Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) अ‍ॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभाग तसेच एफइएसए आणि लाइफ स्किल्स सेल विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी  पीसीसीओईआर डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ताथवडे मधील निधी प्रेरणा भवन अनाथ आश्रम येथे दीपोत्सव साजरा केला.     यावेळी विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ निकुंभ, अर्थव देशमुख, राजवर्धन शितोळे, वेदका…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस थांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भा अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी सतीश गव्हाने यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायसीएम…

Read More

झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरी  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री   चंद्रकांतदादा पाटील; पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘जनसंपर्काचा नवा अध्याय’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात दौरा करीत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नियोजनानुसार झालेल्या या दौऱ्यात पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील विविध भागांना भेट देण्यात आली. लवकरच भोसरी विधानसभा भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्य विभागातील तक्रारी यांसह नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर सविस्तर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘साहित्य हे दुःख कमी करण्याचे साधन आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी  थेरगाव येथे (शनिवार, दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. संवाद व्यासपीठ आयोजित लेखक – वाचक संवाद मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज आहेरराव बोलत होते. ज्येष्ठ लेखिका मानसी चिटणीस, लेखक प्रकाश निर्मळ, प्रा. संजय पवार, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, संवाद व्यासपीठचे संस्थापक – अध्यक्ष हरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज आहेरराव पुढे म्हणाले की, ‘ज्यांना जे जे शक्य आहे ते ते त्यांनी वाचावे; कारण त्यामुळे दुःखावर मात करता येते. संतसाहित्याचे मूळ गीतेत आहे. संस्कृत गीतेचे प्राकृत रूपांतर करीत ज्ञानेश्वर…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिकी यात्रे च्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. आळंदी यात्रा १२ ते २० नोव्हेंबर २०२५ कालावधीत होत आहे. यात १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आणि १७ नोव्हेंबर रोजी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन सोहळा असल्याने महाराष्ट्रासहदेश विदेशातून लाखो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तसेच आळंदी आणि देहूगाव येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यातील प्राप्त अधिकारानुसार हे आदेश निर्गमित केले आहेत. जड-अवजड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील ओबीसींच्या राजकीय हक्क आणि प्रतिनिधित्वासंदर्भात या बैठकीत रणनीती आखण्यात आली. बैठकीत ओबीसी नेते राजाराम पाटील, अॅड. मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, पुंडलिक सैदाने, विद्याधर मानकर, आनंदा कुदळे, नकुल महाजन यांनी मार्गदर्शन केले. अॅड. मंगेश ससाणे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व राजकीय पक्षांना लेखी निवेदन देऊन आरक्षित जागांवर मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्यावी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे निलख परिसरातून पुणे स्टेशन, हडपसर आणि स्वारगेट यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धावणारे पीएमपीएमएलचे प्रमुख बस मार्ग अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही सेवा तात्काळ पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टी (आप) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाला दिला आहे. पिंपळे निलखसाठी दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख आधार असलेल्या बस क्रमांक 100 (पुणे स्टेशन), 333 (हडपसर) आणि 21 (स्वारगेट) या मार्गावरील सेवा बंद झाल्याने अनेक विद्यार्थी, नोकरीला जाणारे नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांवर मोठा ताण आला आहे. बस सेवा बंद असल्यामुळे संबंधितांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी महागडी खासगी वाहतूक वापरण्याची…

Read More

-हिंजवडी आयटी पार्कसोबत मावळ ग्रामीण भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड मतदार संघातून जाणारा मुंबई बंगळुरूमहामार्गावरील  वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्या संदर्भातील  कामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. या सेवा रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. आवश्यक ठिकाणी जागा हस्तांतरित करून मूलभूत सेवा सुविधांची विकास कामे देखील पूर्ण करावी अशा सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुळा नदी ते भुमकर चौक आणि भुमकर चौक ते मुळा नदी हा गोल सर्कल हा मार्ग प्राधान्याने पूर्ण केला जावा . यामधील पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी निचरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)पिंपरी विधानसभेतील संत तुकाराम नगर प्रभागातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुनश्च प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ननावरे हे काही वर्षांपासून शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात कार्यरत होते. मात्र पुन्हा मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येत त्यांनी ‘घरवापसी’ केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, ज्येष्ठ नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र ननावरे यांनी 2007-2012 या काळात पिंपरी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाला चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे चिंचवड विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नेतृत्वात कोऱ्हाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, ज्येष्ठ नेते अजित गव्हाणे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना अजित…

Read More