- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक शिवदास पिल्ले, लोणावळा उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवासेनेचे विशाल हुलावळे,दत्ता केदारी,नवनाथ हरपुडे उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी खासदार बारणे यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच मूळ शिवसेना आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी आपले “पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भेटीगाठी, सोसायट्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही केले जात आहेत. या माध्यमातून नुकताच शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवक यांच्या पत्नीसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश मंगळवारी केला गेला. भारतीय जनता पक्षाचे आमदार, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सरसावलेले आहेत. महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) —मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने वुई टुगेदर फाउंडेशन आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर ईशा नेत्रालय हॉस्पिटल, चिंचवड येथे पार पडले. शिबिरात १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक मशिनद्वारे नागरिकांची नेत्र तपासणी केली. तसेच सर्जन डॉ. वैभव अवताडे (रेटिना व मोतीबिंदू स्पेशालिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यांचे आजार, त्यांची काळजी आणि वर्षातून एकदा नेत्र तपासणी का आवश्यक आहे यावर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांच्या शंकांचेही त्यांनी समाधान केले. या शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड व वर्क कोऑर्डिनेटर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख नेते मंडळी, पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसमावेशक अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्याम लांडे, शेख, कविता आल्हाट, संतोष बारणे, कैलास बारणे, सतीश दरेकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश सोमवंशी, काळूराम पवार, वर्षा जगताप, संजय औसरमल, राजेंद्र सिंग वालिया, दीपक साकोरे, माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, महेश झपके, संपत पाचुंदकर, राकेश गुरव, धनाजी तांबे इत्यादी उपस्थित होते. कार्यकारिणी खालील प्रमाणे.. शहराध्यक्ष – योगेश बहल मुख्य समन्वयक – विलास लांडे मुख्य प्रवक्ता – अजित…
राजगुरुनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर-खेड मतदारसंघासाठी आमदार अमित गोरखे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर आमदार गोरखे यांनी स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या कार्यदृष्टी तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना जाणून घेतल्या. या मुलाखती काल राजगुरुनगर येथे आमदार अमित गोरखे, उत्तर पुणे ( मावळ )जिल्हा निवडणूक प्रमुख श्री. महेश दादा लांडगे, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप दादा कंद, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. या वेळी पक्ष संघटनेतील पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये जनतेशी नाळ जोडलेले, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उमेदवार पुढे यावेत, यासाठी या मुलाखतींचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ७५ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ही सोडत पार पडली. महापालिकेतील एकूण ३२ प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक अशी व्यवस्था असून, यामुळे नगरसेवकांची एकूण संख्या १२८ इतकी राहणार आहे. येत्या जानेवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे ३२ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अ – ओबीसीसाठी राखीव ब – महिलांसाठी राखीव क – महिलांसाठी राखीव ड – ओपन प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण – गंगानगर – वाहतूक नगरी अ – ओबीसीसाठी राखीव ब – महिलांसाठी राखीव क – महिलांसाठी राखीव ड – ओपन प्रभाग…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून “रिअल लाईफ रिअल पीपल” या उपक्रमांतर्गत सावली निवारा केंद्र, वृद्धाश्रम येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची ओळख करून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली. समाजातील ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या या प्रयत्नाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण विभागाचे मा. उपायुक्त श्री. संजय कदम साहेब तसेच भाजयुमो शहराचे सचिव श्री. अजित कुलथे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी म्हटले…
निळ्या पूररेषेतील बांधकामांना धक्का लागणार नाही- आमदार शंकर जगताप – आमदार जगताप यांच्याकडून निळ्या पूररेषेबाबत नागरिक निर्धास्त ! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड मतदार संघातील निळ्या पूररेषेसंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रश्न राज्यस्तरीय असून त्यावर एकसंध धोरण तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच निळ्या पूररेषेसंदर्भात धोरणात्मक निर्णय होणार असल्यामुळे नागरिकांनी नाहक चिंता करण्याची गरज नसल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. दरम्यान चिंचवड परिसरातील अधिकृत बांधकामांच्या “एका स्क्वेअर फुटा”लाही धक्का लागणार नाही असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले. चिंचवड येथे रविवारी (दि. ९) निळी पूररेषा बाधित गृहरचना संस्था,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा घटक पक्ष असला तरी, स्थानिक स्तरावर स्वतंत्र लढण्याची मागणी ठामपणे पुढे येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट स्थानिक स्तरावर एकत्र आले, तर कार्यकर्त्यांना त्यात समाधानच राहील, असे मत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेस माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, विनायक रणसुभे, काळुराम पवार, कैलास बारणे, सतीश दरेकर,राहुल भोसले, श्याम लांडे, कविता आल्हाट, संतोष बारणे, महेश झपके, राजेंद्र सिंग वालिया आदी उपस्थित होते. सोमवारी नव्या शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बहल म्हणाले, “महायुतीतील तीनही पक्ष एकत्र लढले,…
