Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ३६वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. दरम्यान स्पर्धेचा समारोप २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या अनुपस्थितीने उपस्थितीपेक्षा चर्चाच जास्त रंगली. मुख्य संयोजक म्हणून त्यांचे नाव आमंत्रणपत्रिका आणि बॅनरवर झळकत असतानाही, तांत्रिक कारणास्तव ते कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. तरीसुद्धा, मेळाव्यातील वातावरण मात्र पूर्णपणे ‘मोरे-मय’ राहिले. कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी जाहीर केले की, “अनुप मोरे काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.” मात्र, या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणांचा जल्लोष आणि त्यांच्यावरील निष्ठा स्पष्टपणे जाणवत होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी “जहां भरोसा होता है, वहां मौजूदगी की जरूरत नहीं होती” हे वाक्य सार्थ ठरवले. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व इच्छुक उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून…

Read More

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुलसी विवाह दापोडी सांगवी पिंपळे गुरव फुगेवाडी कासारवाडी येथील विविध मंदिरांमध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला. आज सजली तुळस शालू हिरवा नेसून कृष्ण भेटीसाठी तिचे मोहरल पान पान अंगणात उभारला आज विवाह मंडप ऊस झेंडूच्या फुलांची त्याच सजली आरास… मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनो तुम्हाला तुळशी विवाह निमित्त शुभेच्छा हिंदू धर्मात तुळशी विवाहाला धार्मिक महत्त्व आहे तुळशी माते सोबत भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा या दिवशी विवाह आयोजित केला केला जातो. विधी नुसार या दिवशी तुळशी शाळीग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येथे कधीकधी उत्सव पाच दिवस कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या आयएफएससी आशियाई स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळत आहे. शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी आणि राज्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे,’ असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे सह आयोजकत्वाने आय.एफ.एस.सी. एशिया यांच्या मान्यतेने तसेच भारतीय पर्वतारोहण संस्थान आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील महानगरपालिकेच्या योगा उद्यानातील पी.सी.एम.सी. क्लायबिंग वॉल येथे दि. १ ते ४ नोव्हेंबर या काळात येथील आय.एफ.एस.सी. एशिया किडस् अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आलेले होते,या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांचे हस्ते काल संध्याकाळी संपन्न झाले त्यावेळी…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘रामदूत हनुमान म्हणजे आदर्श कार्यकर्ता होय!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी वनवासी विद्यार्थी वसतिगृह, राजगुरूनगर येथे (रविवार, दिनांक ०२) व्यक्त केले. बजरंग दल भीमाशंकर जिल्हा आयोजित दोन दिवसीय अभ्यासवर्गात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. याप्रसंगी प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, भास्कर भगत, विभाग संयोजक आविष्कार सावंत, संजय गोडबोले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे प्रचंड ताकद असूनही महाबली हनुमान यांनी प्रभू रामचंद्र यांच्या पायाशी निष्ठा अर्पण करून त्यांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  युवा आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये साहित्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शन भरवले जाणार आहे. हे प्रदर्शन नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे होणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. यासोबतच, आमदार अमित गोरखे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता राजर्षी शाहू क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. तीन दिवसीय चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी १०:०० ते सायंकाळी ८:३० वाजेपर्यंत…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रबोधिनी एकादशी निमित्त आळंदी मंदिरासह अलंकापुरीत माऊलींचे पालखीची नामजयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली.आळंदी पंचक्रोशीतून माऊलींचे दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली. आळंदीत विविध उपक्रमांनी एकादशी साजरी झाली. इंद्रायणी आरती हरिनाम गजरात उत्साहात झाली. एकादशीचे प्रथा परंपरा कायम ठेवत माउलींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. प्रदक्षिणा रस्त्याचे दुतर्फा भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यास गर्दी केली. हजेरी मारुती मंदिर मार्गे इंद्रायणी नदी किनारा मार्गे श्रींची पालखी खांद्यावर हरिनाम गजरात मिरवीत ग्रामस्थ भाविकांनी मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यावर प्रमुख मानकरी व सेवकांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले. मंदिरात विविध कार्यक्रम…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १ मधील महिला भगिनींसाठी जितेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा आणि आनंददायी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम चिखली येथील म्हेत्रे गार्डन येथे मंगळवारी 4 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता  पार पडणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजिका शीतल यादव यांनी दिली. महिलांसाठी मनोरंजन, स्पर्धा आणि भरपूर सरप्राईझ गिफ्ट्स अशा या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरा भाग्यवंत भगिनींना सोन्याची नथ आणि मानाची पैठणी भेट म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपस्थित माता-भगिनींसाठी प्रत्येकासाठी आकर्षक भेटवस्तूंची सोय देखील करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीच्या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडमधील माणिक कॉलनी परिसरात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात आरोपी पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार यांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या दोघांकडून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी तपास सुरु असून, सिद्धार्थ पवारचा मोबाइल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आला नाही, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा २४ ऑक्टोबरच्या पहाटे त्यांच्या घराजवळील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ गळा आवळून खून करण्यात आला. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी चैताली भोईर हिने स्वतःच पोलिसांना फोन करून खून केल्याची कबुली दिली होती.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक ४, ६, ९ तसेच गंधर्व नगरी परिसरातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या परिसराला महावितरणच्या सेक्टर १० उपकेंद्रातून कार्यान्वित जलवायु विहार या उच्चदाब विद्युत वाहिनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. परंतु, या वाहिनीवर कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास संपूर्ण लाईन बंद ठेवावी लागे, त्यामुळे पूर्ण परिसर अंधारात जात होता. ही समस्या आता कायमस्वरुपी सुटणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे तीन ठिकाणी ‘आरएमयू’ बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आज या कामाची पाहणी कामगार नेते सचिन लांडगे यांनी केली. यावेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे,…

Read More