवर सखोल मार्गदर्शन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमातून करतानाच राष्ट्रविकासाचा संदेश दिला असल्याचे भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव म्हणाले. प्रत्येक भारतीयाशी थेट संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या संवादात्मक कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासियांना संबोधित केले. हा प्रेरणादायी कार्यक्रम शहरातील सहकार्यांसोबत पाहून शहरासाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची उर्मी मिळाली असल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक विकास डोळस, वैशाली ताई खाड्ये, अजय पाताडे, संजय…
