Author: maharashtrabreakingnews.com

सेवा विकास बँकेतील धक्कादायक प्रकार; शासनाच्या परवानगीशिवाय बँक बंद व २०५ कामगाराची कपात पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये शासनाची व कामगार विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे 205 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना Liquidator यांनी कामावरून कमी केले होते.राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली. युवानेते दिनेश पाटील, संघटनेचे कार्यकारणी सदस्य मिलिंद देशपांडे व सोमनाथ वीरकर तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने राकेश गायकवाड,गणेश शेलार, नजीम शेख, गजानन होंडे, सागर बोडके, विनोद साळवे, संदीप धावडे, गणेश काशिद,सुजितकुमार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.आगामी होऊ घातलेली महापालिका निवडणूक आणि निवडणुकीच्या संभावित होणाऱ्या आघाड्यांच्या चर्चा या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या समोर भोसरी विधानसभेतील इच्छुक उमेदवारांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले “लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रतिकूल काळात भोसरी विधानसभेतील पक्षातील पदाधिकारी यांनी पक्षाचं काम अतिशय उत्तमरित्या पार पाडलं होतं. येणाऱ्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असेल. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरात मी वैयक्तिकरित्या लक्ष घालणार असून.सत्ताधाऱ्यांच्या वतीने झालेल्या भ्रष्टाचारास तसेच चुकीच्या पद्धतीने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. त्यासाठी ३२ प्रभागातील १२८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना दिल्या. तसेच युतीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेनेचा शनिवारी (१५ नोव्हेंबर) पिंपरीत पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा पार पडला. यावेळी महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका सरिता साने यांनी केले आहे. उपनेत्या सुलभा उबाळे, इरफान सय्यद, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘सुमारे दोनशे जनजातींना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या हक्कांसाठी आपल्या देशातील पहिला लढा भगवान बिरसा मुंडा यांनी दिला!’ असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी शाहीर योगेश रंगमंच, अनुदानित आश्रमशाळा अर्थात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे (शनिवार, दिनांक १५) व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गौरव दिवस आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्यात पद्मश्री गिरीश प्रभुणे बोलत होते. याप्रसंगी मोशी येथील प्रभारी मंडल अधिकारी बाळकृष्ण साळुंखे, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सुरेश गुरव,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शत्रुघ्न काटे यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाचे तसेच प्रदेशाकडून आलेले आणि सार्वजनिक स्वरूपाचे मिळून तब्बल १९४ कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याचा विक्रम केला आहे. १६ मे रोजी आमदार व प्रदेश भाजपचे निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते अध्यक्ष निवडीचे पत्र श्री.काटे यांना देण्यात आले. उद्या (१६ नोव्हेंबर)पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या श्री.काटे यांनी शहराध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर त्यांचा पहिला सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयात भार्गव सदन येथे पार पडला. तर दुसरा सत्कार स्वातंत्र्यवीर सावरकर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आम आदमी पार्टीने भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा पुकारला आहे. ‘आप’चे नेते अजित फाटके यांच्या नेतृत्वाखाली, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यासाठी आणि शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एका अत्यंत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद यशस्वीरित्या पार पडली आणि यामध्ये महायुतीच्या भ्रष्टाचारावर व ‘आप’च्या विकास मॉडेलवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत, ‘आप’च्या नेत्यांनी केवळ उमेदवारी यादी जाहीर करण्यावर नव्हे, तर दिल्ली-पंजाबमधील ‘आप’चा यशस्वी मॉडेल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश आणि महाराष्ट्र शासनातील ‘महायुती’च्या कथित घोटाळ्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. आम आदमी पार्टीने…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे ३ लाखावर भाविकांनी हरिनाम गजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने साजरी केली. या निमित्त आळंदीत ग्राम दिंडी प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद झाला. परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. आळंदी मंदिरात पहाट पूजा मंगलमय वातावरण धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. रांगोळीचे लक्षवेधी रेखाटनाचे भाविकांनी…

Read More

कृपया प्रसिद्धी साठी.. *सर्व समाजाला सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)“अब की बार 75 पार” चा नारा देत सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार विधानसभा उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. सह संपर्क मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत शहरातील राजकीय, संघटनात्मक आणि विकासकामांचा विस्तृत आढावा घेण्यात आला. आगामी दौऱ्यात महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या सोबत बैठक घेऊन रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. जुळे सोलापूरसह विविध भागातील करदात्यांना योग्य सुविधा…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उन्नती सोशल फाऊंडेशनच्या उन्नती सखी मंच तर्फे आणि टीम शोभा यांच्या सौजन्याने आयोजित ‘फिटनेस फिएस्टा फॉर किड्स’ हा उपक्रम पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डनमध्ये उत्साहात पार पडला. चिल्ड्रेन्स डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:०० वाजता ऊर्जादायी वॉर्म-अप सेशनने झाली. मुलांसह पालकांनीही आनंदाने सहभागी होत विविध फिटनेस उपक्रमांमध्ये मनमोकळा सहभाग नोंदवला. “पालक विरुद्ध मुले”, “शिक्षक विरुद्ध मुले” आणि “मुलांमधील फिटनेस स्पर्धा” अशा रोमहर्षक राऊंड्समुळे कार्यक्रमात चैतन्य मिसळले. नृत्य, योग, हलके-फुलके व्यायाम आणि टीम गेम्सच्या माध्यमातून मुलांनी आनंदाने फिटनेसचा अनुभव घेतला. या उपक्रमाबाबत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष  अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उद्योजक कामगार आणि कार्यकर्ते मूलभूत हक्क मिळविण्यासाठी निवडणुकीत उभे राहणार शहरातील वाढत्या नागरी समस्या, उद्योगांचे संरक्षण, रोजगार निर्मिती आणि स्थानिकांच्या हक्कांचे प्रश्न या बैठकीत प्रमुखतेने चर्चिले गेले. बैठकीतील प्रमुख निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी तर्फे उमेदवार उभे राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.शहराचा निर्णय शहरातील लोकांनी घ्यावा हा हेतू यामागे आहे. प्रत्येक प्रभागात छोटे-मोठे स्टार्टअप उद्योग उभारण्याची योजना आखण्यात आली. यामुळे महिलांना…

Read More