- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक समूहांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि टाटा मोटर्स लि. (टीएमएल), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लि. (टीएमपीव्हीएल) यांच्या मधील सामंजस्य करारामुळे पीसीईटी शैक्षणिक समुहातील संस्थांमधील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन पीसीसीईटीचे विश्वस्त तथा पीसीयूचे कुलगुरू हर्षवर्धन पाटील यांनी केले. पीसीईटी आणि टीएमएल तसेच टीएमपीव्हीएल यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पीसीईटीच्या वतीने हर्षवर्धन पाटील, डॉ. गिरीश देसाई तर टीएमएल आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला “इच्छुक उमेदवार तथा कार्यकर्ता संवाद बैठक” यशस्वीरित्या संपन्न झाला. या बैठकीमुळे पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, शहर विकासाचा संकल्प सिद्धीस नेण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक, अमित म्हस्के यांचे प्रमुख धोरणात्मक मार्गदर्शन लाभले, तर शहराध्यक्ष रविराज काळे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. अमित म्हस्के यांनी उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना धोरणात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी दिल्लीतील ‘आप’ सरकारने शिक्षण, आरोग्य, आणि मूलभूत सेवांवर यशस्वीरित्या अंमलात आणलेल्या ‘दिल्ली मॉडेल’च्या पारदर्शक आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोरवाडी चौक (अहिल्यादेवी पुतळ्यासमोर) येथे रस्त्याच्या मध्यभागी बसविलेल्या अनावश्यक आणि अशास्त्रीय काँक्रीट डिव्हायडरमुळे शहरातील नागरिक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मनपा प्रशासनावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करत हा डिव्हायडर तात्काळ हटवावा, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे इशारा देताना सांगितले की, “सुशोभीकरणाच्या नावाखाली मनपात मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. मोरवाडी चौकातील डिव्हायडर हा कोणत्याही वाहतूक अभ्यासाशिवाय बसविण्यात आला…
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘‘शतप्रतिशत भाजपा’’ असा निर्धार करण्यात आला असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांनी नियुक्ती करीत ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याच्या तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पवार यांचे ग्रामीण भागात चांगले वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हक्काचे दोन हुकमी एक्के बाहेर काढले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका , महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५’ या स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारताने तब्बल सात पदकांची कमाई करत भारताचा झेंडा उंचावला तर सर्वाधिक १८ पदकांची कमाई करत कोरियाने या स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत आशियातील १३ देशातील १६० हून अधिक युवा खेळाडूंनी सहभाग घेतला. लीड, बोल्डर आणि स्पीड या तीन प्रकारांमध्ये अंडर १३ आणि अंडर १५ गटातील खेळाडू मुला – मुलींनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. दक्षिण कोरियाने लीड आणि बोल्डर प्रकारात वर्चस्व राखत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – युवा आमदार अमित गोरखे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध राजकीय पक्षाचे नेते, कलावंत, साहित्यिक कामगार आणि कष्टकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मांदियाळी उल्लेखनीय होती. साहित्य प्रदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम साजरे झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी गोरखे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. मैत्र भाव जपला. “वाढदिवसानिमित्त साहित्याचा जागर केलेला पहिलाच आमदार, असे उद्गार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी काढल्याने आमदार गोरखे यांच्या कार्याची प्रचिती आली. वाढदिवस सोहळा हा “सेवा, संवेदना आणि समाज बांधिलकीचा उत्सव” ठरला. राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बहीण भावाचे जिव्हाळ्याचे नाते असते. वेळ प्रसंगी बहिणीचे रक्षण करणे ही भावाची जबाबदारी असते. सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता बहिणींच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे हे खूप कौतुकास्पद आहे असे माजी आमदार अश्विनीताई जगताप यांनी सांगितले. पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी भाऊबीज या थीमवर न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजक सचिन साठे, पुणे मनपाच्या माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना शत्रुघ्न काटे, भुलेश्वर नांदगुडे, विनायक गायकवाड, निवृत्त एसीपी श्रीकांत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका केंद्रस्थानी ठेवत मोठी घोषणा केली. जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना पिंपरी चिंचवड शहरातील आगामी निवडणुकांची मोठी जबाबदारी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. शहराचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने दरवर्षेप्रमाणे ह्या वर्षी देखील कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन केले होते. ह्या दीपस्तवाचे उद्घाटन कार्यक्षम नगरसेविका अश्विनी चिंचवडे तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व ब्राह्मण महासंघाचे मार्गदर्शक महेश कुलकर्णी व प्रदेशाचे उपाध्यक्ष पुष्कराजजी गोवर्धन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्तावना ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केली. नगरसेविका आश्विनी ताई चिंचवडे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. घरातील अमंगल व दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये आरोग्य व धनसंपदा लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व सांगताना महेश कुलकर्णी यांनी सांगितले की त्रिपुरासुर नावाचा राक्षसाचा वध ह्याच दिवशी केला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओबीसी आरक्षणबचाव कृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हॉलमध्ये (महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाच्या मागील बाजूस), पिंपरी येथे होणार आहे. या बैठकीचा विषय “ओबीसी आरक्षणाची दशा व दिशा” असा असून, ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि पुढील आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी नामांकित ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील आणि राजाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या टिकावासाठी सध्या राज्यभरात सुरू असलेल्या चळवळीला गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार…
