Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे भारत आणि युनायटेड किंगडम शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (एनआयएसएयू) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष कार्यक्रम गुरुवारी (दि.६ नोव्हेंबर) सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जगातील नामांकित विद्यापीठे, शिक्षणतज्ज्ञ आणि यूके मधील भारतीय माजी विद्यार्थी पीसीयू च्या विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणार आहेत.         या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शैक्षणिक व्यावसायिकांना यूके मध्ये शिक्षण घेण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाणार असल्याने, महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीकरिता पुणे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीची तयारी महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केली आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाणार असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली कलात्मक प्रतिभा राज्य पातळीवर दाखवून दिली आहे. मुंबई येथील म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या प्रतिष्ठित संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन” या कला स्पर्धेत महापालिकेच्या दोन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र राज्यभरातून आलेल्या ५०० हून अधिक स्पर्धकांमधून निवडण्यात आली आहेत. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. “सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाण” या तिन्ही घटकांवर आधारित या स्पर्धेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीद्वारे एक वेगळा ठसा उमटवला. या स्पर्धेतील पहिल्या ५५ उत्कृष्ट चित्रांमध्ये पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या थेरगाव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राज्यातील प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन आता युद्धपातळीवर सक्रिय झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ग्राहक व विक्रेत्यांविरुद्ध बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारचा वापर आढळल्यास दंडात्मक कारवाईसोबतच कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली. राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्लास्टिक लेप असलेल्या किंवा प्लास्टिक थर असलेल्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. या अधिसूचनेअंतर्गत पेपर किंवा ॲल्युमिनियमवर प्लास्टिकचा थर असलेले डिश, कप, प्लेट, वाडगे, कंटेनर, चमचे, ग्लास इत्यादी एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू पूर्णपणे बंदीच्या यादीत समाविष्ट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवरील हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय चार उपायुक्तांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील २०५-चिंचवड विधानसभा, २०६-पिंपरी विधानसभा, २०७-भोसरी विधानसभा आणि २०३-भोर विधानसभा मतदारसंघ (ताथवडे गाव) या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत १ कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. ६८५९ सदस्य यातून निवडून येणार आहे. १४७ नगरपंचायती आहेत त्यापैकी…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मतदार यादीतील दुबार नोंदीमुळे विरोधी पक्षांनी त्या दुरुस्त करून निवडणूक घेण्याची मागणी केलेली असताना आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पालिकांसह महानगरपालिकांची निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून यानंतर लगेचच महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार आहे. या काळात कोणतीही लोकप्रिय घोषणा, विकासकामे केली जाणार नाहीत. सुमारे दीड-दोन महिने ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या निवडणुका दोन-तीन टप्प्यांत देखील घेतल्या जाण्याची शक्यता…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘पद्मश्री गिरीश प्रभुणे हे समाजऋषी आहेत!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांनी एम. ई. एस. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड येथे रविवार, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी काढले. स्व. लौकिक माटे सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना अनिल कवडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे, डॉ. सतिश देसाई, महेश माटे, माजी नगरसेवक विजय लांडे – पाटील, पिंपरी – चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ॲड. संकेत राव, ज्येष्ठ कलाकार डॅा संतोष बोराडे, लौकिक माटे सोशल फाउंडेशनचे संचालक ओंकार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खूनप्रकरणात दोन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. नकुल याच्या पत्नीच्या प्रियकराचा मोबाइल फोन हस्तगत करायचा आहे, असे सांगून पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयात केली होती. चैताली नकुल भोईर (२८, रा. माणिक काॅलनी, चिंचवड) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. लिंकरोड, चिंचवड), अशी पोलिस कोठडी वाढवण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्‍यांची पत्‍नी चैताली हिने आपण एकटीने केल्‍याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. चिंचवड येथील माणिक काॅलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ २४ ऑक्टोबर रोजी…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ  शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली, स्वामी विवेकानंद मंडप, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे. यंदा एकूण ३३३४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मंडी, हिमाचल प्रदेशचे संचालक प्रा. डॉ. लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन व…

Read More