- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
एमआयटी एडीटी आणि ॲडमिशन सजेशन आयोजित करिअर गायडन्स सेमिनार संपन्न पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षकांचा ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बारावी नंतर पुढे काय?’ या विषयावर मोफत करिअर गायडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तसेच या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील तज्ञ शिक्षकांना ‘गुरु गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी कार्य चे सहाय्यक संचालक डॉ. उल्हास माळवदे व सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकिशोर कार्लेकर आणि ॲडमिशन सजेशनचे संचालक अक्षय कुमार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२०२६ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने ३२ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १०:०० ते सांयकाळी ०५:०० या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे संपूर्ण माहितीसह अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावेत. अर्जासोबत उमेदवारांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपुर्ण नाव, विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग (ओपन, ओबीसी, एस.सी.,एस.टी), जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, जन्म दिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक इत्यादींसह आपला कार्य अहवाल जोडने…
वैयक्तिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून केला. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अमित जीवन पठारे (३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. त्यावेळी नितीन यांचा मित्र असलेला संशयित अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फाॅर्च्यूनर कार घेऊन तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहिःशाल शिक्षण मंडळ व जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष आणि कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चिंचवड- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला” घेण्यात आली. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. पहिले पुष्प प्रमुख वक्ते डॉ.रुस्तुम दराडे यांनी ‘मुलाखत तंत्र’ याविषयी माहिती दिली. त्यात त्यांनी मुलाखतीसाठी कशी तयारी करावी? तसेच विविध तंत्रांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याविषयी योग्य मार्गदर्शन केले. अशाप्रकारे पहिल्या पुष्पाची सांगता झाली. दुसऱ्या पुष्पाचे प्रमुख वक्ते मुबीन तांबोळी यांची ‘हास्यहंडी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने मिळविलेल्या यशाबद्दल विवेक मालशे याचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी संघाचे खेळाडू राहूल चावरिया, सचिन लोणे, महेश कुदळे, ओंकार पवार, विनोद साळूंखे, कृष्णा चव्हाण, योगेश साठे, निखिल आव्हाड,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ ही मुदत देण्यात आली आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह अशा क्षेत्रीय कार्यालयानिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली. नियुक्तीबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वजनिक स्वच्छतेविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने १ नोव्हेंबर २०२५ ते १० नोव्हेंबर २०२५ या काळात जवळपास ५८ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ६३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांमध्ये कचरा विलगीकरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयानिहाय विविध जनजागृती उपक्रम राबवले जात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली. आरक्षणाचा पडदा पडताच, शहराच्या राजकीय वातावरणात ‘हुर्रे-अरेरे’चा माहोल निर्माण झाला. काहींसाठी आनंदाचा क्षण ठरला, तर काहींच्या चेहऱ्यावर निराशेची छाया उमटली. एकूण ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ही सोडत पार पडली. खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात माजी नगरसेवक, इच्छुक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी हजेरी लावली होती. प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट, आनंदाचे जल्लोष आणि काही ठिकाणी नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आनंदातच कार्यकर्त्यांना “त्वरित कामाला लागा” अशा सूचना दिल्या, तर काही जण शांतपणे बाहेर पडताना दिसले. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय आयुक्त डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महापालिकेची निवड मार्गदर्शक शहर म्हणून केली आहे. या उपक्रमांतर्गत सुरगाणा (जि. नाशिक), लखांदूर (जि. भंडारा), मंचर (जि. पुणे), जामखेड (जि. अहिल्यानगर) आणि आळंदी (जि. पुणे) या पाच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रतिनिधींसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रांचा अभ्यास दौरा पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केला होता. या उपक्रमाचा उद्देश स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांचा अनुभव इतर शहरांपर्यंत पोहोचवणे आणि शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करणे हा होता. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील एक जुने आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सक्रिय आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमित कांबळे यांनी आज पिंपरी चिंचवडमधील आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पिंपळे निलख आणि विशाल नगर परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अमित कांबळे यांच्या प्रवेशामुळे ‘आप’च्या पिंपरी चिंचवडमधील कार्याला नवी ऊर्जा मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पुणे मध्यवर्ती कार्यालय, येथे संपन्न झाला. ‘आप’चे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते कांबळे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक अमित मस्के आणि प्रदेश सचिव अभिजीत मोरे हे देखील उपस्थित होते. ‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर अमित…
