- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सौभाग्य, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीमती अनुराधाताई गोरखे आणि हम पाच ग्रुप यांच्या संयोजनातून हा भव्य कार्यक्रम राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे काल उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के कोकाटे आणि प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांनी केले या कार्यक्रमाला 4000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला व शेकडो महिलांनी बक्षिसे जिंकली.. शाहू नगर, संभाजी नगर, दत्तनगर, मोरवाडी,म्हाडा विद्यानगर व आसपासच्या परिसरातील माता-भगिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. घर सांभाळणाऱ्या, समाज घडविणाऱ्या आणि आपल्या प्रत्येक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या व्यापक मोहिमेचा उद्देश कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजातील भीती व गैरसमज दूर करणे हा आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग सक्रियपणे सहभागी झाला असून शहरातील सर्व प्रभागांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. महापालिकेच्या वैद्यकीय पथकांत आशा स्वयंसेविका आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांचा समावेश असून ते सलग चौदा दिवस व्यापक सर्वेक्षण करणार आहेत. प्रत्येक पथक दररोज गृहभेटी देत त्वचेवरील चट्टे, सुन्नपणा, नसांमध्ये सूज आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त आयोजित तीनदिवसीय बालजत्रा, मनोरंजन नगरीला परिसरातील बालक, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसामध्ये दहा हजार मुलांनी या बालजत्रेचा आनंद घेतला. बालचमुंनी विविध खेळांचा आनंद लुटला. थेरगावातील पद्मजी पेपर मिल शेजारी १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बालजत्रा पार पडली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाले. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, लोकसभा युवा सेना अध्यक्ष राजेंद्र तरस, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, युवती सेना शहरप्रमुख रितू कांबळे, शहर युवा सेना प्रमुख माऊली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी – पिंपरी-चिंचवड तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. शहराच्या जीवनवाहिनी ठरणाऱ्या आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील प्रचंड दिरंगाई आणि वाढीव खर्चाबद्दल आम आदमी पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार मुदतवाढ देऊनही योजना अपूर्णच राहिली असून, अनेक प्रभागातील नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्वांत धक्कादायक बाब अशी की, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेला अर्धवट काम असतानाही सलग चौथी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ₹९ कोटी ३१ लाख रुपये वाढीव खर्च म्हणून देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीच्या मते, हा वाढीव खर्च म्हणजे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमाला पुणे- पिंपरी-चिंचवडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डुडूळगाव, मोशी येथील ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता होणाऱ्या या सायक्लोथॉनसाठी आतापर्यंत २५ हजाराहून अधिक सायकलपटूंची नोंदणी पूर्ण झाली असून, अवघे ५ दिवस शिल्लक असताना आणखी मोठ्या प्रमाणावर नोंदणी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी भोसरी येथील गावजत्रा मैदानावर होणारा सायक्लोथॉन यंदा प्रथमच नव्या, अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित ठिकाणी मोशी येथे आयोजित केली जात आहे. पुणे–नाशिक महामार्गालगतचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या ,प्रश्न, हक्कासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मिळावे आणि सभा घेऊन जनजागृती करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती ,कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रच्या वतीने बदलापूर ठाणे येथे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात एकमुखाने करण्यात आला. यावेळी समिती अध्यक्ष सागर तायडे,कामगार नेते काशिनाथ नखाते,समिती कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, अकोल्याचे प्रशांत मेश्राम, ठाण्याचे प्रभाकर शिंदे, नवी मुंबईच्या विनीता बाळेकुंद्री, संभाजीनगरचे कमलेश दाभाडे,अशोक जाधव,साताऱ्याचे सागर कुंभार,सोलापूरचे ज्ञानेश्वर देशमुख,लातूर चे अजय कांबळे,ठाणे चे सुनील अहिरे,भंडाराचे मंगेश मोव्हे, धाराशिव चे शुभम गायकवाड, विशाल कांबळे, भंडाराचे पवन कोरतरे,मंगळवेढ्याचे प्रदीप परकाळे,नांदेडचे सुमन अग्रवाल,हिंगोलीचे नितिन घोडके,परभणीचे अशोक वाघमारे,नागपूरचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीनिमित्त शहरातील मतदान केंद्रांची स्थळनिश्चिती, निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांची नेमणुकी, मतदान केंद्रांची सुविधा, अपंगजनांसाठी सोयी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, मतदार यादी अद्ययावत करणे, प्रभागांतील आवश्यक पायाभूत दुरुस्ती, प्रारूप मतदार यादीतील बदल आणि मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्याचे तसेच तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सार्वत्रिक निवडणुकीसह महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सहायक आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप वर्ष २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरला नाही, त्यांच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर प्रति महिना २ टक्के विलंब दंड लागू झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातून देण्यात आली. तसेच दुसऱ्या सहामाहीतील म्हणजेच ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या काळातील मालमत्ता कराच्या बिलावर लवकरच २ टक्के विलंब दंड लागू होणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा करून अतिरिक्त भुर्दंड दंड टाळावा, असे आवाहन विभागाने केले आहे. महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्याबाबत सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे. हिंजवडी व आसपासच्या परिसरात हे प्रकार सातत्याने घडत असून महिलांचा बळी गेला. या अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, हिंजवडी-डांगे चौक रोड, हिंजवडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी ही आपले वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे…
सावरकर मंडळाच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी प्राप्त केले अभिमानास्पद यश पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनातून तसेच राइज अबव्ह या संस्थेच्या सहकार्याने ए एफ सी ए टी (AFCAT) अर्थात एअर फोर्स काॅमन ॲडमिशन टेस्ट आणि सी डी एस ई (CDSE) अर्थात कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम या भारतीय संरक्षण सेवांमध्ये अधिकारीपदाच्या अभ्यासक्रमात अनुक्रमे प्रतीक्षा सावंत आणि हर्ष कांबळे या विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे अशा अभ्यासक्रमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राइज अबव्ह या संस्थेमार्फत प्रशिक्षित करण्यात आलेली ही पहिलीच तुकडी (बॅच) होती. यासाठी सैन्यदलातील माजी अधिकारी आणि एस एस बी…
