Author: maharashtrabreakingnews.com

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय गणेश नगर, थेरगाव येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या “हुतात्म्यांची वीरगाथा कथन ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून “क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ” लेखन करणारे सुभाष चव्हाण होते. अध्यक्षस्थानी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक होते. प्रतिमा पूजन करून अन् ‘वंदे मातरम् ‘ घोष करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे सुभाष चव्हाण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले..” देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा धगधगता इतिहास शालेय विद्यार्थ्यांनी वाचला पाहिजे. क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे, बिरसा मुंडा, उमाजी नाईक, चापेकर बंधू , लोकमान्य टिळक, विनायक दामोदर…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल अनुया कवडे यांना साई ज्योती फाउंडेशन तर्फे यावर्षीचा” राष्ट्रीय भारत भूषण आदर्श शिक्षिका” 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. शालेय शिक्षक, शैक्षणिक सल्लागार, ट्रेनर अशा विविध पदांवर गेल्या 20 वर्षांपासून अनुया या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.विशेष मुलांसाठी अनुया यांचे खास योगदान आहे .बीजेस या सेवाभावी संस्थे तर्फे शालेय गुणवत्ता सुधारणा प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथे प्रकल्प प्रमुख या पदावर काम केले आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा, कॉलेजेस  मध्ये पेस  अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना व्यसनमुक्ती…

Read More

– शहरातील सुमारे पाच हजार महिला कष्टकरी-घर कामगारांची नोंदणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या, घराघरांत स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाशी सतत दोन हात करणाऱ्या घरकामगार व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात येतणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शहरात 100 हून अधिक उपक्रम आयोजित केले आहेत. यावर्षीचा वाढदिवस सफाई-घर कामगार माता-भगिनींना समर्पित करण्याचा संकल्प केला असून, सुमारे ५ हजार माता-भगिनींचा सन्मान होणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक अमोल बांगर यांनी दिली. आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल 100 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच लोकमान्य हॉस्पिटल्सच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेषतः महिलांना स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुपिनगर येथील प्रबोधनकार ठाकरे प्रशाला येथे गुरुवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 5.30 या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले. या स्तुत्य उपक्रमाला परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. मुख्य आकर्षण: या आरोग्य शिबिरात जवळपास 257 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि विविध कर्करोगासह अन्य आजारांची तपासणी करून घेतली. शिबिरातील सुविधा आणि तपासणी:…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी देण्यात आला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले सभागृह येथे मुख्यालय स्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते ३२…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीच्या महिला संघाने पुणे जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. म्हेत्रे स्पोर्ट्स ग्राउंड चिखली येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग नोंदवला असताना आकुर्डी महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करून सर्वांचे लक्ष वेधले. विजयानंतर डी वाय पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे ट्रस्टी तेजस पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर निवृत्त एडमिरल अमित विक्रम यांनी महिला संघाचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल उंचावले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पी. मालथी यांनी संघाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत खेळाडूंचा गौरव केला. डीन अॅडमिनिस्ट्रेशन डॉ एस एस सरनोबत आणि रजिस्टार प्रशांत भालेराव यांनी संघाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डी वाय पाटील  कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आकुर्डी येथे ऐआयसीटीई नवी दिल्ली मान्यताप्राप्त युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. डी वाय पाटिल शैक्षणिक संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले उपस्थितांमध्ये ऐआयसीटीआयई नवी दिल्लीचे प्रमुख प्रशिक्षक महेश कोलते ,सहाय्यक प्रशिक्षक अनिता माने, निरीक्षक रेवती देशपांडे ,संकुलाचे मुख्य वित्तीय अधिकारी बिपिन शर्मा , महाविद्यालयाच्या प्राचार्या पी मालती आणि प्रशासकीय अधिष्ठाता संदीप सरनोबत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश कोलते यांनी आपल्या भाषणात ऐआयसीटीई विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज प्राध्यापक विकास कार्यक्रम युएचविआय’चा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला  महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, माजी नगरसेविका विमल जगताप, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, उपशहरप्रमुख दिलीप कुसाळकर, अँड मुकुंद ओव्हाळ, संतोष सौदणकर, दीपक वाल्हेकर, सुदर्शन देसले, आकाश बारणे, सार्थक बारणे, उमेश पाटील, श्वेता कापसे, दीपा जोगदंड, गणेश पुंडे, नितीन ओव्हाळ, ओमप्रसाद परदेशी, स्वप्निल पुंडे,  हरीनारायण ढोबळे, अँड. प्रवीण गायकवाड, नितीन कन्हेरे, गोपाळ राजपूत, विशाल राजपूत, भारत समाने, आदित्य माने, अथर्व खोल्लम,सुरेश लोखंडे सत्यभान दांगट, तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जीवनामध्ये गुरूंना महत्त्वाचे स्थान आहे, परंतु आई, वडील हेच पहिले व सर्वोच्च गुरू आहेत असे प्रतिपादन नवनाथ बोऱ्हाडे यांनी केले.    सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करणे आणि सामाजिक सलोखा वाढविणे या उद्देशाने रविवारी, कासारवाडी माध्यमिक विद्यालयातील १९८६ – ८७ च्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नवनाथ बोऱ्हाडे यांनी संवाद साधला. यावेळी ३८ वर्षा पूर्वीचे सवंगडी एकत्र आले होते. सर्वांनी गत काळातील गोड स्मृतींना उजाळा देत मनमुराद आनंद घेतला. मागील वर्षात दिवंगत झालेले माजी विद्यार्थी मित्र दीपक राऊत, बाळासाहेब नेवाळे, राजेश कांबळे, राजेंद्र प्रसाद, हेमलता कोळी,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत दत्तनगर ते वडमुखवाडी ते काटे वस्ती बी आर टी मार्गांवरील हमी कालावधी संपलेले एल ई डी दिवे बदलणे,  ग व फ क्षेत्रीय विद्युतविभागाचे प्रपत्रात नमूद विकासकामांचे अवलोकन करणे, पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत तरतूद…

Read More