Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास होण्यासाठी प्रथम त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. तरच भावनिक आव्हानांना तर्कसंगत बुद्धीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित होईल. यामुळे भविष्यातील आश्वासक नेतृत्व तयार होऊन समाजाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन निवृत्त कमांडर गिरीश कोंणकर यांनी केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइनच्या आरआयडी ३१३१ अंतर्गत  रोटरॅक्ट क्लबने रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटच्या सहकार्याने ‘नेतृत्व आणि भावनिक बुद्धिमत्ता’ या विषयावर कोणकर यांचे आयोजित केले होते. यावेळी प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, पीएचएफ निवृत्त कर्मचारी इरफान आवटे, रोटेरियन, प्राध्यापक,  विद्यार्थी उपस्थित होते.    पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) च्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) येथे इंटरनॅशनल रिलेशन्स सेल आणि एसीएम – डब्ल्यु यांच्या सहकार्याने दिवाळी निमित्ताने “ट्रेक ऑर ट्रिट हॅलोविन” उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्धघाटन पीसीसीओईआर चे संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी केले. जागतिक संस्कृती ची देवाण घेवाण करणारा हा उपक्रम महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय विभागाने साजरा केला. या कार्यक्रमात हॅलोवीन ट्रेक ट्रिव्हिया, ग्लिच द लूक कॉस्च्युम कॉन्टॅस्ट आणि द हॉन्टेड हंट फॉर द हॉन्टेड हंट यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ही पार्टी थ्रिलर, रोमांचक झाली होती. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या गटाने प्रथम क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यांमध्ये रहाटणी येथील एसएनबीपी स्कूलच्या संघावर ७३ धावा व दहा गडी राखून विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विजयी संघामध्ये अनघा आहेर, श्रेया तरस, आस्था टाक यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत उत्तम कामगिरी केली.     या जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत एकूण ४३ संघांनी सहभाग घेतला होता.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या मुलांनी ॲक्रोबॅटीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आदित्य खाडे, अनय पवार, राजवीर अजूरे आणि पवन खैरवार यांचा विजयी संघामध्ये समावेश होता. या विजयामुळे या संघाची निवड नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत झाली आहे.    कर्वेनगर, पुणे येथे झालेल्या या पुणे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे ग्रामीण, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण, अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर ग्रामीण येथील विविध शालेय संघांनी सहभाग घेतला होता.    याच ॲक्रोबॅटीक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान उच्चशिक्षित डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. त्या इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना झाल्यापासून   संस्थेत सक्रिय आहेत. त्यांची निवड इतर महिला साहित्यिकांना देखील प्रेरणादायी आहे असे इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.   अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून…

Read More

– सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उपक्रम – आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकतेचा संदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी भोसरी विधानसभा संघटनेतर्फे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘‘UNITY MARCH’’ ला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या भव्य उपक्रमात विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था तसेच भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मार्चची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाड्ये, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, उपाध्यक्ष रमेश वहिले, मंडलाध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड आणि पुणे परिसरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रशासकीय अडचणी, कायदेशीर बाबी आणि सदस्यांचे हक्क याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित सहकार मेळाव्यास शहरातून आणि इतर जिल्ह्यांतून मोठा प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम सनय छत्रपती शासन पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे प्रमुख वक्ते असलेले सहकारतज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी सोसायट्यांच्या दैनंदिन कारभारातील समस्यांपासून पुनर्विकासासारख्या महत्वाच्या विषयांपर्यंत सर्व मुद्द्यांवर स्पष्ट, सुटसुटीत आणि कायदेशीर उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कंव्हेयन्स आणि डिम्ड कंव्हेयन्स—सोसायटीचा सर्वात महत्त्वाचा अधिकार ॲड. बोराडे यांनी सांगितले की अनेक सोसायट्या बिल्डरकडून हक्काचे कंव्हेयन्स वेळेत घेत नाहीत, ज्यामुळे भविष्यात पुनर्विकास आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरीतून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएलच्या बसला आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास पिंपरी चौकाजवळील कामगार भवनासमोर पिएमपिएमएल बसला अचानक आग लागली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील पथकाने घटनास्थळी त्वरित धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व १५ प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी पीएमपीएमएलची बस पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघाली. या बसने महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचा थांबा घेतल्यानंतर ती नेहरूनगरच्या दिशेने रवाना झाली. लोखंडे कामगार भवनासमोर आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विना,टाळ,मृदंगाचा त्रिनादासह माउली,माउली,श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल,ज्ञानोबा माउली तुकाराम अशा नामगजरासह जयघोष करीत रविवारी ( दि.१६ ) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल चा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात श्रींचे रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले. सोमवारी ( दि. १७ ) आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले. आळंदीत ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणूकींने नगरप्रदक्षिणा अंतर्गत कार्तिकी वारीत रथोत्सव झाला. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर  जगताप यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक 31 मधील सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील ( ह ) प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये शेख उप अभियंता यांना प्रभागातील स्वामी समर्थ मठ कवडे नगर येथील ड्रेनेज लाईन दुरुस्ती करून चांगला रस्ता करण्यासाठी आठ महिन्यापासूनसांगत असल्यामुळे त्यांना त्याकामासाठी लेखीपत्र देऊन ते काम लवकर करण्याची विनंती केली. विद्यानगर,नंदनवन कॉलनी,साईनाथ कॉलनी,विनायक नगर सुयोग कॉलनी शेजारील रस्ता,समता नगर आदर्श नगर,स्वामी विवेकानंद नगर येथील डांबरी रस्ते खराब झाल्यामुळे ते रस्ते पुन्हा दुरुस्त करावे आणि प्रभाग मधील जुने रमलर खराब झाले आहेत व ते स्पष्ट दिसत नाही त्यामुळे रस्त्यावर…

Read More