Author: maharashtrabreakingnews.com

पिपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहरात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या शेजारील पुण्यापेक्षा पिंपरीतील प्रदूषणात वाढ झाली आहे. शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असून कोट्यवधी रुपये खर्च करुनही प्रदूषण कमी होत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. तातडीने प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी  केल्या आहेत. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिकेने शहराची विभागणी करुन साफसफाईचे कंत्राट दोन ठेकेदारांना दिले आहे. परंतु, नियमितपणे शहरातील रस्त्यांची साफसफाई होत नाही. रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. साफसफाई…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानराज माऊली नाम गजर…. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल….. मृदंग, वीणेसह टाळांचा नाद,… आणि नामदास महाराज यांच्या हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत संत महिमा…हरिनाम जयघोष करीत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविध रंगी फुलांच्या पाकळ्यांची भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी झाली. आळंदी मंदिरात घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी ( दि. १७ ) साजरा झाला. मंगळवारी ( दि. १८ ) श्रींचा वैभवी छबिना पालखी मिरवणुकीने हरिनाम गजरात सोहळ्याची सांगता होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी सांगितले. या वेळी सोहळ्यास संत नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज परिवार, आळंदी संस्थानचे सरपंच प्रमुख…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदु हृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ अंतर्गत दत्तवाडी, मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन व रामनगर परिसरात भव्य आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांत रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत बॉडी फॅट चेकअप, मोफत कांस्य मशीन मसाज व ‘कार्य अहवाल प्रकाशन सोहळा’ यांचा समावेश होता. नागरिकांनी सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरात तब्बल २४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी १८० नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. तसेच १६५ नागरिकांनी रक्त तपासणी, २९५ नागरिकांनी बॉडी फॅट तपासणी, तर ३०५ नागरिकांनी मोफत आयुर्वेदिक कांस्य थाळी मसाजचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘हिंदू समाजाच्या हृदयात सेवाभाव असतो; कारण जन्मापासून कुटुंबात विविध सेवांचे संस्कार नकळत मुलांवर घडवले जातात!’ असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा केंद्रीय सहसेवा प्रमुख स्वपनकुमार मुखर्जी यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, शनिवार पेठ, पुणे येथे (रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सेवाकुंभ २०२५ या सोहळ्यातील समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून स्वपनकुमार मुखर्जी बोलत होते. ज्येष्ठ सिनेअभिनेते प्रवीण तरडे, विश्व हिंदू परिषद प्रांत उपाध्यक्षा माधवी सौंशी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष कृष्णकुमार चांडक, सेवाप्रमुख ॲड.…

Read More

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना दिले निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची सध्याची मुदत संपुष्टात येत असतानाच, ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे. त्यांनी आज महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना याबाबतचे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे की, राज्यातील लाखो पात्र लाभार्थी महिलांना सध्या ई-केवायसी पूर्ण करण्यात मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोर्टलवर वारंवार येणारा सर्व्हर डाऊनटाइम, हंगामी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – बालदिनाचे औचित्य साधून स्वरोपासना म्युझिक अकॅडमी प्रस्तुत ‘गीत फुलोरा’ या गेय कवितांच्या कार्यक्रमाला रहाटणी येथील एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी जी, मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, सोनल श्रीवास्तव यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेतला होता. स्वरोपासनाच्या वाकड कस्पटेवस्ती तसेच पुनावळे काटेवस्ती या शाखांमधील संगीत शिकणारे ओंकार कुलकर्णी, आर्यन पावसे, प्रिया जोशी, वीरा सुरते, राजश्री पटेल, अश्वि नाकाडे या विद्यार्थ्यांनी अभयार्पिता निर्मित ‘गीत फुलोरा’ या गेय मराठी कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये ‘शाळा’ , ‘माझ्या मराठीची गोडी’ , ‘आई’ , ‘चांदोमामा’ , ‘आर्जव’ ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बंकिमचंद्र चटोपाध्याय हे भारतीय राष्ट्रीय विचारप्रवाहाचे मूळ प्रेरणास्थान आहेत. ‘वंदे मातरम्’ या गीताने त्यांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची तेजस्वी ज्योत चेतवली!’ असे प्रतिपादन अभ्यासक नारायण देशपांडे यांनी केले. समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने वंदे मातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने आयोजित केलेल्या ‘वंदे मातरम् – राष्ट्रचेतना स्तोत्र…’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह (पेठ क्र. २६, निगडी प्राधिकरण) येथे झालेल्या या कार्यक्रमात देशपांडे यांनी बंकिमचंद्र यांच्या जीवनातील अपमानाच्या खोल अनुभवातून आणि मातृभूमीच्या भावदर्शनातून ‘वंदे मातरम्’ची निर्मिती कशी घडली, याची सांगोपांग मांडणी केली. ‘आनंदमठ’ कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा संदेश देणारा भव्य ‘रिव्हर सायक्लोथॉन’ उपक्रम यंदा मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि नदी स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रतिवर्षी ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजित केले जाते. मात्र, सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित ठिकाण निवडण्यात आले आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे होणार आहे. पुणे–नाशिक महामार्गाजवळील हे ठिकाण मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये शासनाची व कामगार विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे 205 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना Liquidator यांनी कामावरून कमी केले होते.राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली.  युवानेते दिनेश पाटील, संघटनेचे कार्यकारणी सदस्य मिलिंद देशपांडे व सोमनाथ वीरकर तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने राकेश गायकवाड,गणेश शेलार, नजीम शेख, गजानन होंडे, सागर बोडके, विनोद साळवे, संदीप धावडे, गणेश काशिद,सुजितकुमार चव्हाण व मोठ्या संख्येने बँक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  यावेळी यशवंतभाऊ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या पुढाकाराने आणि शेठ माणिकचंद फाउंडेशन संचलित विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भरभरून सहभाग नोंदवला. या स्पर्धा पूर्णानगर येथील शनी मंदिर ग्राउंडवर आयोजित केल्या होता.कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते सचिन लांडगे, इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा यादव उपस्थित होत्या. आयोजन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी सचिन लांडगे म्हणाले या स्पर्धा भरविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मैदानाकडे वळवणे हे मोठे जिकरीचे काम…

Read More