- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी परिसरात अलीकडच्या काळात चोरी, मोबाईल स्नॅचिंग, वाहनचोरी आणि तरुणांच्या टोळ्यांमधील हाणामारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि महिलांमध्येही भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक रहिवाशांनी या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी आपल्या निवेदनात काही ठोस मागण्या केल्या आहेत — रात्रीच्या गस्तीत वाढ करावी संवेदनशील ठिकाणी पोलीस पथके नेमावीत निकामी झालेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढवण्यासाठी सुरक्षा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. दररोज संध्याकाळी सात वाजता नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार असून, या काळात प्रेक्षकांना दर्जेदार हौशी नाट्यकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले की, यंदा एकूण २६ हौशी नाट्यसंघ या प्राथमिक फेरीत सहभागी होत असून,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड येथील युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी खेड तालुक्यातील शिवे गाव वनदेव कातकरी वस्तीमध्ये पालावरती साजरी केली. या उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सणाचा आनंद एकत्र लुटला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा पदाधिकारी अजित कुलथे, राजेश राजपुरोहीत, अमित देशमुख, उमेश सांडभोर, अर्थव शिवेकर, ऋषिकेश भालेकर, ओकांर पवार, प्रतिक रामगुडे, साईराज भालेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यानिमित्ताने सरपंच अक्षय शिवेकर, शांताराम शिवेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, ज्ञानेश्वर शिवेकर, संतोष शिवेकर, नामदेव शिवेकर आणि शिवाजी शिवेकर यांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या महिन्यात पिंपळे गुरव परिसरात वडाचे झाड पडून संजय भिसे या नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे. संजय भिसे यांची दिवाळी आनंदी व्हावी, यासाठी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पुढाकार घेत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. जगताप यांनी रुग्णाच्या घरी भेट देऊन विचारपूस केली आणि वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. स्थानिक नागरिकांनी या संवेदनशील भूमिकेबद्दल राजेंद्र जगताप यांचे कौतुक केले आहे. यावेळी बंजारा समाज संस्थेचे शहराध्यक्ष संदीप राठोड, राजमाता जिजाऊ डेअरीचे उद्योजक बाळासाहेब तुकाराम देवकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ऍड. अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे. महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारली आहे. यामध्ये पिंपरी येथील महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, रुग्णालये अशा विविध ८६ ठिकाणी सौर पॅनेल्स महापालिकेने बसवले आहेत. याद्वारे सप्टेंबर २०२५ पर्यंत ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज निर्मिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी दिल्ली येथे आयोजित अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स फेस्टिव्हल २०२५ दरम्यान “समावेशक, सक्षम व शाश्वत शहरे” या विषयाखाली ‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन’ (IURC) आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रमाचा भारतात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ‘आययूआरसी इंडिया किक-ऑफ मिटिंग’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रात युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, राष्ट्रीय भागीदार तसेच सहा भारतीय पायलट शहरे, ज्यामध्ये चेन्नई, पिंपरी चिंचवड, जबलपूर, कटक, गँगटोक आणि लेह यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी शाश्वत शहरी विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर सखोल चर्चा झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनांविषयी दिली माहिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेत अनेक वर्षे जबाबदारीने, प्रामाणिकपणे कामकाज केलेले आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने महापालिकेचा नावलौकिक वाढविणा-या या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा आदर्श कार्यरत असणा-या कर्मचा-यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले तसेच सेवानिवृत्तांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे ऑक्टोबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे १२ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १० अशा एकूण २२ कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभयचंद्र दादेवार,मुख्य कामगार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यापाठोपाठ अतिरिक्त आयुक्त (क्रमांक एक) प्रदीप जांभळे पाटील यांची शुक्रवारी (दि. 31) बदली झाली आहे. त्यांची सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे म्हणजेच वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी शुक्रवारी (दि. 31) काढले आहेत. प्रदीप जांभळे पाटील हे वसई-विरार महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. 22 सप्टेंबर 2022 रोजी त्यांची प्रतिनियुक्तीने महापालिकेच्या आतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने महापालिकेमध्येच उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. शासनाने आपल्याच आदेशावर घूमजाव करत पुन्हा जांभळे यांची नियुक्ती केली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची प्रभागनिहाय विभाजित करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्याची संधी आहे. प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भागवानी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील एक प्रगत शहर असूनही, पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना आजही ‘दिवसाआड पाणी’ या मूलभूत समस्येशी लढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची ही गंभीर समस्या प्रशासनाच्या अक्षमतेमुळे वाढली असून, सध्या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी दाबाचा आणि अनियमित होत असल्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीचे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. रविराज काळे यांनी स्पष्ट केले आहे की, एका बाजूला सध्याच्या नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी मिळत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिका कोणतीही दूरदृष्टी न ठेवता असंख्य नवीन बांधकामांना भरमसाट…
