- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने राबविलेल्या विविध जनजागृती उपक्रमांमुळे आणि सुलभ ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिक आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमातून मालमत्ता कर भरण्याकडे वळले आहेत. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शहरातील ७ लाख ४० हजार मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ७७ हजार २८४ मालमत्ताधारकांनी कर भरला असून, त्यापैकी ३ लाख ९३ हजार ७७१ मालमत्ताधारकांनी ऑनलाईन माध्यमातून कर भरला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेने कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘ऑनलाईन कर भरा’ या मोहिमेखाली नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्या जात आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील उद्योग – व्यवसाय वाढीसाठी येणाऱ्या अडचणींसह उद्योजकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीए तत्पर असल्याची ग्वाही महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. आकुर्डीतील ग.दि. माडगुळकर सभागृहात शुक्रवारी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. उद्योग – व्यवसाय वाढीसाठी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. त्या अडचणी सकारात्मक दृष्टिकोनातून कशा सोडवता येतील, यासाठी तालुका कार्यालय स्तरावर पीएमआरडीए तातडीने पावले उचलत आहे. उद्योजकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी सहाय्यक नगर रचनाकार आणि सहाय्यक संचालक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात वंदेमातरम गीत एक सूर एक ताल मध्ये सामुदायीक गाऊन , 150 वा वर्धापन दिन देशभक्ती व उत्साहात साजरा केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले वंदेमातरम हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशभक्ती एकता आणि मात्र भूमी प्रेमाचे प्रतीक ठरले. हे गीत आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आदराचे स्थान राखते आणि देशभक्तीची प्रेरणा देणारे म्हणून ओळखले जाते. दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदेमातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील शाळा, महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आज चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने रविवारी पिंपरी येथे अखिल माळी समाजाच्या २७ व्या राज्यव्यापी भव्य वधु – वर, पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नकुल महाजन यांनी प्रसिद्धीस दिली आहे. पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असून अध्यक्ष धुळे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गुलाबराव माळी आणि प्रमुख पाहुणे माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महाजन,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये विद्यार्थी दिन व वंदे मातरम गीतांचा 150 व्या वर्षाचा गौरवपूर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी अरुण चाबुकस्वार सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत विद्यार्थ्यांना संबोधित करत शिक्षण, शिस्त, आत्मविश्वास आणि उद्दिष्ट निश्चित करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सरांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारसरणी जोपासण्याचे, कष्टाचे मूल्य जाणण्याचे आणि समाजासाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील योग पार्क क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. नुकतेच या केंद्रावर ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताने तब्बल सात पदकांची कमाई केली. या क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स मधील क्लाइंबिंग वॉलकरिता कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था तसेच इतर अनुषांगिक कामे करण्याच्या खर्चास आजच्या स्थायी समिती बैठकीत आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. पिंपरी चिंचवड शहरात उभारलेल्या क्लायबिंग वॉल साठी जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असा विश्वास देखील आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला. आयुक्त श्रावण…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप,माजी महापौर राहूल जाधव,नितीन काळजे,माजी नगरसदस्य नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, विकास डोळस, ॲड.मोरेश्वर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अनेक जण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने समोर आणला असल्याचे म्हणत आहेत. मात्र, काही गोष्टी या समोर येत असतात. त्या काढाव्या लागत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. मात्र, हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाने काढला नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती करणार आहे. ज्या प्रभागात युती होईल तेथे युती तर, बाकीच्या प्रभागात स्वबळावर अशी हायब्रिड युती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी चिखली परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरलेले मोफत महाआरोग्य शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळपासूनच नागरिकांनी शिबिर स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. दरम्यान यावेळी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याबाबत माहिती देताना यादव म्हणाले शिबिरात जनरल तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हाड व सांधे तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी तसेच दंत तपासणी आदी विविध विभागांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत सेवा दिली. डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच योग्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ असणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून ६ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येईल. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबर २०२५…
